Sunday, September 13, 2015


पान नंबर ११ व १२
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी, आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

Pg 11
              सुविचार
हाताने, फेकलेला एक दगड, साधारण १०० फुट दूर जातो,
बंदुकीतून निघालेली गोळी, १००० फुट दूर जाते,
तोफेचा गोळा, ५ मैल दूर जातो,
अजूनही विज्ञान आधारे हजारो मैल दूर जाणारे क्षेपणास्त्र निर्माण होईल,
परंतु
एका गरिबाला, दिलेला एक भाकरीचा तुकडा,
स्वर्गाच्या दरवाज्यापर्यंत जातो.


    ह्यांनंतर, श्रीमद्सद्गुरू नृसिंहसरस्वतीजींनी, परमेश्वराने कलीला सांगितलेली, त्या चित्पावन सत्गुरुंची व त्याच्या शिष्योत्तमाची सांगितलेली कथा, आपल्या ओघवत्या रसाळ वाणीने परमेश्वराच्याच शब्दांत सांगण्यास सुरवांत केली.
    हे कली, त्या शिष्योत्तमाची कथा, तुला विस्तारपूर्वक सांगतो ती लक्ष्यपूर्वक ऎक, पूर्वी गोदावरी नदीच्या तीरी, ऎका थोर, आंगिरस नांवाच्या मुनींचा आश्रम स्थित होता, तेथेच वेगवेगळ्या, नानापरींचे वृक्ष, लता असतांना, पुण्य जातींचे मृग (हरीण) देखील वास करीत होते. तसेंच तेथे अनेक ब्रह्मर्षी देखील वास करून, तप व अनुष्ठान करायचे. त्यांतच एक "वेदधर्म" नावाचा, ब्राह्मण मुनी, ज्याच्याकडे अनेक शिष्य, वेदशास्त्र अभ्यास करायचे. त्यांतच एक "दीपक" नावाचा शिष्य, जो शास्त्रपुराणांत पारंगत असून, त्याच्या गुरुप्रती सेवाधर्मांत नेहेमी पुढेच रहायचा.
    क दिवशी, ह्या वेदधर्म ब्राह्मणाने, आपल्या सर्व शिष्यांना फक्त संदीपकला, सोडून बाकी सर्वांना, एकत्र बोलावून, प्रसन्नचित्त म्हणाला, हे माझ्या शिष्यगणहो, जर तुमचे माझ्यावर प्रेम असेल, तर तुम्ही मी जे सांगेन, ते ऎकाल? असे सर्व शिष्यांना विचारले.
    त्यांवर सर्व शिष्य एकसुरांत म्हणाले, तुम्हीच आमचे तारक आहांत, तुम्ही जी काही आज्ञा द्याल, ती आम्ही गुरुवचन मानून निश्चित पाळू, ह्याचा विश्वास ठेवा. आम्हाला माहित आहे, जो आपल्या गुरूंचे वाक्य पाळत नाही, तो नरक सारख्या रौरवांत पडून, त्याची सर्व विद्या संपुष्टांत येउन, ह्या मायासागरांत बुडून नामशेष होतो. मग त्याला कसली गती, तो तर नरकांत कायमचा खितपत पडणार. सत्गुरू हाच, ह्या सर्व परिस्थितींचा तारक आहे, हे तर वेदपुराणांत लिहिलेले व विख्यांत आहे.
    हे सर्व शिष्यांचे एकमुखाचे बोलणे एकुन, तो वेदधर्ममुनी संतोषला, आता त्याने, शिष्य संदीपकलाही बोलावून घेतले, व सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाला, तुम्ही माझ्या सर्व शिष्यानो, लक्ष देवून ऎका, माझे स्वतःचे अशी काही पूर्वार्जित आहेत, जी माझ्या पूर्वजन्मी, जन्मांतरीची सहत्रांपेक्षा अधिकच महापातक मी केली असतील जी मला ज्ञात नाहीत अशी, त्यांकरता मी आत्तापर्यंत अनेकविध यज्ञ केले व अनुष्ठान केली, बरीच पातक त्यांत धुवून गेली, परंतु काही बाकीच राहिली, जी भोगल्याशिवाय त्याचा उपचार होणार नाही असे मला दिसून आले व त्याची जाणीव झाली. तपसामर्थ्याने, आपण पापांच्या भोगांची निष्कृती करतो, म्हणजेच आपण हे भोग काही काळ पुढे ढकलतो, परतू हे पाप आपल्याला मोक्ष मिळायच्या आड कायम, येतच रहाते, त्याच्याकरता मी निश्चय केला, कि हे भोग, आता भोगूनच संपवायचे, त्याशिवाय ह्या उरलेल्या पापांची निष्कृती होणे शक्य नाही. आता ह्यासाठी, अखिल शास्त्रांत ज्याप्रमाणे लिहिले आहे व सांगितले, त्याप्रमाणे वाराणसी नगरी जाउन, मी स्वयं हे भोग माझ्या देही भोगू इच्छितो, फक्त त्यावेळी माझ्या जर्जर अवस्थेमध्ये मला कोणीतरी सांभाळावे लागेल, तरी समस्त तुमच्यामध्ये, असा कोण आहे, जो हे कार्य आनंदाने स्वतः होऊन स्वीकारेल व अंगीकारेल? (करण्यास तयार होईल?)
    त्यावेळी, तत्क्षणी त्या शिष्यांमधला एक शिष्य, ज्याचे नांव संदीपक, विवेक ठेवत, प्रणाम करून, गुरुमुख पहांत आपल्या गुरूला म्हणाला, पाप करणे हे तर निश्चितच स्वदेहाचा नाश करणेच आहे, म्हणूनच ह्या पापांचा म्हणजेच ह्या दु:खांचा संग्रह (डोंगर) ठेवणे वृथाच आहे, म्हणूनच शीघ्र (लवकर) ह्याचा निःपात करणे (संपवणे), हेच योग्य असेल.
    संदीपकचे बोल एकुन, वेदधर्म त्याला म्हणाला, ज्यावेळी मनुष्यांस आपले शरीर दृढ (धडधाकट) असेल, तेव्हांच त्वरित पापक्षालन करावे हे योग्य, नाहीतर ते तर अंगामध्ये विष जोपासून वाढ करणेंच होते, अन्यथा तीर्थ, प्रायश्चित्त करून, उरेल ते लवकरांत लवकर स्वतः आपल्या देही भोग भोगून, पापक्षालन करावे, तोपर्यंत आपणांस मुक्ती मिळणे शक्य नाही. हे कोणीही जरी देव वा साधूमुनिवरांना, मनुष्यांतले ज्ञानी लोकांना म्हणजेच तो कोणीही असला, तरीहि त्याला चुकू शकत नाही, हे निर्विवाद सत्य आहे.
    पल्या गुरूंचे बोल मनांत साठवत, शिष्य संदीपक म्हणाला, स्वामिनाथा, आपण निश्चित, आपला माझ्यावर भंरवसा असून द्यावा, जे काही कार्य असेल ते काहीही अनुनयविनय (तमा, संकोच) न बाळगता मला सांगावे, माझी यथाशक्ति, मी आपली सेवा करेन, व त्यांकरता सदैव तुमच्या सेवेला व मदतीला कायम हजर राहीन.
    हे शिष्य संदीपकचे वचन ऎकुन, गुरु वेदधर्म म्हणाला, मी हे भोग भोगण्यादरम्यान, सर्वांगावर कुष्ठ होऊन काही अंग कार्यहीन होतील, माझ्या डोळ्यांवर परिणाम होऊन, मी कदाचित आंधळा व पांगळा देखील होईन, ह्या भोगांचा काळ थोडा नाही, तर एकवीस वर्षे असणार आहे. मला कायम पुष्कळ सांभाळावे लागेल, म्हणूनच जर तू तुझ्या मनी दृढ असशील, तरच ही माझी सेवा स्विकारावीस असे माझे सांगणे आहे.


Pg 12
कृपया हिकडे लक्ष्य द्यावे!
पाणी, हि आपल्या, जीवनाची सर्वांत मोठी गरज आहे. पाण्याला, जास्त आहे किवा जास्त मिळते, म्हणून वाया घालवू नका. पाणी हे परमेश्वराचे आपल्याला वरदान आहे. आपण, त्या वरदानाची कदर करत नाही, व ईश्वराच्या, निसर्गाच्या, प्रकोपाचे मात्र धनी होतो.
जरूर ध्यानांत ठेवा, व इतरांनाही अवश्य सांगा:
पाणी पितांना, दांत घासतांना, हात धुवतांना, भांडी घासतांना, आपण, किंवा अन्य कोणी जर पाण्याचा नळ, पूर्ण उघडून पाणी गरजेपेक्षा जास्त सोडले, तर आवश्यकतेपेक्षा तिप्पट, ते चौपट पाणी निव्वळ वाया जाते. तेच पाणी एका भांड्यात घेऊन वापरले असतां, असे लक्ष्यांत येते, कि पाणी फक्त २५% च लागले. आता आपण सर्वांनी, हेच पाणी असेच वाचवले, तर आज महाराष्ट्रांत, सर्व शहरांत व गावांत, एवढे पाणी वाचेल, कि संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्ध्या शेतीच्या पिकांना, ते पाणी पुरवून, महागाई कमी होण्यास मदतच होईल. शेतकऱ्यांना मदत होऊन, त्यांना आत्महत्या करावी लागणार नाही.
तरी जो कोणी किंवा आपण स्वतः, चुकत असाल, तर आपल्या स्वतःवर व सर्व महाराष्ट्रावर कृपा करा, व चुकणाऱ्याची चूक कृपया त्यांच्या लक्षांत आणून द्या.
आ. अशोक यादव.

    पल्या गुरूंचे म्हणणे ऎकुन, शिष्य संदीपक, निष्ठेने दृढचित्त होऊन म्हणाला, स्वामी गुरुराया, तुम्ही तुमचे हे सर्व पापभोग, मला द्या. मी आनंदाने कुष्ठी होण्यांस तयार आहे, एकवीस वर्ष आंधळा होऊन, तुमच्या पापांचे जे काही भोग असतील, ते भोगून सर्व पापनिष्कृती करेन, हे निश्चित आहे. तुम्ही लवकर हे कार्य माझ्यावरच सोपवा, आणि त्यायोगे, तुमचे सर्व पापहरण होईलच, ह्यावर निःसंदेह विश्वास ठेवा, असे म्हणतंच आर्जव करत, संदीपक आपल्या गुरुंच्या चरणी लागला.
    हे आपल्या शिष्योत्तम संदीपकचे बोलणे ऎकुन, गुरुर्षी वेदधर्म मुनी संतोषून, आपल्या पापांच्या भोगांची लक्षणे सांगत, म्हणाले, स्वतःचे पाप स्वतःलाच भोगावे लागते, ते कुणाही पुत्राला किंवा शिष्याला, ग्रहण करता येत नाही, आणि जर आपण स्वदेही नाही भोगले, तर हे पाप आपण वेचुच शकणार नाही, तो फांस आपल्या गळ्याला कायमचा रहाणार. ह्याकारणाने, मी माझ्या पापदु:खांना कसेही भोगेन, प्रिय संदीपक एकवीस वर्ष तू माझा सांभाळ करणे. जे मनुष्य रोगपीडित होतांत, त्यांच्यापेक्षा त्यांचा सांभाळ करणारेच जास्त कष्टी होतांत हेच सत्य आहे, म्हणून माझ्यापेक्षा जास्त कष्ट, हे संदीपक, तुलांच होणार आहेत, हे ध्यानांत ठेव. ह्याकारणाने निश्चयपूर्वक मी माझे भोग भोगेन, मला काशीनगरी नेउन माझा सांभाळ कर. काशीपुरी जाउन जेव्हा पापावेगळा होईन, शाश्वतपद पावेन, तेव्हां हे शिष्योत्तमा हे तुझ्याकरताही निश्चित पुण्यच असेल.
    संदीपक गुरूंची सेवा करायला मिळणार म्हणून आनंदून म्हणाला, हे गुरुवर, अवश्य तुम्हाला काशीपुरी घेऊन जाउन, तुमची एकवीस वर्ष, विश्वनाथाप्रमाणे सेवा करेन.
    ही कथा सांगतांना, मध्येच, परमेश्वराने कलीला विचारले, कसा वाटला, व कसा शिष्य होता त्या गुरुंचा? परमेश्वराच्या प्रश्नांवर, कली कांहींच बोलला नाही, त्याला तर उत्कंठा होती, पुढे काय काय वर्तले त्याची.
    रमेश्वराने, पुढे आपले कथाकथन चालू ठेवंत म्हणाला, आपल्या गुरूस, कुष्ठ रोगाची लागण होतांच, संदीपक त्यांना त्वरित काशीपुरी घेऊन गेला. उत्तरदेशांत मणिकर्णिकेला, कम्बळेश्वर जवळ, हे दोघे गुरुशिष्य, राहू लागले. त्यांचा रोजचा दिनक्रम, मणिकर्णिका नदीवर जाउन स्नान करणे, तेथून पुढे काशी विश्वेश्वराची पूजा करणे, असे करत तो मुनी (गुरु) आपले प्रारब्धयोग त्या स्थानी भोगू लागला. जसजसे दिवस जाऊ लागले,त्या मुनींचा कुष्ठरोग पुष्कळ वाढून, डोळ्यांनाही आंधळेपण येउन, त्यांची अवस्था फारच केविलवाणी व दु:खमय झाली. अशाही अवस्थेत, शिष्य संदीपक, त्यांची सेवा पूर्ण भक्तिपूर्वक करंत होता. आणखी काही दिवस उलटल्यांवर, त्या वेदधर्म मुनींचे सर्वांग कुष्ठ रोगाने व्यापून टाकले, व त्यांतून पु वाहून, किडेही पडू लागले, त्यामुळे त्यांची अवस्था अधिकच दु:खीकष्टी होऊन त्यांना अपस्माराने पार ग्रासून टाकले.
    शिष्य संदीपक, नित्य उदरभरणासाठी, भिक्षा मागून आणी व आपल्या गुरूंना देत असे, व आता काशी विश्वेश्वराची पूजा करण्यांस न जाता, आपल्या गुरुंनाच काशी विश्वेश्वर स्वरूप मानून, त्यांची एकभावाने पूजा करून, नित्य त्यांच्या सेवेस हजर राहू लागला.
    ता परिस्थिती अशी झाली, कि मनुष्यास रोगाने पिडले असतां, साधा माणूस असो, ब्राह्मण असो कि साधुजन असो, अशा अवस्थेमध्ये काहिएक वेळी तो अत्यंत लहरी, संतापी, चिडचिडा तसेच त्यायोगे त्यांचे भान जाऊन क्रूर होणे साहजिकच होते.
    सेंच त्या मुनींचे झाले, एखादे दिवशी, शिष्य संदीपकने भिक्षा आणली असतां, मुनी वेदधर्म, आज भिक्षा कमीच का आणली, म्हणून स्वतःलाच क्लेश करून. आणलेली भिक्षा जमिनीवर सांडून देत, तर कधी, भिक्षा जास्त का आणली, पण त्यांत मिष्टांन्न का नाही आणले म्हणून क्लेश करत रहायचे. काही दिवसांनी तर रोजच पक्वान्न का आणत नाहीस? मला असले साधे अन्न गिळण्याकरता तोंडाला चव नाही असे म्हणत अत्यंत कोपिष्ट होऊन, शाक भाज्यांची व मिष्टांनाची मागणी करत, शिष्य संदीपकला मारावयास धावू लागले. कधी तर, आणलेली सर्व भिक्षा वाया घालवून देत, रागारागाने अपशब्द व शिव्यांचा भडीमार करायचे. तसेच एखादे समयी, अत्यंत भावुक होत, आपल्या शिष्याला जवळ बसवून, म्हणू लागत, तूच माझा ज्ञानराशी, माझ्या कारणानेच कष्टत आहेस, तूच माझा शिष्यराया, शिरोमणी आहेस, असे म्हणत, परत तीक्ष्ण स्वराने म्हणू लागत, मी आता खूपच गांजलो, मला उठता येत नाही, तू माझे मलमुत्र का वरचेवर धुवत नाहीस? माझ्या जखमांवर वारंवार माशा बसून माझेच शरीर खात रहातांत, त्यांना तू का उडवत नाहीस? माझी सेवा करेन म्हणून म्हणत होतांस? व तसे मला वचन दिले होतेस, मग पाहिजे तशी भिक्षा का आणत नाहीस? असे नेहेमीच काही ना काहीतरी म्हणून वेदधर्म मुनी, स्वतःला संताप करून, शिष्याला देखील प्रताडीत करायचे, आणि अशी वेळ वारंवार येत होती तसेच हि वेळ तर नेहेमी शिष्य संदीपकची सहनशीलतेची पराकाष्ठाच असायची.

पुढील कथा पुढे प्रसिद्ध होणाऱ्या पानीं वांचू शकता.


आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.

1 comment:

  1. Chann.........


    Nice Post for all readers Please visit http://software4freedownlaod.blogspot.in/ best software

    Laptop details http://www.laptop4pune.com/

    Movies Video and Trailers http://worlds-4-free.blogspot.com/

    Free Download Whats Apps for PC and Laptop http://www.laptop4pune.com/2014/02/Free-Download-

    Whatsapp-for-PC-and-Laptop.html

    Free Download Driverpack Solution 15 ISO Full Version

    http://www.laptop4pune.com/2014/12/free-download-driverpack-solution-15-iso-full-version.html

    ReplyDelete