Saturday, September 5, 2015


पान नंबर ०९ व १०
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी, आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

Pg 09
    खूप जुनी भूपाळी
घनःश्याम सुन्दरा श्रीधरा,
अरुणोदय झाला |
उठी लवकरी, वनमाळी,
उदयाचळी मित्र आला ||
आनंदकंदा प्रभात झाली,
उठी सरली राती |
काढी धार क्षीरपात्र घेउनी,
धेनु हंबरती |
लक्षिताती वासुरे हरी,
धेनु स्तनपानाला ||
    घनःश्याम सुन्दरा SS
सायंकाळी एके मेळी,
व्दिजगण अवघे वृक्षी |
अरुणोदय होताच उडाले,
चरावया पक्षी ||
    घनःश्याम सुन्दरा SS
प्रभातकाळी उठूनी कावडी,
तीर्थ पथ लक्षी |
करुनी सडासंमार्जन गोपी,
कुंभ घेऊनी कुक्षी |
यमुनाजळासी जाती मुकुंदा,
दध्योदन भक्षी ||
    घनःश्याम सुन्दरा SS
कोटी रवीहून तेज आगळे,
तुझिया वंदनाला |
होनाजी हा नित्य ध्यातसे,
हृदयी नाम माला ||
    घनःश्याम सुन्दरा SS
    गीतकार: होनाजी बाळा.
    संगीतकार: वसंत देसाई,
  गायक: पंडितराव नगरकर,
        आणि लता मंगेशकर.

    रमेश्वराचे बोलणे एकुन थोडी देखील कलीच्या अंतःकरणातील तगमग काही कमी होईना, कलीला वाटत होते कि हि ईश्वरा समोर बोलायची वेळ परत येईल असे वाटत नाही, त्यामुळे सर्वकाही परत जरा स्पष्ट बोलणे होईल तर फारच बरे. त्या दृष्टीनेच धास्तावलेला कली स्वतःला नीट सावरून बोलू लागला, हे सर्वशक्तिमान माझ्या परमेश्वरा, मी पृथ्विलोकांत पोहोचताच जप, तप, अनुष्ठान, व यज्ञ करणाऱ्या लोकांना तर काहीच करणार नाही, पण अशी परिस्थिती निर्माण करेन कि त्यांचे लक्ष्य विचलित होईल, मी त्यांच्या मनावर व परिस्थितीवर असा काही प्रभाव टाकेन कि त्यांना कष्ट न करता, तुमच्या कडून मिळालेल्या म्हणजेच त्यांचे प्रारब्ध अनुसार मिळालेल्या व माझ्या कडून योग घडवून आणून आयत्या पुरवलेल्या सुखसोयी आवडतील, त्यायोगे ते आळशी व भोगविलासी बनतील, व त्यामुळे माझ्या छत्रछायेखाली आपोआपच येउन माझे अधिपत्य स्विकारतील. तेथे असे संन्यासी होतील, जसे संन्यासिंच्या वेशांत जणूकाही राक्षसच, ते अशा काही जादुई चमत्कार लोकांना दाखवून लोकांना कर्मकांड कारण्यांस प्रेरित करून, अध्यात्मिक वर्तणुकीचा आभास निर्माण करतील व स्वतःला सद्गुरु म्हणवतील. असे संन्यासी म्हणजे माझे प्रथम अधिकारी असतील व ते मला अत्यंत माझ्याच प्राणासारखे प्रिय असतील. अहंमन्य (मानभावी) खोट्यांचा बाजार करणारे, लोकांना लुटणारे, असे लोकप्रतिनिधी निर्माण करेन व ते देखील माझे प्रधानांपैकी असतील. अशी जनता निर्माण करेन कि जी कायम मतलबी (स्वार्थी), वस्तुनिष्ठ, अहंभावी (गर्विष्ठ), विषयांध, परनिंदा, उपद्रवी, वाईट व्यसन असणारे असतील. माझ्या कलियुगात लोकांची अशी मानसिकता निर्माण करेन कि माता व पिता दोघेही आपल्या मुलांना चोरी, खोटेपणा, नफेखोरी, लुबाडणूक, असे जे ईश्वराला मान्य नाही, ते सर्व शिकवतील, तसेच मुलांना सत्यमार्ग व सन्मार्ग स्वीकारण्यास प्रतिबंध करतील, ईश्वराची तपस्या म्हणजे गौण व मायेच्या मागे लागणे हेच कर्तव्य असे आपल्या मुलांच्या मनावर ठसवतील. काही लोक आपल्या बायकामुलांवर प्रेम करतील पण आपल्या आईवडिलांवर प्रेम व त्यांचा सांभाळ करण्यास त्यांना नकोसे होईल. ह्यांतले दुसरे काही लोक आपल्या बायकामुलांवरहि नाही व आपल्या आईवडिलांवर तर नाहीच, परंतु दुसऱ्यांच्या बायकांवर आपला डोळा ठेवतील. मी असे पुरुष व स्त्रिया निर्माण करेन जे आवडीने आपला देहविक्रय करण्यास व दुसऱ्यांना जबरदस्तीने देहविक्रय करण्यास भाग पाडतील. मी अशी लोक निर्माण करेन जे अपेयपान (दारू प्राशन) करण्यास अतिशय उत्सुक असतील व त्याच्यात मोठेपणा मानतील, अशी लोक अपेयपान करणाऱ्या लोकांशी मैत्री करून भांडणे, मारामारी व चोरी करण्यास तत्पर असतील. अशी सर्व लोक माझे मदतनीस म्हणून मला आवडतील. अशी हि सर्व लोक जे ईश्वराने सांगितलेला भक्तिमार्ग सोडून, माझ्या दिलेल्या आकर्षणांना भुलतील व वाममार्गाने चालतील, त्यांना शिक्षा मात्र तम्हींच करावी, त्यांना झालेली शिक्षा व त्यांची फसगत पाहून मला आत्यंतिक आनंद मिळेल, कारण तेच माझे यश असणार आहे. पण जे जन आपल्या मातापित्याच्या आज्ञेत राहून, आचरण करतांत, जे जन तुमच्या नियमांनुसार चालतांत व भक्ती करतांत, त्यांच्यापासून मला कायम भय वाटतच रहाणार.
    लीचे चातुर्य, त्याची प्रवृत्ती, त्याची महत्वाकांक्षा, सर्व काही परमेश्वराला ठाऊक होते, कारण ईश्वराने स्वतःच त्याला तसे निर्मिले होते, परंतु कली ते विसरत होता. म्हणूनच कलीचे सगळे म्हणणे परमेश्वराने शांतपणे एकून घेतले, व उपदेश देत म्हणाला, तुझ्या कलीयुगाच्या आरंभ आणि शेवट कसा असणार आहे, हे मी जाणून आहे. तू तुझ्या युगाच्या शेवट काळांत, सर्व मानवांना स्वतःच्या अधिकारांत घेण्याचा, तुझा पूर्ण प्रयत्न असेल, पण लक्षांत ठेव, मला जाणणारे, माझी भक्ती करणारे, जसे आजही आहेत, तसेच त्याही वेळी असतील. तू हे कधीही विसरता कामा नये, कि जे मला जाणतात ते कधीही त्यांचे मानव कल्याणाचे, समाज उद्बोधन करण्याचे, कार्य थांबवणार नाहीत. ते हे कार्य, कुठलाही लोभ, अभिलाषा, न बाळगता करत असतील, त्यांना तू बाधा देऊ नयेस. तुझ्या युगांत देखील जसे आज सत्गुरू आहेत, तुझ्या युगाच्या प्रारंभिक काळांत असतील, तसेच तुझ्याअ म्हणजे कलियुगाच्या अंतिम समयी देखील असतील, परंतु त्यांना ओळखणे हे मानवाला मात्र दुर्धर असेल, तू हे देखील लक्षांत ठेव, कि मी स्वतः जसा आज सर्वांभूती, सर्वांठायी आहे, तसांच त्याही वेळी असणार आहे, तुझ्या प्रत्येक हालचालीवर, व कामगिरीवर माझे लक्ष असणारच आहे. त्यामुळे तू कदापि असे समजू नयेस, कि माझ्या प्रिय भक्तांना व इतरांना, एकसमान लेखू शकशील. म्हणूनच जे माझे भक्त असतील अशा कोणालाही तू तुझी बाधा न पोचवता, त्यांना सहाय्यभूत होणे, हेच तुझ्याकरता श्रेयस्कर असेल व ठरेल हे कायम लक्षांत ठेव.
    हे परब्रह्माचे (परमेश्वराचे) वचन ऎकुन, कलीला आता पूर्ण कळून चुकले, कि आता त्याला परमेश्वराची, पृथ्विलोकी जाण्याची आज्ञा झालेलीच आहे. म्हणून स्वतःला संयत करत, अधिक मार्गदर्शन लाभावे, ह्या हेतूने कलीने परमेश्वराला प्रश्न विचारला, हे माझे स्वामी, कृपा करून मला साधूचे अंतःकरण कसे असते? त्याला कोणत्या रीतीने भक्ती व आयुष्य व्यतीत करत असावे लागते? हे मला सविस्तर सांगा.
    येथे साधू म्हणून म्हटले आहे. साधू ह्या शब्दाचा अर्थ असा होतो कि "स व सा" म्हणजे सत्यमार्ग, व "ध" म्हणजे धरणारा. "स" व "ध" एकत्र घेतले तर लक्षांत येते कि "साधणारा", म्हणूनच सन्मार्गावर चालणाऱ्याला थोडक्यात "साधू" म्हटले जाते.
    लीची उत्कंठा व आकलन करण्याची प्रवृत्ती, तसेच ईश्वराप्रती निष्ठा, बघून परमेश्वर उपदेश देत, समजावून सांगू लागला, हे कली, नीट लक्ष्यपुर्वक ऎक, जो आपले शुद्ध, बुद्ध, कायम जागे ठेवून धैर्याने जनमनांत व समाजांत कुठलाही लोभ, अभिलाषा न बाळगता रहातो, तसेच कुठलेहि दोष आपल्याठायी जडवून घेत नाही, असे असून हरिहर, परमेश्वराला म्हणजेच मला सदासर्वदा भजतांत, किंवा काशीनिवासी राहून सदासर्वदा धर्मपरायण राहतांत, तसेच जे आपल्या सत्गुरुंची निरंतर सेवा व भक्तिमार्ग अवलंबितात, अशा सर्वांना निश्चित तू "साधू" म्हणून समज, व त्यांना तुझा दोष (बाधा) लागू शकत नाही. जे जन आपल्या मातापित्याची सेवा व प्रत्येक आज्ञा शिरसावंद्य मानून करतांत किंवा सत्पात्री ब्राह्मणाची सेवा करतांत, तसेच गायत्री हे ब्रह्म जाणून कपिला गाईची सेवा करून भजतांत त्यांना तुझा दोष लागणे अशक्य आहे. जे जन शैव, वैष्णव धर्माचे पालन करून नित्य तुलसीची पूजा करतांत त्यांनाही तुझी बाधा होऊन देवू नये हि माझी तुला आज्ञा आहे. जे जन सत्गुरुचे सेवक राहून, नित्य पुराण श्रवण करतील व धर्मासाठी सर्वसाधन तत्पर असतील त्यांनाही तू तुझी बाधा करू नये. शास्त्राचे पारायण करून वंशोवंशी सत्गुरुंची सेवा करणारे तसेच विवेक बाळगून धर्मपरायण असणाऱ्यांना देखील तू बाधू नयेस.


Pg 10

    रमेश्वराची आज्ञा ऎकुन ह्यावेळी कली धीरगंभीर व शांत होता, त्याचे प्रत्येक प्रश्न व परमेश्वराची प्रत्येक वचने तो लक्ष्य्पुर्वक आपल्या ध्यानीमनी ठेवत होता.
    लीने पुढे परमेश्वराला विचारले, हे माझ्या वंद्य जगतनायका, मला आपण कृपा करून हि गुरुमहिमा काय आहे? त्यांचे स्वरुप कसे काय असते? हे मला पामराला विस्तारून सांगावे.
    लीचा आग्रह व ज्ञानलालसा पाहून ब्रह्मनियांता खुश होऊन, उपदेश देत सांगू लागला, "गकार" हा स्वयंसिद्ध (गुह्य) ज्ञान आहे, "रेकार" हा पापांकरिता दाहक व विनाशक आहे, त्यातला "उकार" हा स्वतः विष्णूला व्यक्त करतो, व ज्या वेळेस "श्रीगुरू" हा शब्द उच्चारला असतां "त्रितयात्मा" म्हणजेच "ब्रह्मा" "विष्णू" व "महेश" ह्या तिन्ही शक्ती एकत्र असतांत व हाच एकत्र एकवटलेला म्हणजे "परमेश्वर" म्हणजेच मी. आणि म्हणूनच "श्रीगुरू" म्हणजेच "सत्गुरू" च्याठायी निश्चितच "परब्रह्म" वसलेला आहे, तसेच "सत्गुरू" हाच स्वतः माझे "परमतत्व" जाणत असून, अंगी पात्रता असणाऱ्या त्याच्या शिष्याला, मानवाला अगम्य असणाऱ्या अशा ब्रह्मज्ञानाची म्हणजे माझ्या "परमतत्वाची" ओळख करून देतो, म्हणूनच "सत्गुरू" हा मला सर्वांपेक्षा अधिकच प्रिय असतो. हे कली तू हे जाणून घे.
    रमेश्वराने आपले उपदेश कथन पुढे चालू ठेवले, व म्हणाला, जो शिष्य हे जाणतो व मानतो, कि सत्गुरू म्हणजेच आपले माता व पिता, सत्गुरू म्हणजेच स्वयं परमात्मा, असा जो कोणी शिष्य असेल त्याच्यावर जरी स्वयं माझा काहीही कारणे जरी कोप झाला, तरीही त्याचा सत्गुरू, त्याला माझ्यापासून पूर्णपणे वाचवू शकतो. परंतु स्वयं सत्गुरू एखाद्या त्याच्या शिष्यावर जर कोपला, तर मी स्वयं स्वतः परमेश्वर असूनदेखील, त्याला वाचवू शकत नाही, म्हणनच पृथ्विलोकी तर सत्गुरुचे स्थान माझ्याहीपेक्षा कधीही वरचेच ठरते, हे कली, तू कधीही व कदापि विसरू नकोस.
    हे कली, सत्गुरू हे स्वतःच “पूर्णब्रह्म” आहेत हे “सत्य” जाण, तोच “स्वयं ब्रह्मा, रुद्र व नारायण आहे” हेही जाण, आता त्यायोगे स्वतः सत्गुरू म्हणजे “पूर्ण ब्रह्मकारण म्हणजेच पूर्ण परब्रह्म आहेत.” ह्याकारणेच जे जन सत्गुरुच्या आश्रयाला जातील, व असतील त्यांना तू सहाय्यभूत होणे, हेच तुझ्या करता सर्वथा योग्य आहे व कायम राहील, आणि जर कधी तू चुकीने का होईना, त्यांना त्रास देण्यांस कारणीभूत झालास व ठरलास, तर तुला देखील त्या सत्गुरुंची माफी मागावी लागेल व त्यांनी तुला माफ केले तरच तुझी सुटका शक्य होऊ शकेल, हे तू कदापि विसरू नकोस.
    ह्यांचबरोबर आता हेही लक्ष्यांत ठेव, कि मी स्वतः जरी माझ्या कोणीही भक्तावर प्रसन्न झालो, तरी तुझ्या युगात म्हणजेच कलियुगी मला माझे "परमतत्व" स्वरूप कोणालाही दाखविता किंवा सांगता येणार नाही. त्याला फक्त सत्गुरुच माझे स्वरूप व माझी ओळख करून देऊ शकेल, ह्याकारणे देखील सत्गुरू ज्यांच्यावर प्रसन्न होईल, ते जन, ते शिष्य त्यांच्या सत्गुरुयोगे मला म्हणजेच "परमात्म्याला" आपले सहज अधीन करून घेतील.
    जे जन शास्त्रमार्ग अनुसरून आपल्या सत्गुरुला श्रवण करून आपला भक्तिमार्ग विस्तार करतील, त्यांना हे सहजशक्य होईल. जे जन तीर्थाटन, व्रतवैकल्य, योगसाधना, जप व तप, त्यंच्या वर्णानुसार अभ्यास करून ज्ञानी होतील, व ज्ञानी परम विवेकपूर्ण जरी आचरण करतील, तरी त्यांना माझे अस्तित्व व स्वरूप ओळखणे, तसेच माहित पडणे हे कायम अशक्यप्राय आहे, त्याकरिता त्या सर्वजनांना सत्गुरू कडेच जाणे रास्त राहून व शास्त्रमार्गानुसार त्यांचे सत्गुरू म्हणतील त्याप्रमाणे भक्ती करून माझ्या "अखंड ज्योति:स्वरुप” अशा "परमतत्व" स्वरुपात मला वश्य करून घेणे हे त्यांना सहजशक्य होईल.
    चार भेदाभेद, वर्ण भेदाभेद, विवेकधर्म भेदाभेद, भक्तीवैराग्य भेदाभेद, त्याच बरोबर आहार भेदाभेद, ह्यांसारख्या कोणत्याही युक्ती प्रयुक्तिने मी वश्य (प्रसन्न) होणे अशक्य आहे, ह्यासाठी एक आणि फक्त एकच म्हणजे "सत्गुरू" हाच सहज आणि शक्य निधान होऊ शकतो.
    रमेश्वराची वचने एकून कलीची अधिकच ज्ञानतृष्णा वाढली, कारणही तसेच होते, ह्या सत्गुरुंपासून कसे व काय रीतीने स्वतःला वाचवायचे ह्याचा अभ्यास होणे, हे देखील त्याच्यासाठी आवश्यक होते. त्यासाठी त्याने परमेश्वराला करसंपुट जोडून विनयपूर्वक प्रश्न केला, हे आदिनाथा "सत्गुरू हा सर्व देवांसमान" कशा रीतीने, कसा काय होतो?
    रमेश्वराने कलीला अधिक सुगम, सुलभरित्या उपदेशून सांगण्यास सुरवात केली, म्हणाला हे कली, तुला मी सर्व विस्ताराने सांगतो, एकचित्त करून ऎक, मानवांना सत्गुरू शिवाय पार लागणे फार कठीण आहे, जसे कि शास्त्र ऐकतांना, शास्त्र समजून घ्यायला नुसते कान असून समजून येत नाही, म्हणजेच जसे कुठल्याही गुरुशिवाय कुठलेही शास्त्र शिकता येत नाही, म्हणजेच सत्गुरू शिवाय शास्त्र हे सर्व ज्ञानेंद्रिय असूनदेखील शिकता येण्याजोगे नाही. ज्यावेळी सत्गुरू मुखाने ज्ञान (शास्त्र) मनुष्य श्रवण करतो, त्यावेळेस हे समस्त शास्त्र देखील स्वतः स्वतःला ऎकत असतांत. सत्गुरुच्या रसाळ वाणीने हेच ज्ञान (शास्त्र) जेव्हा स्वयं सद्गुरुप्रकाश रूपाने जागृत होते, व शिष्याच्या कानी व नयनी तो प्रकाश पडतो, तेव्हा त्याचे अंधःकाररुपी अज्ञान कायमचे नाहीसे होऊन, आत्मा व परमात्म्याची भेट घडून तो शिष्य भवसागररुपी ह्या संसारांत तरावयास लागतो. आता ह्याच कारणाने सत्गुरुला कोणीही साधा मानवदेहधारी मनुष्य न समजता त्याला माझ्याच ज्योती:स्वरूप जाणावा व मानावा.
    त्गुरुची सेवा करणाऱ्याला सर्व सिद्धी वश्य होऊन, त्याची त्रिशुद्धी म्हणजेच काया, वाचा, व मनाने तो शुद्ध होतो, तसेच तन, मन, व धनाने तो परिपूर्ण पावतो, व आपल्या सत्गुरुच्या सेवेसी तत्पर राहतो.
    ह्याच्यापुढे श्रीनृसिंहसरस्वती जे स्वयं श्रीदत्तगुरूंचे अवतार होते त्यांनी परमेश्वराने कलीला जी कथा ऎकविली, ती एका सत्गुरुच्या, संदीपक नांवाच्या शिष्याची कथा, जो आपल्या सत्गुरुला परमेश्वरापेक्षा अधिक श्रेष्ठ मानून सेवाधर्म करावयाचा, व त्यामुळे परमेश्वराला त्या शिष्याच्या कसेकाय अधीन व्हावे लागले, हि गोष्ट त्यांनी आपल्या ओघवत्या रसाळ वाणीने फार सुंदररित्या सांगितली.

ती गोष्ट आपण सर्व भक्तिपरायण वाचकहो तुम्हाला आवडेलच अशी आहे, तरी पुढे प्रसिद्ध होणाऱ्या पानांत आपणांस वाचावयास मिळेल.


आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.

2 comments:

  1. Nice Post for all readers Please visit http://software4freedownlaod.blogspot.in/ best software

    Laptop details http://www.laptop4pune.com/

    Movies Video and Trailers http://worlds-4-free.blogspot.com/

    Free Download Whats Apps for PC and Laptop http://www.laptop4pune.com/2014/02/Free-Download-

    Whatsapp-for-PC-and-Laptop.html

    Free Download Driverpack Solution 15 ISO Full Version

    http://www.laptop4pune.com/2014/12/free-download-driverpack-solution-15-iso-full-version.html

    ReplyDelete