Sunday, September 20, 2015


पान नंबर १५ व १६
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी, आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

Pg 15

    स्वयं सद्गुरु नृसिंहसरस्वतीजींनी, सद्गुरु व त्रयमुर्तींची पर:ब्रह्माची दिलेली ओळख.
श्लोक :
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः |
गुरुः साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः ||


टीका :
गुरु म्हणजे ब्रह्मा, गुरु म्हणजे विष्णू, गुरु म्हणजेच ईश्वर महेश्वर |
गुरुच्या ठायी साक्षात, हि त्रैशक्ती म्हणजेच एकवटलेल पर:ब्रह्म आहे,
अशा त्या गुरूला, माझे नमन आहे ||


विशद :
स्वयं ब्रह्मा गुरुंच्या ठायी असतो, स्वयं विष्णू गुरुंच्या ठायी वसतो,
स्वयं ईश्वर महेश्वर गुरुंच्या ठायी रहातो.
स्वयं ह्या त्रैशक्ती म्हणजेच पर:ब्रह्मच्या परमतत्वाची
ज्याला ओळख आहे, म्हणूनच संपूर्ण पारब्रहम ज्याच्यापाशी आहे,
त्यामुळेच त्या पर:ब्रह्माची त्यांच्यावर असीम कृपा आहे, म्हणून असा गुरु आपल्या शिष्याला ते ज्ञान, ती परमेश्वराची ओळख, प्रदान करू शकतो, अशा त्या गुरूला, माझे नमन आहे.

हे तर, सद्गुरूचे मुख्य वर्णन झाले, ह्यापुढे, अजूनही श्रीमद्सद्गुरू नृसिंहसरस्वतीजींनी, श्रीसद्गुरु कसा व परमेश्वर कसा अनुभूत आहे, ह्याचे केलेले अतिसुंदर वर्णन, ह्यापुढे प्रसिद्ध होणार्या पानांमध्ये आपण निस्सीम वाचकांकरता, जरूर प्रसिद्ध होईल.



    तापर्यंत आपण पाहिले, कि परमेश्वर आणि कली ह्यांच्या दरम्यान, कलियुगाचे आगमन होण्यापूर्वी काय संभाषण झाले. त्यांत कलीने काय योजना ठरवायचा प्रयत्न केला? काय त्याच्या योजना स्वयं परमेश्वराकडून मान्य करून घेण्यांत तो यशस्वी झाला. परमेश्वराने त्याला काय निर्बंध व नियम लावले, व ते पाळण्यास सांगितले?
    तापर्यंत जर तुम्ही नीट व व्यवस्थित संपूर्ण वांचले असेल, तर तुमच्या लक्षांत आले असेल, कि कलीने त्याच्या योजना कशाप्रकारे आखल्या. कली हा एक स्वयं ईश्वराची, कलीयुगात प्रमुख एक अशी शक्ती, त्याला "कालात्मा" व "वेग" अशा सहाय्यक शक्तींची मदत मिळून, कली, एक स्वयं परिपूर्ण अशी परंतु परमेश्वराने त्याला नियम घालून दिले अशी ताकदवान शक्ती निर्माण होऊन, त्याला संपूर्ण पृथ्विलोकांत आपले काम करण्यांस, जवळपास स्वयं परमेश्वराच्या इतकीच वेगवान आणि प्रबळ अशी यंत्रणा, संपूर्ण पृथ्विलोकी, सर्व ठिकाणी एकाच वेळी, कार्यान्वित व स्थापित करता येऊ शकली, तसेच त्यांत बदल व नवीन योजना करणे व पार पाडणे कलीला सहजशक्य होऊ लागले.
    प्रामुख्याने तुम्ही हेही लक्ष्य दिले असेल, कि त्याला परमेश्वराने काय नियम व मर्यादा आखून दिल्या? मानवाला त्याच्यापासून वाचण्यासाठी काय काय मार्ग अगोदरपासूनच परमेश्वराने प्रशस्त करून ठेवले? आता तुमच्या हेही लक्षांत आले असेल, कि माणूस स्वतः आपणहून आपला कसा नाश करून घेतो? तसेच आपले जीवन कसे उद्धरु देखील शकतो?
    माझ्या प्रिय वाचकहो, ह्यांत घाबरण्यासारखे, पळून जाण्यासारखे, काहीच नसून, आता तुमच्या लक्षांत आले असेल, कि कली, हा काही पिशाच्च किंवा काही दुरात्मा नसून, जशा इतर देवता आहेत, उदा. अग्निदेव, पवनदेव, किंवा सूर्यदेव आहेत, अशींच एक देवता (शक्ती) आहे. त्यामुळे हि देवता देखील, आपण आपल्या मनांत, त्याच्याकरता, तिरस्करणीय असा कोणताही भाव न ठेवता, आदरणीय भावच ठेवला पाहिजे कारण तो देखील ईश्वराने त्याला दिलेले कामच करत आहे. जसे आपण शनिदेवाला देखील आदर व सन्मान देतो, परंतु त्याच्या वाटेला मात्र जात नाही, त्याचप्रमाणे आपण कलीदेवाच्या बाबतीत देखील वागले असतां, हि देवता देखील आपल्या वाटेला न जाता, आपल्या मार्गावरून जाण्यास फारसा प्रतिबंध करणार नाही. तरीपण सावध रहाणे हे केव्हाही उत्तमच. कारण आपले मन हेच फार उच्छरुंकल असते, व त्यामुळेच धोका संभवतो. आपले मन असे उच्छरुंकल का होते? हा देखील एक अभ्यासाचा विषय आहे, त्याबद्दल सुद्धा आपण नंतर बघू.
    र्वप्रथम आपल्याला "सर्वशक्तिमान परमेश्वराची" ओळख करून घेतली पाहिजे. आपण सर्व त्या परमेश्वराची कल्पना करतो. आपण असे म्हणतो, ह्या परमेश्वराला आत्तापर्यंत कोणीही पाहिले नाही. काय हे सत्य आहे? कि कोणीच परमेश्वराला पाहिले नाही? हे चूक आहे, हे सत्य होऊ शकत नाही, तुम्ही विचाराल कसे काय? कारण असे असते तर ह्या जगांत नामदेव महाराज, तुकाराम महाराज, रामदास स्वामी, जसे संत, तसेंच इसा मसीह, व हजरत महंमद पैगंबर सारखे त्या परमेश्वराचे प्रेषक निर्माण झालेच नसते.
    सेंच तुमच्या लक्षांत आणखी एक महत्वाची बाब आणून देऊ इच्छितो, जेव्हा तुम्ही लहान होतांत, तुमच्या आईने, तुमची ओळख, हे तुझे पपा (बाबा), हे तुझे काका, हि तुझी मावशी, असे करत वारंवार सांगून, त्यांची तुम्हाला, व तुमची तुम्हाला स्वतःची ओळख करून दिली, आणि तुम्ही ते मान्यहि केले. आता तुम्हाला असे विचारतो, कि तुम्ही ते का मान्य केले? त्याचे उत्तर असेंच येते, कि त्या वेळी, तुम्ही लहान होतांत, तुम्हाला स्वतःला, स्वतःचा स्वार्थ, अहंकार, अहंमान्यता, असे सर्व काहीच नव्हते, तुम्ही एका आज्ञाधारक शिष्यासारखे, म्हणजेच ह्या पृथ्विलोकी, ह्या मायारूपी संसारांत, कसे वागायचे, जगायचे ह्याची शिकवण तुमच्या आईकडून घेतली. तुम्ही तुमच्या मनांत, त्यावेळी काहीही दुजाभाव न ठेवता, तीने जे सांगितले ते सर्व, तुम्ही तुमच्या आईकरिता तुमचे संपूर्ण समर्पण, ह्याच भावनेने ते मान्य केले. ह्याचाच अर्थ १००% तुमची आई, हि तुमची "सर्व प्रथम गुरु" म्हणून तुम्ही तीला मान्य केले, ह्याचाच अर्थ ती तुमची प्रथम "गुरु" म्हणून सिद्ध (साबित) झाली, आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या लहानपणी यशस्वीही झालांत. हे तुम्हाला मान्य करायला हवे. तसेच तुम्हाला हेही मान्य करावे लागेल कि ज्यावेळेस तुम्हाला वाटले कि जगांत तुम्ही स्वतः एकट्याने चालू किंवा राहू शकता, त्यावेळेस तुम्ही तुमच्या आईचा हात सोडून दिलात म्हणजेच तुम्हाला तुम्हीं स्वतः एक स्वयंपूर्ण व्यक्ती असे समजू लागलात, आणि वास्तविकता काही वेगळीच आहे हे मान्य करायला लागते, कारण आपण परमेश्वराची ओळख तर विसरूनच गेलो. पूर्वीच्या काळी, मुंज वगैरे विधी झाल्यानंतर साधारण ५ ते ७ वर्षे वयापासून विद्यार्थ्याला गुरु आश्रमांत पाठवून द्यायचे व तिथूनच त्याला विद्याभ्यास झाल्यावर सत्गुरुकडे पाठवले जायचे, परंतु आजच्या काळांत ते सर्वकाही राहिलेच नाहि, म्हणून काय आपण आपले जीवन व्यर्थ घालवायचे? नक्कीच नाही.


Pg 16

समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली, गणपतीची मूळ ७ कडवीं ची आरती.
सुखकर्ता दु:खहर्ता, वार्ता विघ्नांची |
नुरवी पुरवी प्रेम, कृपा जयांची ||
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची |
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची || १ ||
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे, मनकामना पुरती || धृo ||
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा |
चंदनाची उटी, कुंकुमकेशरा ||
हिरेजडीत मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नुपुरे, चरणी घागरिया || जयo || २ ||
माथा मुकुट मणी, कानी कुंडले |
सोंड दोंदावरी, शेंदूर चर्चिले ||
नागबंद सोंड, दोंद मिरविले |
विश्वरूप तया, मोरयाचे देखिले || जयo || ३ ||
चतुर्भुज गणराज, बाही बाहुटे |
खाजयाचे लाडू, करुनी गोमटे ||
सुवर्णाचे ताटी, शर्करा धृत |
अर्पी तो गणराज, विघ्ने वारितो || जयo || ४ ||
छत्र चामरे, तुजला मिरविती |
उंदीराचे वाहन, तुजला गणपती ||
ऐसा तू कलीयुगी, सकळीक पाहसी |
आनंदे भक्तासी, प्रसन्न होसी || जयo || ५ ||
ता ता धि मी किट, धि मी किट नाचे गणपती |
ईश्वर पार्वती, कौतुक पाहती ||
ताल मृदुंग वीणा, घोर उमटती |
त्यांचे छंदे करुनी, नाचे गणपती || जयo || ६ ||
लंबोदर पितांबर, फणीवर वंदना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना ||
दास रामाचा, वाट पाहे सदना |
संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना
|| जयo || ७ ||
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे, मनकामना पुरती || धृ ||
        !! गणपती बाप्पा मोरया ||

    ता इथेच थोडा आणखी विचार करुया, कि काय तुम्ही तुमच्या आईवर, तुमच्या संपूर्ण समर्पण भावना न ठेवता, स्वार्थ, अहंकार व अहंमन्यता ह्यांसारखे क्षुद्र विचार मनी ठेवून, विश्वास ठेवला नसता, तर काय झाले असते? तुम्ही तुमच्या व्यक्तिगत जीवनांत, संसाररूपी भवसागरांत कसे जगला असतांत? येथे आपल्याला मान्य करावे लागेल, कि ज्याच्याकडून ज्ञान प्राप्त करायचे असेल, त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवणे, हे अत्यधिक गरजेचे होते. अन्यथा ते ज्ञान प्राप्त होणे, हा नुसता कल्पना दुर्विलासच ठरतो. हेच नेमके गमक आहे. आणि इथेतर आपल्या आयुष्याचा, आत्म्याच्या उद्धाराचा प्रश्न आहे, म्हणूनच आपला, पूर्ण विश्वास व पूर्ण समर्पण अत्यंत आवश्यक ठरते. आता येथे प्रश्न उठतो, गुरु आणि सत्गुरू ह्या दोघांत काय फरक आहे? पण तुर्तांस ह्या प्रश्नाकडे नंतर बघुया, कारण प्रथम येथे आपला विषय चालू आहे, परमेश्वर काय आहे? व त्याची ओळख आपण कशी करून घेऊ शकतो.
    काय तुमचा इतिहासावर विश्वास आहे? काय त्या सर्व भाकडकथा म्हणून मानता? ते सर्वांमधले काही, उदा. संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत मीराबाई, गौतम बुद्ध, हजरत महंमद पैगंबर, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, आणि जीसस ख्राइस्ट हे सर्व संत, ह्या पृथ्वीवर आले, त्यांनी लोककल्याणार्थ आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले, हे आपण वाचतो, तसेंच हे सर्वांना माहित आहे.
    काय तुम्हाला असे वाटते, कि ते काय त्यांच्या जन्मापासूनच संत होते? नक्कीच नाही. मग हे कसे काय घडले? त्यांना त्यांच्या आंतरिक प्रबळ इच्छेनेच परमेश्वराला त्यांच्या अधीन होण्यास भाग पाडले, हेच निर्विवाद सत्य आहे. त्यांनी जेव्हा ईश्वराचे अस्तित्व जाणले, त्यानंतर मानले, तेव्हा त्यांना परमेश्वराच्या मानव व निसर्गाप्रती काय भावना तसेच इच्छा कळल्या, त्यामुळेच त्यांना साधारण मानवांच्या हातून होणाऱ्या चुका कळल्या, अर्थात त्याचमुळे त्यांनी समाज परिवर्तन करण्याच्या दृष्टीनेच आपले जीवन वेचले, व जगाला भक्तिमार्ग दाखवून, तसेंच समजावून दिला. ह्यामध्ये आणखी एक महत्वाची बाब लक्षांत घेतली पाहिजे, ती ही, कि जसे तुम्ही पहाता कि स्वतःला सत्गुरू म्हणवून घेणारे दुसऱ्यांना तुच्छ समजतात व आरोप व प्रत्यारोप करत असतात, तसे त्यांनी कधीही एकमेकांच्या विरुद्ध टीका, किंवा टिपण्णी केली नाही, भले ते एकमेकांच्या कालखंडात असोत किंवा नसोत. कारण उघड आहे, त्यांनी एकाच ईश्वराचे ज्ञान घेतले व त्याच ईश्वराचे कार्य पार पाडले. दोष नेहेमी आपल्यांतच राहिला, कारण आपण सर्व काही संशयानेच पहात असतो, आणि त्या संतांचे महत्व कळले कि ते संत ज्या ठिकाणी राहिले, ज्या वस्तू वापरल्या, ज्या दगडावर बसले, त्याचीच (त्या जागेची, दगडाची, आसनाची) आरती व पूजा करू लागलो, त्या संतांनी जे सांगितले, त्या वचनांकडे आपले लक्षच नाही, हे खरे नाही तर काय आहे? आणि म्हणूनच आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी लक्षांतच येत नाहीत. काय तुम्हाला वाटत नाही? कि हा दोष आपले संपूर्ण जीवनच नेस्तनाबूत करून टाकेल? म्हणूनच सर्वप्रथम काही महत्वाच्या गोष्टी पटल्यावर हा दोष आपण, आपल्यातला स्वतः होऊन कायम काढून टाकला पाहिजे. जसा विश्वास, जसे समर्पण, आपण आपल्या "प्रथम गुरु आई" बद्दल बाळगला, व ठेवला, तसाच विश्वास व समर्पण, परमेश्वराला व सत्गुरुला देखील अपेक्षित असतो. कारण त्याशिवाय योग्य अभ्यास व नंतर त्यावर चालणे, शक्यच होऊ शकत नाही. तुम्हीच सांगा तुम्ही एका "क्ष: व्यक्तीला त्याच्या चांगल्या किंवा वाईट वेळेतून अधिक चांगले घडण्यासाठी, तुमच्या दृष्टीने काही चांगला व योग्य असा सल्ला दिलात! आता ती "क्ष" व्यक्ती त्याप्रमाणे चालली नाही, व त्या "क्ष" व्यक्तीने आपले स्वतःचे नुकसान करून घेतले, तर काय तुम्ही त्या "क्ष" व्यक्तीला परत त्याच्या चांगल्या किंवा वाईट वेळेला काहीही सल्ला किंवा काही मार्ग सांगाल का? अशा वेळेस "तुमचे उत्तर नाही म्हणूनच असेल". ह्याचा अर्थ काय होतो? निश्चितच असे प्रतीत होते कि जिथे कोणतेही अज्ञान घालवून ज्ञान घेण्याचा प्रश्न येतो, तिथे संपूर्ण विश्वास हाच कामी येतो अन्यथा काहीच कामी येणार नाही असेच कोणतेही प्रकारचे ज्ञान अर्जन (घेणे) करतांना दिसून येते.
    ता पुढे आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया, तर आपण ईश्वराची ओळख, व त्याचे अस्तित्व समजून घेऊ. तसेंच थोड आधी, काही समजावणे जरुरी आहे असे वाटते. ते असे, कि परमेश्वर हा काहीएक किंवा अनेक पदार्थांपासून बनलेला देह किंवा काही वेगवेगळ्या आकृतीमध्ये सीमित रहाणारा नसून, ती एक अखंड, ज्याची कुठेही सुरवात नाही कि कुठेही शेवट नाही असे अमर्याद, एक वेगळेच तत्व ज्याला काहीच व कोणतीही उपमा (प्रकार, म्हणजे कुठल्या प्रकारचे असे वर्णन) देता येऊ शकत नाही असे वेगळेच तत्व , व वैश्विक ताकदीची कि तिथे करोडो सुपर कम्प्युटर बसवले तरी कमीच पडतील अशी हायपर टेक्नॉलॉजि असलेली अशी एक ईश्वरीय शक्ती आहे, जी एका मुंगीलाच काय तर संपूर्ण ब्रह्माण्डाला नुसते नियंत्रित करत नाही तर प्रत्येक जीवाचं भरणं पोषण व जन्म-मृत्यू देखील त्याच्या हातांत आहे. ही शक्ती कोणत्या स्वरूपांत आपले कार्य करंत असते? ह्यांबद्दल आपण यापुढे पाहुया.
    रमेश्वर हा "परम तत्व" स्वरूपांत संपूर्ण ब्रह्मांडात स्थित असून, आपण त्या शक्तीला, आपल्या मानव देहाला असलेल्या, आपल्या मानवी उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, ह्याबद्दल भगवद गीता, बायबल, कुराण मध्ये लिहून ठेवले आहे, कि हे "परम तत्व" अखिल ब्रह्मांडात व्यापून असून, किंचित काही एक जागा रिकामी अशी सापडू शकत नाही, कि जिथे हे "परम तत्व" नाही. आपली मानवी डोळ्यांची नजर, किंवा कोणत्याही शक्तिशाली दुर्बिणीची नजर, पोहोचू देखील शकणार नाही, असे त्याचे अस्तित्व आहे, हा परमेश्वर अखंड असून, त्याची कुठूनही सुरवात नाही कि अंतही नाही. ह्या परमेश्वराला जाणणे, हे फक्त सत्गुरुला शरण गेल्यावरच शक्य होऊ शकते. तसेंच हे सांगू इच्छितो, सद्गुरु मिळणे, हे देखील, ज्याची खरी श्रद्धा व संपूर्ण समर्पण भावना असते, त्याला हा मार्ग देखील परमेश्वर स्वतः प्रशस्त करून देतो, हे स्वअनुभवावरून सांगतो, कि हे निश्चितच निर्विवाद आणि अटळ सत्य आहे.
    रमेश्वराचे "परम तत्व" चे वर्णन "भगवद गीता" मध्ये फार सुंदररीत्या केलेले आहे, ते अशा प्रकारे :
श्लोक :
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः .
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः २.२३


टीका :
"परम तत्व" हे कधीही कोणत्याही, शस्त्राने छेद व कापले जाऊ शकत नाही.
"परम तत्व" हे कधीही कोणत्याही, प्रकारच्या अग्नीने जाळले जाऊ शकत नाही.
"परम तत्व" हे कधीही कोणत्याही, द्रव पदार्थाने, भिजवले, किंवा वाहून जाऊ शकत नाही.
"परम तत्व" हे कधीही कोणत्याही, दाबाच्या वायुने उडवले जाऊ शकत नाही.


विशद :
"परम तत्व" हे एक असे परमेश्वराचे अस्तित्व आहे, कि कुठल्याही अस्त्र, शस्त्राने, अग्नीने द्रव पदार्थाने, तसेच हवेच्या दाबाने, बाधित होणे शक्य नाही.
म्हणूनच त्याचे अस्तित्व अजर व अमर आहे, व रहाणार.
म्हणूनच त्याला कुठेही सुरवातही नाही, तसेच कुठेही अंतही नाही.
म्हणूनच त्याला कुठेही कुठल्याही प्रकारचा गंधही नाही, किंवा सुवासही नाही.
म्हणूनच त्याला कुठेही कुठल्याही प्रकारचा आकृतीचा बंध नाही. म्हणूनच त्याला कुठेही कुठल्याही प्रकृतीचा किंवा निसर्गाचा यम वा नियम लागू होत नाही.
म्हणूनच हा कायम अजर-अमर व निर्लेप रहातो, कुठलेही बाह्य आवरण ह्यास लागू होत नाही व त्याला आवश्यकता नाही.
आणि म्हणूनच हा परमेश्वर आदी, अनादी काळांचा मालक, सर्व ब्रह्मांडाला चालवणारा, कायम धायम असा एकच अनभिषिक्त स्वामी आहे, व पुढेही कायम, धायम रहाणार.

    ह्या "भगवद गीता" च्या वर्णनाप्रमाणे उद्या ब्रह्मांडामध्ये जरी केवढीही मोठी प्रचंड उलथापालथ झाली, तरी ह्या परमेश्वराच्या अस्तित्वाला धोका संभवत नाही वा असूच शकत नाही. आता ह्याला जोडूनच पुढे आपण हे समजून घेतले पाहिजे, कि आपला "आत्मा" देखील, भगवत गीता मध्ये सांगितल्याप्रमाणे, ह्या परमात्माच्या, परमेश्वराच्या "परम तत्व" चाच भाग आहे, म्हणूनच आपला आत्मा देखील अजर व अमर आहे, व रहाणार. आता हे कसे सिद्ध होते, ते पुढे आपण पहाणारच आहोत. तत्पूर्वी आपल्याला आणखी काही गोष्टी समजून घेणे फारच आवश्यक ठरते. ते प्रथम पुढील प्रसिद्ध होणाऱ्या पानांत पाहुया.


आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.

No comments:

Post a Comment