Sunday, October 18, 2015


पान नंबर २१ व २२
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी, आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

Pg 21
  कृपया हिकडे लक्ष्य द्यावे!
इलेक्ट्रिक, हि आपल्या रोजच्या वापरातली "वस्तू" नव्हे "उर्जा" आहे.आपण असे समजतो, आपली कमाई आहे, तर आपण कितीहि विजेचा वापर करू शकतो, व तो हक्क आपल्याला आहे. पण खरेच तसे आहे का?
कदाचित असे तर नाही? कि, आपण त्या गोष्टीतल्या राजासारखे, तो राजा, जेथे हात ठेवेल, त्याचे सोने झाले, आणि शेवटी त्यालाच धाय मोकलून रडावे लागते, म्हणजेच आपल्या देशांत, आपण निष्कारण वीज, आणि विजेसारख्या अन्य गोष्टी योग्य रीतीने न वापरता बेशुमार वापरून आपल्याच अधोगतीला आपण स्वतःच जबाबदार होतो?
भारतामध्ये अजूनही अपारंपारिक पद्धतीपेक्षा, (काही राजनीतिक कारणाने) पारंपारिक पद्धतच (उर्जा स्त्रोत) वापरावा लागतो. हे नैसर्गिक स्त्रोत, पूर्वी म्हणजे १९९८ साली, जेव्हढे होते, तेव्हढेच आजही आहेत, कदाचित काही कारणांने त्यांत बिघाड झाला, तर मात्र वीजनिर्मिती कमी होते, परंतु वीजनिर्मिती वाढवण्याचा एकही प्रशस्त मार्ग अजूनपर्यंत आपल्याला सापडलेला नाही.
असे असतांना, विचार करा, १९९८ सालापासून आज २०१५ सालापर्यंत, आपण किती वीज उपयोगी वस्तू आपल्या वापरामध्ये वाढवल्या? व त्याच्यावर आज अवलंबून आहोत. तसेच किती घर वाढली? किती लोकसंख्या वाढली? किती कार्यालय व किती कारखाने वाढले?
आपल्याला असे वाटते का? कि उद्योगधंदे वाढू नयेत, रोजगार निर्मिती होऊ नयेत? आपली मुले शिक्षित असून देखील बेरोजगार रहावीत. आपले जीवन चांगले गेले, बास झाले, येणाऱ्या पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या पिढीचा नाश झाला तरी चालेल, मी मात्र आहे, तसंच वागणार व रहाणार? व त्यांच्या नाशाला कारणीभूत होणार?
आज वस्तुस्थिती अशी आहे, कि मागणीपेक्षा पुरवठा फक्त निम्माच आहे. अशा अवस्थेत आपण असतांना, आपण बेफिकीर रहातो, हे कितपत योग्य आहे? उद्या अशी अवस्था निर्माण झाली, कि पैसा आहे पण वापरायला वीज नाही, रात्री मुलांच्या आभ्यासाला लाईट नाही, तर आश्चर्य वाटण्याचे कारणच नाही. कारण जे झाले, जे होत आहे, त्याला आपणच जबाबदार नाही का?
सत्गुरू म्हणजे काय?
    ला तर आता हि योग्य वेळ आली आहे, सत्गुरू म्हणजे काय? हे पूर्णपणाने माहित करून घेऊया! तसे बघायला गेले तर ह्यापूर्वीच ह्याचे सुतोवाच झालेले आहे, आपणाला आठवण करून देतो, ज्यावेळेस परमेश्वराने कलीला शिष्य संदीपकची कथा सांगितली त्यामध्ये सत्गुरूचे वर्णन केले होते, परंतु आपण त्याला, त्याच्या मूळ अर्थापासून नीटपणे व व्यवस्थित समजून घेतले तर एकंदरीत फारच बरे होऊन, मन दृढ होण्यास अधिक मदतच होईल.
    हे सहजसाध्य होण्यासाठी, सर्वसाधारणपणे आपण आपल्या आयुष्यापासून सुरवांत करू, आपण ज्यावेळेस लहान होतो, प्रथमच शाळेत जाऊ लागलो, आपल्याला आपल्या शिक्षकांची ओळख झाली, इथे शिक्षक म्हणजेच "गुरु" हा शब्द फार पूर्वी म्हटला जायचा. आता गुरु म्हणजे काय? ते प्रथम पाहू. "गु" ह्या शब्दाचा अर्थ होतो "अंधःकार," आणि "रु" ह्या शब्दाचा अर्थ होतो "प्रकाश." आता ह्या दोन्ही शब्दांचा मिळून असा अर्थ होतो, कि जेथे अज्ञानरूपी अंधःकार असतो, तेथे ज्ञानरूपी प्रकाश पाडणारा असा जो कोणी, तो "गुरु" म्हणून संबोधित केला जातो. आता आपण आपल्या आत्तापर्यंत व्यतीत केलेल्या आयुष्याकडे पाहिले, तर असे आढळते, कि आपण जसजसे एक एक वर्ग (कक्षा) उत्तीर्ण होत, पुढे म्हणजेच पूर्ण माध्यमिक शाळेचे जेव्हढे वर्ग होते, तेव्हढे उत्तीर्ण होऊन कॉलेजला गेलो, तेथेही आपल्याला वेगवेगळे विषयाला नवनवीन प्रोफेसर भेटले, त्यांनी देखील आपल्याला जे काही कमीअधिक शिकवले. आपल्या अज्ञानाला दूर करून त्यांत ज्ञानरूपी प्रकाशाला प्रज्वलित व प्रस्थापित केले. ह्याचाच अर्थ हा निघतो, कि हे शाळेपासून कॉलेजपर्यंत किंवा क्लासमध्ये वगैरे वगैरे, आपल्याला शिकवणारे हे सर्व आपले "गुरु" आहेत. ह्याचाच अर्थ असाही निघतो, कि पैसे मोजले तर "गुरु" वाट्टेल तेव्हढे मिळू शकतात. पण कितीही पैसे वा श्रम खर्च केले तरीही सत्गुरू नाही मिळू शकत. हे वास्तव आहे. त्याला पार नाही, म्हणजेच अन्य रस्ता नाही. असे का?
    पण आतापर्यंत लिहिलेले वाचले, तसेच आपणा सर्वांना साधारण जाणीव देखील आहे, परमेश्वराला तुमचा भाव व श्रद्धा हवी आहे, तुमचा गंध, हार, अक्षता, नारळ, प्रसाद, फुल, पैसे, दागिने ह्यांतले काही नको असते. ह्यायेथे "भगवत गीता" चा उल्लेख करावासा वाटतो, जर आपणांपैकी कोणी "भगवत गीता" वाचली असेल, तर त्यांना माहित असणार, कि ह्यामध्ये कधीही, कुठेही, कुठल्याही श्लोकांत, कर्मकांड म्हणजे, मागे लिहिल्याप्रमाणे, पूजेच्या विविध वस्तू घ्या, अमुक किंवा तमुक तऱ्हेने पूजापाठ करा वगैरे, असे काहीच न सांगता, संपूर्ण कर्मयोग कसा उत्तम ठरतो, परमेश्वरापर्यंत कसे पोहोचता येते, हेच श्रीकृष्णाने, उधृत (सविस्तर उलगडा) करून, समजावून सांगितले. तेच आपल्याला अधिक व्यवस्थित समजून घ्यायचे आहे, म्हणूनच आता ह्या इथे प्रकर्षाने आपण नीट लक्षांत घ्यावे, कि सत्गुरू मिळणे, तसेच त्या सत्गुरुंची सेवा करायला लाभणे, हे तुमच्या किंवा माझ्या फक्त मनांवर वा इच्छेवर अवलंबून नाही, तर ज्याच्या त्याच्या, कर्मावर व मनाची ओढ, निव्वळ ह्यावरच अवलंबून असते. आणखी एक महत्वाची बाब येथे सांगणे फार गरजेचे वाटते, कि "ज्याला, त्याच्या कर्मफ़लावर व मनाच्या ओढीवर सत्गुरू लाभतो, तोच त्याला मिळालेल्या ज्ञानाचे "'समाजोपयोगी कर्मांत उपयोग करून' त्याचे सोने करून दाखवतो."
    से आता आपण वाचले, परमेश्वराला ज्याप्रमाणे आपला भाव व आपली श्रद्धा हवी असते, त्याचप्रमाणे सत्गुरुला देखील ह्याच दोन मुख्य भावना त्याच्या शिष्यांमध्ये, अभिप्रेत असतांत. चला तर प्रथम आपण म्हणजे काय? ह्याअगोदर सत्गुरू ह्या शब्दाची व्याख्या काय आहे? हे पाहणे फारच गरजेचे ठरते.
    "स" ह्या शब्दाचा अर्थ आहे, "सकारात्मक." "स" ला जेव्हा "त किंवा द" जुळतो, त्यावेळेस "सत" किंवा "सद" चा अर्थ होतो, "सत्य" (जीवनाचे खरे मुल्य, जे मुलभुत सत्य, असे आहे ते मुल्यवान "परमसत्य"). "गु" म्हणजे "अंधःकार," "गुह्य" म्हणजे लक्षांत न येणारे, आणि "रु" म्हणजे प्रकाश. आता ह्या सर्व शब्दांचा मिळून असा अर्थ होतो, कि जेथे काहीच लक्षांत न येणाऱ्या अशा "अंधःकाररुपी अज्ञान" चे वास्तव्य असते, तेथे "परमसत्याचा, शाश्वत स्वरुपाचा, शाश्वत प्रकाश" जो पाडू शकतो, तोच "सद्गुरु" होऊ शकतो व होतो. असा सद्गुरु आपल्या शिष्याला जेव्हा ईश्वरीय परम तत्वाची ओळख करून देतो, त्या वेळेला, ज्या प्रमाणे एखादी विद्युत उपकरणाची वायर इलेक्ट्रिकला जोडलेले असता, आपण बटन दाबले कि उपकरण चालू व्हायला फक्त निमिषमात्र सेकन्दचा वेळ लागतो, तेव्हढाच वेळ, ह्या जीवाची आणि शिवाची, म्हणजेच आत्म्याची व परमात्म्याची भेट व्हायला लागतो व पुरतो. ह्यावरून आपण सर्व असे लक्षांत घ्या, कि एकदा सत्गुरू मिळाला, त्याची कृपादृष्टी झाली, कि त्या शिष्याचे जीवनाचे मंगलमय व्हायला वेळ लागत नाही. त्याचबरोबर आपण हेही लक्षांत घ्या, कि ह्या गोष्टीकरता कुठलाही सत्गुरू, कुणाही शिष्याकडून, गुरुदक्षिणा म्हणून कधीही, कुठलीहि रक्कम किंवा काही ऐवज तर सोडाच, पण एकही पैसा घेतल्याचे, कुठलीहि पूजा, कुठलेही कर्मकांड करायला सांगण्याचे तर सोडाच, पण साधी अगरबत्ती देखील लावण्यांस किंवा आणण्यांस सांगितले, असे आजपर्यंत ऐकिवांत नाही. तरीपण तसेच जर कोणी मागत असेल, व करायला सांगत असेल, तर आपण निश्चितच समजून चला, कि काहीतरी खोटेपणा ह्यांत निश्चित आहे. कारण ईश्वरालाच ते मुळांतच मंजूर नाही.
    तापर्यंत प्रिय वाचकहो, आपण जे काही वाचलेत, मनन केलेत, त्यावरून आपण सर्वांना साहजिकच कळले असेलच, कि ईश्वराला, सद्गुरूला आपल्याकडून काय अभिप्रेत असणार व आहे. तसेच सद्गुरूची व्याख्याहि कळली, त्यामुळे आपणाला सद्गुरु ओळखणे व समजणे अवघड होणार नाही. कारण आज स्वतःला सत्गुरू म्हणवणारे अशा व्यक्ती गल्लोगल्ली स्वतःची जाहिरात करतांना दिसतांत व सापडतांत. ह्यापुढे आपण कोणीही, कोणाचीही तपासणी त्याप्रमाणे करू शकता. लक्षांत घ्या, ईश्वराचे निजस्वरूप "परम तत्व" दाखवणे व समजावणे, जेव्हढे सोपे वाटते, तेव्हढेच समजणे देखील कठीण आहे. जे फक्त आणि फक्त सत्गुरू आणि त्याचे आशीर्वाद लाभलेले परम शिष्यच करू शकतांत. ह्याइथे अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ईश्वराचे, परमतत्वाचे ज्ञान लाभलेले शिष्य, हे एकमेकांना सत्गुरुंचे रूप मानून तेव्हढाच आदर, सत्कार व सन्मान देतांत, कारण, "परम तत्वाचे" ज्ञान लाभल्यावर, तो शिष्यदेखील पावन होतो. प्रिय वाचकहो, आपण जे आतापर्यंत वाचले व पढे वाचाल, ते न विसरता, त्याचे चिंतन व मनन करत रहा, तुमची दृढ आस्था, तुमचा भाव, तुमची श्रद्धा, ह्या ईश्वराला जरूर इतकी मजबूर करेल, कि तुमच्याकरता सत्गुरुंची सोय, तो परमेश्वर स्वतःच करेल, हा विश्वास मनी बाळगा व जागा ठेवा.
    दाचित आता इथपर्यंत आपण आल्यानंतर, आपणा सर्वांना असे वाटू लागणे सहाजिकच आहे, कारणही तसेच आहे, दासला कळते, तुमच्या मनाचा गुंता कुठेतरी होतोय किंवा झालाय, कि जेव्हा आपण ईश्वराला ओळखत नाही, त्याचे निजस्वरूप परमतत्व आपल्याला माहित नाही, तर आपली प्रार्थना, आपला भाव, आपली श्रद्धा त्या परमेश्वरापर्यंत कशी पोहोचेल? काळजी करायचे मुळी कारणच चुकीचे आहे. कसे आणि काय? चला तर आपण नीट समजून घेऊया. प्रथम हे लक्षांत घ्या, कि "जरी आपण म्हणजे आपले मन," त्या ईश्वराप्रती अनभिज्ञ असले, तरीही तो ईश्वर, आपणा सर्वांना तर सोडाच, पण प्रत्येक किड्या व मुंगीला, ओळखतो. ह्याचाच अर्थ ईश्वर आपल्याला (आपल्याकरता) अनभिज्ञ असला तरीही, ईश्वराला (ईश्वराकरता) आपण कधीही केव्हाही अनभिज्ञ नाही आहोत. ह्याचाच अर्थ, आपली एकेक कृती, एकेक भावना, असे सर्वकाही त्याच्यापासून लपून राहू शकत नाही, तर आपली आस्था, आपली भावना, आपली प्रार्थना, त्याच्यापासून कशी लपून राहील? लक्षांत घ्या, ज्याप्रमाणे मोठी मेणबत्ती, त्याच्यापासून पेटलेल्या अनेक लहान मेणबत्त्या, त्यांचा पडलेला एकत्र प्रकाश, हे उदाहरण, वास्तवांत कसे आहे? त्याचा विचार करून, आपण त्यातलाच भाग कसे आहोत, हे विचारपूर्वक आपल्या मनांत रुजवलेत, तर निश्चित सांगतो, कि तुमची प्रार्थना सफल न होण्याचे काहीही कारणच उरणार नाही, नाहीच रहाणार. म्हणूनच आपण, आपल्याठायी ईश्वराप्रती ज्या भावना असायला पाहिजेत, त्या ठेवून आपली निष्ठा, कायम जागृत ठेऊन, आपल्या प्रार्थनायोगे, ईश्वराला नेहेमी आपण समर्पित राहूया, जेणेकरून आपले व आपल्या आत्म्याचे कल्याण होईल.
    ता हीच भावना, ईश्वराची प्रार्थना म्हणतांना, आपल्या मनांत अधिक प्रेरक व परिणामकारक रित्या कशी काय रुजू शकेल? आणि रुजवू शकतो? हे आपण पाहुया. कारण सर्वांना माहित आहे, कि माणसाचे मन अतिशय चंचल आहे, त्याला एकाजागी थांबवणे जिकीरीचे काम असते, व त्यामुळे आपली प्रार्थना कदाचित सफल न होण्यास कारणीभूत ठरू शकते. काळजी करू नका, पुराणांत असे मार्ग, ज्याला साधारण पुजेपेक्षा, अत्त्युच्च मानले व वर्णले, असे मार्ग अगोदरपासूनच विस्तार करून ठेवले आहेत, जे त्या वेळेला त्या लोकांना, व आता आपल्याला देखील, फारच सोपे आणि सहज जमणारे, तसेच अधिक ईश्वरासमिप घेऊन जाणारे, ठरतांत व आहेत, हे अनुभवांती सिद्धदेखील झाले आहे.
    क्षमा करा, आपण पुढे हि प्रार्थना म्हणण्याची, पूजा कशी करण्याची हि क्रिया, वाचून म्हणाल, कि हे अगोदर का नाही सांगितले? परंतु लक्षांत घ्या, कि कोणत्याही गोष्टीच्या माहित पडण्या अगोदर, आपली संपूर्ण मानसिक बैठक तयार व्हावी लागते, अन्यथा त्याचा जो परिणाम व्हायला पाहिजे असतो, तो न होता, काही वेगळेच निष्पन्न होऊ शकते, असे होण्याची शक्यता फारच असते, व होते देखील. म्हणूनच आता हीच योग्य वेळ आहे, आपणाला हि पूजाविधी सांगण्याची व समजावण्याची, ज्यामुळे म्हणजेच ह्यायोगे, आपण एकट्याने, आपल्या शरीराने, शांत मनाने, शांत चित्त व वृत्तीने ईश्वरासमिप, कुणाचाही आधार न घेता, आपण स्वतःच स्वतःला, स्वतःच्या मनःशक्तीने, निश्चितच घेवून जाऊ शकता.


Pg 22

मानसपूजा
    हि पूजा सुरु करण्या अगोदर नेहेमीप्रमाणे आपली आन्हिक (प्रात:र्विधी, स्नान) उरकून, स्वच्छ कपडे घालून, जेथे साधारण किंवा भरपूर सुर्यप्रकाश अशा एका स्वच्छ खोलीमध्ये किंवा स्वच्छ जागी जमिनीवर, पूर्व दिशा, जमत नसेल तर पश्चिम दिशा, करून, आपले आसन ठेवून बसा किंवा उभे रहा. (लक्षांत ठेवा, ह्या "मानास्पुजेला" गंध, फुल, हार, नारळ, अगरबत्ती किंवा तत्सम वस्तूंची काहिएक गरज नसते.) तसेच हि मानसपूजा, आपण कधीही, कितीही वेळा करू शकतो, फक्त हाथ, पाय व चेहेरा धुवून, स्वछ कपडे, घातलेले असावेत, जेणेकरून आपले मन व चित्त शांत व प्रसन्न राहून, ध्यान लागण्यास योग्य वाटावे.
१. डोळे मिटून, त्याच अवस्थेत, प्रथम आपल्या मनाला व चित्तवृत्तीला शांत करून एकाग्र करा. नंतर त्या मोठ्या मेणबत्ती आणि अनेक छोट्या मेणबत्तीचे उदाहरणाची आठवण करून, दुसऱ्या माशाच्या उदाहरणाची आठवण करून, आपल्या मनी जागृत राहू द्या. त्यानंतर आपण ज्या देवाची (शक्तीची) उपासना (प्रार्थना) नेहेमी करता, त्या देवाची सुंदर व सस्मित अशी पावन मूर्ती, आपल्या कल्पनाशक्तीने, आपल्या मन:पटलावर येवू द्या, दृश्यमान होऊन द्या.
२. ज्यावेळेस अशी सुहास्यवदन पावन मूर्ती, आपण आपल्या मनी म्हणजेच आपल्या ध्यानी आणण्यास यशस्वी झाल्यानंतर, कल्पना करा, चारही बाजूला म्हणजेच सभोवताली, सुंदर सुंदर, ताजी फुल उमललेली अशी लहान लहान झाड, लता, वेली अशा वनराईने नटलेली आहे, व त्याचा सुगंध आसमंतात दरवळत आहे. आता त्याच ध्यानमग्न अवस्थेत, आपल्या अगदी बाजूलाच असलेल्या काही झाडावरून तर काही वेलींवरून सुंदर ताजी फुल तोडून, आपल्या समोर असलेल्या त्या देवतेच्या मूर्तीच्या चरणी वहा. त्यानंतर जसे मासा ज्याप्रमाणे पाण्यांत राहून त्याच्या सभोवताली त्याचे जिवनतत्व भरलेले आहे, तसेच संपूर्ण वातावरणांत, आपल्या वर खाली, सभोवताली अशीच परमशक्ती भरलेली असून, आपणहि त्या अथांग महासागरांत त्याचाच एक हिस्सा आहोत, ह्याची पुरेपूर जाणीव ठेवून, त्या डोळे मिटलेल्या (ध्यानमग्न) अवस्थेत, कल्पना करा, कि त्या देवतेच्या सुहास्य वदनाकडे पहात आहांत, व त्या देवतेची प्रार्थना किंवा आरती जे तुम्हाला योग्य वाटते ते मनातल्या मनांत म्हणा. (लक्षांत ठेवा, आपली हि प्रार्थना कमीतकमी १५ मिनिटे तरी झाली पाहिजे, कारण त्या देवतेशी आपले मन एकरूप व्हायला, कालावधी तेव्हढा मध्यन्तरी असावा लागतो.) जर तुम्हाला वाटले तर हीच प्रार्थना जास्तही वेळ करू शकता..प्रार्थना म्हणून संपल्यावर, त्याच ध्यानमग्न अवस्थेत, त्या देवतेला, तो "परमात्मा," त्याच्या निजस्वरूप "परम तत्वाची" ओळख करून देण्याकरता विनंती कमीत कमी तीनवेळा करा.
३. त्यानंतर त्या परमात्माला जरी तुम्ही ओळखत नाही तरी त्याच्याकडे "हे परमात्मा माझे जे काही आतापर्यंत चुकले असेल, पाप घडले असेल, ते मला अज्ञान बालक समजून माफ कर, व मला, माझ्या कल्याणार्थ सत्गुरू मिळवून दे," अशी विनंती नमन करत, तीनवेळा केल्यावर, परत नमन करून तुम्ही ध्यानावस्था सोडू शकता. अशी तुमची चांगल्या कामाकरता केलेली विनंती व मागणी, त्या परमात्माच्या चरणी ताबडतोब मंजूर होते. परंतु लक्षांत ठेवा, तुमची मागणी किती दृढ निश्चयाने केलेली आहे, हे पहाण्याकरता "ईश्वर" जरूर तुमची प्रार्थना व विनंती कितीवेळा एकमग्न होऊन, ध्यानपूर्वक करता, हे जरूर पाहील. (टीप: लक्षांत ठेवा "ईश्वर" तुम्ही अगोदर जी काही पाप केली, ती अजाणतेपणाने केली, असे समजून तुमची पाप क्षमा करेल, पण त्यानंतरही, जाणूनबुजून केलेल्या पापांना तो "ईश्वर" तुम्हाला अधिक दोषी मानेल, हे सर्वथा लक्षांत असू द्यावे.)
    पण सर्व वाचकहो, आपण सुज्ञ आहांत, आपणाला माहित आहे, जोपर्यंत बालक रडत नाही, तोपर्यंत माता, बाळाला दुध पाजत नाही, ह्याचाच अर्थ, जोपर्यंत रडत नाही, तोपर्यंत ईश्वराची, म्हणजेच ईश्वराकरता, आपल्याला असलेली भूक मिटणार नाही. ह्याइथे आपण लहान बालक असू नाहीतर कितीही वयाने मोठे, परमेश्वरासमोर आपण नेहेमीच बालकच आहोत, व रहाणार. तसेच ज्याप्रमाणे एक माता, आपल्या बालकाला जास्त वेळ रडू देत नाही, त्याप्रमाणेच परमेश्वरही आपल्या बालकाला, त्याच्या आत्म्याच्या कल्याणाकरता जास्त वेळ रडू देणार नाही, ह्याची खात्री बाळगा.

महत्वाच्या सुचना:
१. आपण हि मानसपूजा, सुरु करण्याच्या अगोदर, काही म्हणजे सात दिवस अगोदर पासून, वस्तुनिष्ठपणा व स्वार्थीवृत्ती सोडण्यासाठी, आपल्या मनावर ताबा मिळवावा लागेल. तसेच मानसपूजा सुरु केल्यावर त्या वृत्तीला कायमची तिलांजली द्यावी लागेल.
२. मानसपूजा चालू असतांना किंवा झाल्यावर तत्सम स्वार्थी बुद्धीने काहीही कोणत्याही, ईश्वरप्राप्ती शिवाय, आपल्या काम-धंदा तोही नैतिक मार्गाने, आरोग्य, यांच्या शिवाय स्वतः करता अन्य प्रकारच्या कोणत्याही सफलतेची मागणी करू नका. परमेश्वराला ते मंजूर नाही. कारण ईश्वराला कुणाला कधी काय द्यायचे, कसे ठेवायचे, हे सर्व माहित असते व ते तो ठरवतो. मात्र तुम्ही तुमची प्रार्थना झाल्यावर, दुसऱ्या कुणाच्याही करता, जसे त्याच्या आजारपणातून बरे होण्याकरता, तसेच त्याच्या दीर्घायू बद्दल मागणी करू शकता. किंवा त्याने केलेल्या फक्त चांगल्या कार्याच्या सफ़लतेकरता, आपले सहमत नोंदवू शकता.
(लक्षांत ठेवा, जो भक्त, दुसऱ्यांकरता, समाजाकरता, मानवतेकरता, त्याच्या कल्याणार्थ मागणी करतो, तो भक्त, ईश्वराला सदैव अत्यंत प्रिय असतो.)

काही अशाच अनुषंगाने, अजून काही उलगडा करावासा वाटतो, कदाचित काहीवेंळी, आपणांस काही आर्थिक किंवा सांपत्तिक अडचणी आल्यांस, आपण कोणतीही आर्थिक मागणी न करता, फक्त होणारी अडचण सोडवून द्यावी, अशी विनंती, ईश्वरापाशी जरूर करू शकता. तसे बघायला गेले तर ईश्वर, आपल्या भक्तावर, आलेले संकट, जरूर निवारण करतोच करतो, फक्त तो योग्य संधीची वेळ ठरवतो. व त्याला वेळ लागतो, म्हणूनच आपले धैर्य सुटून देता कामा नये. त्याकरता ईश्वर आपणांस सहन करण्याची ताकद (बळ) देवो व सुबुद्धी देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    र आपणांस जी मानसपूजाविधी, सांगितली, समजावली, कशी वाटली? आहे कि नाही सोप्पी? ह्या प्रार्थनेकरता, कुठेही जावे यावे लागत नाही, ताजा गंध उगाळणे, ताजी सुवासिक फुले व हार बाजारांत शोधणे, अगरबत्ती व काडेपेटी संभाळणे, नारळ चांगला कि वाईट, लहान किंवा मोठा, त्यांतच महत्वाचे म्हणजे काही वस्तूंचा बाजारांत अवेळी असणारा अभाव तसेंच त्याच्या किंमती, बरे पैसे मोजले तरी वस्तू चांगल्याच मिळतील ह्याची शाश्वती तर बिलकुल नाही. अशा परिस्थितीत देखील हीच पूजा श्रेष्ठ ठरते, तसेच हि मानसपूजा मनोध्यानांतून केल्यामुळे, हि पूजा, साधारण पुजेपेक्षा श्रेष्ठदेखील आहे आणि पुराणांत तसे त्याचे वर्णनदेखील आहे, आता आपणच सांगा? का हि अशी, साधी, सोपी व सरळ, जी चित्पावन पूजा आहे, ती करू नये? तसेच ह्या पूजेचे आणखीही काय फायदे आहेत? त्याचाही उलगडा करून, आपणांस पुढे सांगतो, जे वाचल्यावर आपण सर्व वाचकहो, निश्चितच अशीच पूजा करण्यांस प्रवृत्त व्हाल, व त्यांतच आपला क्षणिक नाही, तर कायम फायदाच आहे हे कळेल, या ध्यान करून केलेल्या मानस पूजेची महिमा अपरंपार आहे, ह्याचे पुरातन काळापासून पुरावे देखील आहेत. फक्त तम्ही "शुभस्य शीघ्रम" सुरवात करा, तुम्हाला देखील त्याची खात्री पटल्या शिवाय रहाणार नाही, याची दासला खात्री आहे.
    पण कोणत्याही जाती धर्माचे असू, किंवा काय पूजाविधीचे पालन कर्माने करत असू, त्याला महत्व प्राप्त होऊ शकत नाही, कारण त्याला महत्व तेव्हाच प्राप्त होते, जेव्हा ते मनःपूर्वक आपण करतो. सर्वसाधारणपणे बघायले गेले, तर कोणी रोज देवाच्या प्रतिमेला पुसतो, गंध, फुल व हार घालतो, १० ते १५ मिनिटे श्रद्धेने प्रार्थना म्हणतो, नमन करून, आपल्या दैनिक कामांस सुरवांत करतो, आणि केव्हातरी महिन्यातून एकदा किंवा कोणी फक्त सणासुदिच्याच दिवशी, घरांतल्या सर्वांबरोबर, मंदिरांत नमस्कार, करायला जातो. तर कोणी दररोज, त्याच्या देवाच्या फोटोपुढे (मूर्तीपुढे), श्रद्धेने दिवा लावून प्रार्थना म्हणतो, व आठवड्याला एकदा चर्चमध्ये जाउन, श्रद्धेने मेणबत्ती लावतो व सामुहिक प्रार्थना म्हणतो. जो तो आपल्या वाडवडील पासून जसे माहित पडले, लहानपणापासून करत आले, तसेच पुढेही करत आहेत. ठीक आहे, योग्यच आहे. हि माणसे एव्हढे तरी करतांत, काही जण तर हेही करत नाहीत. काहीही नसण्यापेक्षा, काहीतरी असणे, हे नेहेमीच चांगलेच ठरते. कारण पुढच्या येणाऱ्या यशाची तीच पहिली पायरी ठरते, व दासला खात्री आहे, कि हीच श्रद्धावान लोक, हि मानस पूजा जरूर करून बघतील, व ध्यानयोगांत रममाण होऊन, एकदम ईश्वरानिकट पोहोचतील, तसेच हीच ईश्वर साधना (मानस पूजा) त्यांना सत्गुरू मिळवून देण्यास कारणीभूत होईल, दास देखील अशीच पायरी चढत गेला, त्यानंतरच दासला सत्गुरुची प्राप्ती झाली. तशीच आपणा सर्वांना सत्गुरू मिळावा अशी ईश्वर चरणी सदैव प्रार्थना करतो.

पुढच्या प्रसिद्ध होणाऱ्या पानांत, हि मानसपूजा (ध्यानयोग) कशी व का श्रेष्ठ ठरते, ह्याचे थोडे अधिक विवेचन लिहिणार आहे.

आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.

Tuesday, October 6, 2015


पान नंबर १९ व २०
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी, आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

Pg 19
सत्गुरू आणि परमतत्वाचे केलेले विश्लेषण
    ह्यापुढे आपल्याला अजून जास्त चांगल्या पद्धतीने "परम तत्व" लक्षांत येण्याकरता, आणखी एक उदाहरण येथे देत आहे, ज्याचा उल्लेख "श्रीगुरुदेव दत्त" स्तुती श्लोकांत, अनादि काळांत, खालीलप्रमाणे फार सुंदररीत्या केला गेला आहे, व समजून घ्यावयास निर्विवाद अतिउत्तमच आहे. तसे पाहिले तर, ह्या अगोदर ह्यांतल्या पहिल्या दोन ओळी व त्याचा अर्थ, दासने समजावला आहे, तरीही हरकत नाही, आपण परत येथे "सर्वव्यापक" अर्थ समजून घेऊ म्हणजे आपल्या मनी कोणताही किंतु किंवा परंतु असे शब्द (शंका) येणार नाहीत.

श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः |
गुरुः साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः ||
ब्रह्मानंदं परमसुखदं, केवलं ज्ञानमूर्तिम |
द्वंद्वातीतं, गगनसदृशं, तत्वमत्स्यादिलक्ष्यं ||
एकं नित्यं, विमलमचलं, सर्वधीसाक्षिभूतं |
भावातीतं, त्रिगुणरहितं सत्गुरू त्वं नमामि ||

    ह्या संपूर्ण श्लोकांत पहिला श्लोक व त्याची टीका तसेच विशद केलेला अर्थ देखील, आपण पान नं. १६ मध्ये सुरवातीलाच वाचला. आता पुढील दोन श्लोकांची वेगवेगळी टीका व त्यांचा एकत्र विशद अर्थ, आपण पाहुया.

ब्रह्मानंदं परमसुखदं, केवलं ज्ञानमूर्तिम |
द्वंद्वातीतं, गगनसदृशं, तत्वमत्स्यादिलक्ष्यं ||
टीका:
ब्रह्मानंद देणारा, परमसुखदायक असा वाटणारा, अशी हि पावन गुरुज्ञानमूर्ती पाहून, मनी चलबिचल थांबविणारे, आकाशासारखे सर्वव्यापक प्रतीत होणारे, पाण्यांत राहूनही मासे लक्ष साधू शकत नाहीत, असे तत्व उलगडून दाखविणारे असे माझे गुरु.


एकं नित्यं, विमलमचलं, सर्वधीसाक्षिभूतं |
भावातीतं, त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ||
टीका:
एकसारखी, निर्लेप असून अढळ, सर्वभूतांना साक्षी असून, भाव नसणारे, तिन्ही गुण नसणारे, अशा सत्गुरुला माझा प्रणाम असो.


दोन्ही श्लोकांचा एकत्र विशद:
ज्यांना पाहून ब्रह्मानंदाचा व परमसुखाचा लाभ निश्चित होतो, असे माझे पावन श्रद्धास्थान, जे ज्ञानाने परिपूर्ण आहेत, जलाशयांत राहून माशाला ज्याप्रमाणे, त्याला त्याचे जीवनाचे तत्व कळत नाही, त्याप्रमाणे सर्वदूर पसरलेले, आभाळासमान असणारे, असे परमेश्वरीय तत्व, असे ज्ञान कि जे मनांत द्वंद्व (हलकल्लोळ) उडवते, न बदलणारे, कुठलेही आच्छादन न ठेवता, निर्लेप असणारे, अढळ राहून, सर्व भूत, वर्तमान व भविष्य काळाला साक्षी असणारे, सर्व भावांच्या पलीकडे असलेले, सत, रज आणि तम ह्या तीनही गुणांवर स्वामित्व राखून, हे गुण न बाळगणारे, अशा ईश्वरीय तत्वाचे अनुसंधान करून, त्याची कृपा करवून देणारे, त्याचे ज्ञान विवेचन करून निरुपण करणारे व समजावणारे, अशा माझ्या सत्गुरुला माझे कायम नमन (प्रणाम) आहे.


    मुख्यत्वे आपण आता माशाचे उदाहरण, जे कलियुगाच्या प्रारंभिक कालांतच दिले गेले, ते उत्तम तऱ्हेने विशद केलेलेही पाहिले. माशाला पाण्यांत राहूनदेखील त्याला जसे त्याच्या जीवनाचे तत्व कळत नाही, पण जेव्हा कोणीतरी त्या माशाला जर पाण्याबाहेर काढले, तर मात्र लगेच निमिषमात्र वेळांत, त्या माशाला, त्याच्या जीवनतत्वापासून बाहेर (लांब) आल्याची जाणीव होते, व तो मासा तडफडू लागतो, हवा असून श्वास घेऊ शकत नाही, व थोडे अधिक वेळ पाण्याबाहेर राहिला तर त्याचा मृत्यू होतो. ह्याचाच अर्थ त्या माशाला पाण्याबाहेर आल्यानंतर, त्याच्याकरता अनन्य व असाधारण असे, त्या "पाणी" ह्या तत्वाचे महत्व कळले, परंतु नंतर कळून त्याचा काय उपयोग? नाही का?
    काय तुम्हाला असे नाही वाटत? जेव्हा आपल्याला गती प्राप्त होण्याची वेळ येईल, ईश्वराकडे परत जाण्याची वेळ येईल, त्यावेळेस नेमकी अशीच काहीशी परिस्थिती निर्माण होईल? आपली देखील अशीच तडफड होईल, कारण आपल्याला देखील आपले खरे तत्व म्हणजे जे ईश्वरीय परमतत्व नेमके काय आहे? कुठे आहे? त्याची व आपली काय सांगड आहे? माहित नसेल, तर काय होईल? निश्चितच आपणही भरकटणार, ह्यांत काहीच शंका नाही. ज्याअर्थी असे होते, त्याअर्थी असेही होते, आपण आपल्या "निजस्वरुपांत," म्हणजेच "ईश्वरीय परमतत्वांत" सामील होणार नाही, म्हणजेच आपला आत्मा हा "अशांत" रहाणार. म्हणजेच ह्याचा अर्थ असाही होईल, कि एव्हढा "मौलिक मानव देह" परमेश्वराने आपल्याला देऊन देखील व आपल्याला लाभून देखील, आपण त्याची, त्या परमतत्वाची माहिती करून घेतली नाही, त्याची भक्ती केली नाही, म्हणजेच ह्या पूर्ण आयुष्याची मात्र निव्वळ मातीच केली. आता ह्याशिवाय दुसरा काही अर्थ निघतो का? आपणच सांगावे.


Pg 20

    ह्याकरतांच परमेश्वर आपल्याला वारंवार आगाह (जाणीव) देतो, कि हे मानवा, तुला मी, तुझ्या आत्म्याचे सार्थक करून घेण्याकरता तुला सर्वोत्तम असा मानव देह दिला, सर्वोत्तम अशी बुद्धी दिली, तुझ्याकरता वेद, पुराण, बायबल, कुराण अशा धार्मिक तसेच मानवता शिकवणारे ग्रंथ लिहिले, तुझ्याकरता ह्या सर्व सृष्टीची रचना केली, संपूर्ण निसर्ग तुझ्या हवाली केला, तुला जे काही पाहिजे ते घेण्यासाठी तुला हात व पाय दिले, विचार करण्यांस बुद्धी दिली, काय खावे, काय प्यावे, काय नेसावे हे ठरवायचे स्वातंत्र्य दिले, तुला जी माझे निव्वळ प्रतिस्वरूप, अशी दया, करुणा, ममत्व ह्या अशा भावनांनी युक्त आई दिली, तुला तुझ्या पालन पोषणार्थ काळजी घेतील असे वडील दिले. जेणेकरून तू खुश रहावास, व तुझ्या भक्तीमार्गांत तुला काहीही अडचण येऊ नये ह्याची व्यवस्था केली. असेही नाही कि, सदा सर्व काळ माझी भक्तीच कर, म्हणून सांगितले, तर भगवत गीता मध्ये लिहून ठेवले, कि तू तुझे कर्तव्य व कर्म करत करतच माझी भक्ती कर, तसेच असेही उधृत केले कि कर्मयोग हा अत्युच्च असा भक्तीयोग (भक्तिमार्ग) मी मानतो, व अशीच केलेली भक्ती मला पोचते व पावते.
    तुझ्या कल्याणार्थ सत्गुरू व संत निर्माण केले, व त्यांनी मानवकल्याणार्थ अनेकप्रकारे, अनेक भाषांमध्ये भक्तीसाहित्याची निर्मिती केली, तसेच उपदेशही केले. परंतु हे मानवा, ज्याप्रमाणे लहान बालक, त्याला दिलेल्या एखाद्या किंवा अनेक आकर्षक खेळण्यांमध्ये रमते, त्याला खाण्यापिण्याची देखील शुद्ध रहांत नाही, त्याप्रमाणे तू मात्र तुझ्यासाठी, तुझ्या पालन व उपयोगासाठी मी निर्माण केलेल्या अनेक क्षणभंगुर तसेच नाशिवंत गोष्टींच्या लालसा व आकर्षणात अडकून त्याचा संचय करण्याची आकांक्षा बाळगून, राक्षसी वृत्ती जोपासलीस, व मानवतेला झिडकारलेस, तर त्यांत माझी काय चूक आहे? हि चूक तुझी स्वतःचीच असणार आहे. तुला मी रिकाम्या हाताने पृथ्वीवर पाठवले, तसेच परतीला तू रिकाम्या हातानेच परत यायचे आहेस, हे कायम माहीत असतांना सुद्धा त्याच आकर्षणांत अडकून पडलास. परंतु नेहेमी प्रत्येक मानवाला जन्मांस घालतांना, असाच मानव जन्मांचा अर्थ गृहीत धरला, कि प्रत्येक मानव, पृथ्विलोकी जन्म पावल्यावर, आपल्या आत्म्याचे व ईश्वराचे निजस्वरूप जाणून, ईश्वराची प्रार्थना व त्याची भक्ती करून, आपला उद्धार करून, ज्ञानी होऊन, परमेश्वराच्या "परमतत्व" असे निजरुपांत, सम्मिलित होईल, म्हणजेच मोक्ष पावू शकेल अशी मी रचना केली.
    री हे मानवा आतातरी वेळ न घालवता शक्य तेव्हढ्या लवकर, ह्या निव्वळ मोहमयी मायेतून सूट, आपली वृत्ती समाधानी ठेवून, आपले ध्यान सन्मार्ग व भक्तीकडे लाव. त्यातच तुझे, तुझ्या मातापित्याचे, तुझ्या कुटुंबाचे कायम कल्याण होणार आहे, ह्यावर विश्वास ठेव. व कायम विश्वास ठेवून रहा. तुमच्या चंचल मनाला, तुम्ही संतांच्या समवेत लावलेत तर तुम्हाला काहीही कधीही कधीच अडचण येणार नाही, व आलीच तर त्या अडचणी बाबत संतांना सांगा, व त्यांना त्याचे निवारण करायला सांगा, काळजी करू नका, ईश्वर ते निवारण करण्यास समर्थ आहे, कारण ईश्वर मातापित्यांचे पायी व संतांच्याच ठायींच सापडतो, अन्यत्र कुठेही ईश्वर सापडणे कायम अशक्यच असते.
    प्रिय वाचकहो, आतापर्यंत लिहिलेले वाचून, विनाकारण काळजी करू नका, घाबरू देखील नका, कारण आपण इथपर्यंत जे लिहिले आहे ते संपूर्ण वाचत आलांत, ह्याचाच अर्थ असा होतो, कि आपल्याला परमेश्वराचे ज्ञान (ओळख) करून, त्याची भक्ती करणे आवश्यक असल्याचे पूर्णपणाने कळले आहे. ह्या अगोदरच्या पानी व ह्या पानांवर लिहिलेले जर आपल्याला व्यवस्थित कळले असेल व आपल्या मानव जीवनाचे मर्म म्हणजे ईश्वराला प्राप्त करणे आहे. इथपर्यंत जर आपण मनांशी ठाम झाला असाल, तर निश्चितच समजू घ्या, कि तुमची, आपली स्वतःची परमेश्वराकरता भक्ती, जेव्हापासून तुम्ही मेणबत्तीचे उदाहरण वाचावयांस सुरवांत केलीत, तेव्हापासूनच सुरवांत झाली आहे. तसेच आणखी यापुढे जसजसे तुम्ही पुढे वाचत जाल, तसतसे तुम्हाला ईश्वरीय सानिध्य कसे प्राप्त करावे ते सोपे करत आहे. त्याकरता कुठलाही तुमच्या ध्यानी येईल असा, पण ईश्वरीय श्लोक किंवा मंत्र, जर काहीच सापडत किंवा समजत नसेल तर, प्रत्येक पानी हेडिंगला "दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा" || हा मंत्र, सकाळी स्नानानंतर व रात्री झोपायच्या अगोदर, १०८ वेळा म्हणत चला. आस्ते आस्ते, लवकरांत लवकर, आपणाला अनुभूतींची प्राप्ती होण्यांस सुरवांत होईल. येथे आपल्या मनांत येईल कि दासने कुठलाही पण ईश्वराचा श्लोक किंवा मंत्र, असे का लिहिले व म्हटले? कारण अत्यंत साधे आहे, ईश्वराला तुमची त्याच्याबद्दल असलेली आंतरिक ओढ, तुमची आस्था ताबडतोब कळते. त्याला तुम्ही कोणत्याही नावाने आवाज द्या, मग तुम्ही कुठल्याही भाषेत त्याला तुमचा आवाज द्या, तसेच तुम्ही, कुठल्याही धर्माचे, कुठल्याही संप्रदायाचे, किंवा काळे वा गोरे असा, ईश्वर तो विचार कधीच करत नाही, कि करणारही नाही, कारण सर्व सजीव, निर्जीव व निसर्ग, त्यानेच निर्मिलेले आहेत. तुमची कर्म, तुमची आस्था जर स्वच्छ असतील तर, तुमची हाक ईश्वर ऐकतोच ऐकतो. ईश्वराला तुमचे ध्यान, तुमची प्रेरणा, तुम्ही केलेली तुमच्या मातापित्याची सेवा, मानवतेची सेवा, व त्याला ओळखून, त्याचे नुसते नामस्मरण पाहिजे आहे. ध्यानांत ठेवा, ईश्वराला तुमचा हार नको, नारळ नको, गंध व अक्षता नको, तुमच्या मिष्टान्न (प्रसाद) नको, तर त्याला तुमच्या मनाच्या समर्पणाची व मानवतेकरता तसेच त्याने निर्मिलेल्या निसर्गाच्या जपणुकीची आवश्यकता आहे. म्हणजेच ज्याचा स्वामी स्वयं परमेश्वर आहे, त्याला तेच काय देऊ करता? त्याला तर तुमच्या, इतरांप्रती असलेली दया, करुणा, सेवाभाव व ईश्वराचे नामस्मरण एव्हढेच हवे आहे. आणि १००% खात्री बाळगा, जसजसे आपण ह्यावर चालू लागाल, तसतसे आपण एक वेगळीच व्यक्ती म्हणून समाजांत स्थान प्राप्त कराल व ईश्वराच्या चरणी, आपली सेवा रजू होण्यास सुरवात होईल.
    थपर्यंत आल्यानंतर, साहजिकच माझे निस्सीम वाचकहो, आपणा सर्वांना सत्गुरू म्हणजे काय? तो कसा असतो? त्याची लक्षणे काय? त्याला कसा ओळखावा? हे प्रश्न मनांत खळबळ माजवत असतील. कारण दासला अंदाज आहे कि कितीही समजावून परमेश्वराबद्दल सांगितले, तरी त्या परमेश्वराचे अस्तित्व तसेच ओळख देण्यांस शब्द कमीच पडतांत. विचार करा, चार वेद, सहा शास्त्र व अठरा पुराण त्याचबरोबर अनेक संतांनी, अनेकविध मार्गांनी शब्दांनी सांगण्याचा तसेच शब्दांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही, कारण त्यासाठी शब्दच अपुरे पडतांत, तर समजून घ्या दासाचे शब्द किती पुरे पडतील? तरीही साध्या शब्दांनी, सहज रीतीने व सोप्या उदाहरणाने समजावून घेऊन, आपण खूपच ईश्वराच्या जवळ आलो आहोत तसेच आपल्याला ईश्वरापर्यंत पोचण्याकरता सत्गुरुची आवश्यकता भासते. म्हणूनच सत्गुरुंचे महत्व अनन्य व असामान्य आहे, म्हणून त्याकरता सत्गुरुला कसे प्राप्त करावे, हेही आपण पुढच्या पानी लक्षांत घेऊया..

पुढे प्रसिद्ध होणाऱ्या पानांत, प्रिय वाचकहो, आपण सर्वांकरता, सत्गुरुची ओळख, त्याचे वर्तन, त्याचे वर्णन कसे असते, ह्याबद्दल आपणांस माहिती करून दिली जाइल.

आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.