Tuesday, September 15, 2015


पान नंबर १३ व १४
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी, आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

Pg 13

    रमेश्वर, पुढे पापांचे विश्लेषण, सांगू लागत म्हणाला, पापांचे गुण व त्यांची फलत्पत्ती अशींच असते, जिथे निर्मम वाक्य मुखांतून उच्चारण होते, तो पापी म्हणूनच जाणावा. जेथे पाप जास्त असेल, तेथे दैन्य (अज्ञान व गरिबी), मत्सर, शुभाशुभ ची चाड नसणे, हे पापच जाणावे. एखाद्या गरीबाला, दु:ख कशी प्राप्त होतांत, अपस्मार कसा प्राप्त होतो, ते पापरूपी भोग म्हणूनच समजावे. समस्त रोगांमध्ये त्वचाकुष्ठ व आंत्रकुष्ठ हा फक्त मानव शरीराचे सोळा भागच व्यापत नाही, तर त्यापेक्षा अधिकच राहतो, तोच प्रादुर्भाव वेदधर्म मुनी दु:खीकष्टी होऊन, भोगत होता.
    से अन्य सर्व आपल्या गुरुचे गुणदोष, आपल्या ध्यानीमनी न बाळगता, आपल्या गुरूलाच विश्वेश्वर नारायण स्वरूप मानून संदीपक आपला गुरु सेवाधर्म पार पाडत राहिला. आता ते दोघे काशीनगरी वास करून राहिले होते, बरीच तीर्थस्थान, काशी विश्वेश्वराचे, व इतर देवांची मंदिर देखील जवळच होती, पण संदीपक त्या तीर्थांना तीर्थस्नान तसेच मंदिरांना देवदर्शन करायला न जाता, आपल्या गुरूंचेच दर्शन हेच काशी विश्वेश्वराचे दर्शन मानून, प्रणिपात करायचा. आपल्या स्वतःची, आपल्या देहाची तमा न बाळगता, दुसऱ्या कोणाशीही न बोलता, अबोल राहून, रात्रंदिवस एकच ध्यास, आपल्या गुरूची सेवा प्रमाण मानून, निर्धार करून, सेवा करत होता. आपला गुरु म्हणजेच, ब्रह्मा,विष्णू व महेश, असे संदीपकने, पुराणांत लिहिल्याप्रमाणे तेच सत्यवचन मानून, आपल्या मनाशी ठाम राहून, आपले सेवाव्रत त्याने पुढे चालूच ठेवले.
    धी त्याचे गुरु त्याला अत्यंत कटू शब्दांत, तर कधी अत्यंत निष्ठुरपणे आज्ञा देत, कधी वेदनांनी त्रस्त होऊन वाटेल तसे वागत, पण संदीपक कधीही त्यांचा अवमान न करता, त्यांना ज्यायोगे सुख वाटेल, आराम पडेल असेंच वागायचा व बोलायचा, त्याने कधीही त्यांच्या विरुद्ध एकही ब्र शब्द मुखातून काढला नाही कि आपल्या मनीही येउन दिला नाही. तसेच त्यांची प्रत्येक आज्ञा शिरसावंद्य मानून पार पाडायचा. त्याचे एकूणच आपल्या गुरुप्रती असे वर्तन होते, कि जणू जशी एक पतिव्रता स्त्री आपल्या पिडीत पतीची सेवा करेल, किंबहुना त्याच्यापेक्षाही बहुधा जास्तच वरचढ ठरेल, अशी आपल्या गुरूची काळजी शिष्य संदीपक त्या समयी निरंतर घेत होता.
    सांच काही काळ क्रमत गेल्यांवर, एक दिवस, शिष्य संदीपकच्या समोर अचानक, जगनियंता त्याच्या सन्मुख येउन उभे ठाकले, व त्याला वर माग असे म्हणून, म्हणाले, अहो गुरुभक्त संदीपका, तू महाज्ञांनी असून, तुझ्या भक्तीला पाहून मी संतुष्ट पावलो, व तुझ्यावर प्रसन्न झालो, म्हणून तुला वरदान देणे, मला भाग आहे, तरी तू वर माग.
    रमेश्वराचे बोल ऎकुन, तो आज्ञाधारक शिष्य संदीपक, म्हणाला, हे, मृत्युंजय व्योमकेशी, मी तर ह्याबाबतीत माझ्या गुरुंना काहीएक विचारले नाही, त्यांना न विचारता, त्यांची कोणतीही परवानगी न घेता, मी कदापि वर घेऊ शकत नाही.कृपा करून तुम्ही थांबा, मी माझ्या गुरुंना विचारून येतो असे म्हणून संदीपक तेथून आपल्या गुरूंची आज्ञा (परवानगी) घेण्यास निघाला.
    शिष्य संदीपक आपल्या गुरूंपाशी जाउन, त्याना सांगू लागला, माझ्यावर विश्वेश्वरनाथ प्रसन्न होऊन, मला वर देण्यास आले आहेत, ते कसे आले? का आले? मला त्याचे ज्ञान नाही. हे गुरुराया जर तुमची आज्ञा असेल, तर तुमची हि व्याधी (कुष्ठ, रोग) बरे होण्याचा काही उपशम (उपाय, इलाज) मागतो व बरे होण्यासाठी वर मागतो. जर ईश्वर सदाशिवाने तसा वर दिला, तर बरे होईल, तुमचा ह्यापुढचा त्रास वाचेल, तुम्हाला हे सर्व भोग भोगायला लागणार नाहीत.
    हे शिष्य संदीपकचे वचन ऎकताच, त्याचे गुरु, वेदधर्म मुनी, त्याच्यावर कोपायमान झाले (रागावले). व रागारागातच संतापाने म्हणाले, माझ्या ह्या व्याधीनिमित्त (रोगाकरता) त्या ईश्वरापाशी काहिएक प्रार्थना करू नकोस, व आपल्याला त्याची गरजही नाही. जर आपल्या पातकांना आपण भोगले नाही, तर त्या पापांची निष्कृती होत नाही, आणि ती पाप निश्चितच जन्मजन्मांतरी पुढे कायमच बाधतच रहातांत, हे धर्मशास्त्रांत लिहून ठेवले आहे. ज्याला मुक्ती (मोक्ष) मिळवायची कामना (ईच्छा) असेल, त्याने त्याची पाप, आपले भोग भोगूनच नष्ट म्हणजेच निर्दालन करावीत, जर काहीजरी बाकी राहिली, तर ती, त्याच्या मोक्षसमयी त्याला बाधाच करतांत. म्हणून हे संदीपक, ईश्वराजवळ तू काहीही व कोणत्याही वराची प्रार्थना अथवा मागणी करू नकोस.
    गुरूंची आज्ञा प्रमाण मानत, संदीपक, जो ईश्वराजवळ वर मागून आपल्या गुरुची व्याधी, रोग संपवता येईल, अशा मोठया आशेने आपल्या गुरूपाशी आला होता, तो तसाच ईश्वर सदाशिवापाशी परतला, व ईश्वरासमोर जाउन म्हणाला, मला काहीएक वर नको आहे, माझ्या गुरुंच्या मनाला ते पटत नाही, तर मी कसा काय तुमच्याकडून वर मागू? किंवा घेऊ शकतो?
    हे ऎकुन विश्वेश्वराला महदाश्चर्य वाटले, व विस्मय करतच आपल्या कार्यस्थळी निर्वाणमंडपी गेला, व समस्त देवांना पाचारण (बोलावणे) करून, सभेमध्ये भगवन श्रीविष्णूपुढे सारा वृतांत सांगू लागला, तेव्हा श्रीविष्णू शंकरांस विचारू लागले, हा कोण गुरु आणि कोण शिष्य आहे? त्यांचा रहिवास (वस्ती, रहाणे) कुठे आहे? सर्वकाही विस्ताराने सांगा.
    तेव्हा ईश्वर श्रीविष्णूला सांगू लागले, गोदावरी तीरावर रहायचे, व आता उत्तरदेशांत मणिकर्णिकेला, कम्बळेश्वर जवळ, वेदधर्म नांवाचा एक तापसी मुनी व त्याचा एक संदीपक नांवाचा शिष्य, जो आपल्या गुरूची अहर्निश अखंड एकभाव एकचित्त करून सेवा करत आहे. पण असा निर्गुण राहून गुरुभक्ती करणारा, ह्या पूर्ण त्रैयलोक्यांत मी आजवर पाहिला नाही व त्यामुळे मला राहवले नाही. त्याची गुरुभक्ती व गुरुप्रती अपरंपार प्रेम बघून, मी त्यांच्यावर अत्यंत खुश होऊन, त्याला, जो मागेल तो वर देण्यांस तत्पर झालो व ईच्छावरदान देईन म्हणून त्याच्याजवळ गेलो, पण गुरु आज्ञा नाही असे म्हणून, त्याने वर घेण्यांस मला नकार दिला. जेथे त्र्क़्रुषीमुनी व तपस्वी, अनेक प्रकारे नाना कष्ट सायास करंत, अहर्निश वर मिळण्याची कामना करत, तप करतांत, तर केवळ इच्छित वराची कामना करीत हजार हजार वर्ष जपकरत असतांत, अशा जपी, तपी, व तपस्वी जनांना, जेथे वर द्यावे इतके मन प्रसन्न होत नाही, तेथे मी त्याची गुरुभक्ती पाहून, प्रसन्न होऊन, स्वतःहून वर द्यावयास गेलो तर, तो शिष्य दीपक, मला नाही म्हणून सांगतो. त्याने तनमन अर्पण करून, संतोष भावे आपल्या गुरूलाच त्रयमुर्ति मानून, आपल्या मनाशी गुरूलाच परमात्मा जाणून, त्याने स्वतःला निश्चयपूर्वक आपल्या गुरूलाच वाहून घेतले आहे. त्याची सेवा पाहून, अविद्या अंधकाराला छेदणारा असा कुलदीपक हेच त्याचे नांव, असे सार्थ व सत्य मला वांटते, जसे पूर्ण धर्म व ज्ञान त्याच्यापाशी एकवटले आहे असेच वाटते. त्याचा गुरु, त्याची भक्ती व गुरुपादसेवा पाहून, कुलदीपक म्हणून त्याला मी नावाजतो.


Pg 14

    तके सर्व ऎकुन शारंगधर श्रीविष्णूंना रहावले नाही, तत्क्षणी ते स्वतः त्या गुरु व शिष्य, दोघांचा हा काय प्रकार आहे? बघण्यास उत्सुक होऊन पहावयास गेले असतां त्याला, विश्वनाथाने जे सांगितले, त्याहूनही अधिकच, भक्तीचा, थक्क करणारा, जणू एक स्त्रोतच पहावयास मिळाला. हृषीकेशी श्रीविष्णू ते पाहून इतका प्रसन्न झाला, कि त्याला रहावले नाही, लगेच त्याने दीपकला बोलावून, त्याला म्हणू लागला, हे संदीपक संतोष झाला, तुझ्यावर मी प्रसन्न झालो, तुला काय वर पाहिजे? तो माग, मी तो वर तुला देण्यास तत्पर आहे.
    हृषीकेशी श्रीविष्णूंचे दर्शन होतांच, त्यांना प्रणाम करून, दीपक म्हणाला, अशी काय व कोणती भक्ती मी केली, किंवा असे कोणते कार्य मी केले? कि तुम्ही मला प्रसन्न होऊन वर देत आहांत? काही लक्ष, काही सहत्र वर्षे, अरण्यवासी होऊन जे जप व तप करतांत, हे नारायणा, त्यांना तर तुम्ही उदास ठेऊन, वर देत नाही. मी तर तुम्हाला भजत नाही कि तुमची भक्तीही करत नाही. कधी तुमचे नामस्मरण केलेले नाही, किंवा केलेल्याचे मला स्मरतही नाही. कधी कुठल्याही मंदिरात नित्यनेमाने जाऊन दर्शनही करत नाही. मग येउन जबरदस्तीने मला कशाकरता आणि काय म्हणून वर देतो असे आपण म्हणता?
    संदीपकचे बोल व प्रश्न ऎक्न, स्वयं नारायण अतिशय संतोष पावला, व दीपकला समजावून विस्तारपूर्वक सांगू लागला, निश्चयपूर्वक संपूर्ण निर्णयाप्रत येईल एव्हढी पूर्णरूपाने तूझी गुरुभक्ती पाहून आम्हाला संतोष झाला. तू जी भक्ती व सेवा आपल्या गुरूची केलीस ती आम्हालाच पावली. जो मनुष्य, आपल्या सत्गुरुंचा भक्त असेल, तोच माझा जीवप्राण इतका प्रिय असतो. त्यालाच मी वश्य होतो व ज्या ज्या गोष्टींची तो कामना करून मागतो, त्याला मी ते ते देतो. जो मनुष्य आपल्या मातापित्याची सेवा पूर्णपणाने करतो, ती सेवा देखील तत्वतः मलाच पावते. ज्या स्त्रिया पतिसेवा करतांत, तीही सेवा मलाच पावते. एखाद्या सत्पात्री भल्या ब्राह्मणाला, यति, योगी, तपस्वीला केलेले नमन सुद्धा मलाच पावते.
    स्वयं नारायणाचे हे उपदेशपर बोल ऎकुन, संदीपक परत नमन करून, विनवू लागत म्हणाला, हे नारायणा, वेदशात्र व त्याची मीमांसा ह्याप्रमाणे, मी निश्चितपणे जाणतो, व मी माझ्या मनाशी निश्चय करून ठाम आहे कि माझा गुरुच मला देणारा आहे. सत्गुरू पासूनच सर्व ज्ञान प्राप्त होते, त्रयमुर्ति देखील त्यांच्यामुळेच आम्हाला अधीन होतंत, त्यामुळे माझा गुरूच माझा देव होतो व आहे. सर्व देव, सर्व तीर्थ, मला माझ्या गुरुचरणीच मिळते, हे सत्य आहे, तर परमार्थ कसा आणि किती लांब राहू शकेल? समस्त योगी, सिद्ध, ज्ञानी जन कोणीही गुरुवांचून सज्ञान होऊ शकत नाही कि शकला नाही, तर त्याच ज्ञानाचा उपयोग केला असतां, आपण त्रयमुर्ति ईश्वर कसे माझ्यापासून लांब राहू शकता? त्यायोगे पाहिले असतां, जो वर तुम्ही मला द्याल, त्यापेक्षा माझा श्रीसत्गुरू मला बरेंच काही जास्तच देतो, ह्याच कारणाने मी माझ्या श्रीसत्गुरुरायाला वंद्य मानून, गुरुंनाच भजणे इष्ट मानतो व माझ्या गुरुंनाच भजतो.
    संदीपकचे दृढ वचन ऎकुन, श्रीविष्णू आता अधिकच प्रसन्न झाले, व संतोष पावून म्हणाले, मी धन्य धन्य झालो आहे, माझ्या बाल संदीपका तू तर माझाच प्राण, व माझेच बालक आहेस, तूच शिष्यांमध्ये शिरोरत्न म्हणून ह्यापुढे ओळखला जाशील, आता मी तुझ्यापाशी आलेलोच आहे, तर काहीतरी माग, मला तत्वतः काही द्यावंच लागेल, विश्वनाथ स्वतः आले, दुसऱ्यांदा वर द्यायला मी आलो, निर्धार करून सांगतो, तुला मी पूर्ण वश झालो, माझे मन तुझ्यावर पूर्ण संतोषले, जे काही पाहिजे, व मागशील ते आता देईन.
    प्रत्यक्ष स्वयं नारायण, शिष्य संदीपकला काहीतरी माग म्हणून म्हणू लागले, काय त्या शिष्योत्तमाचे गोडवे गावे, असेच श्रीविष्णूंना वाटू लागले. नारायणाचे बोल आज्ञा म्हणून परवान करून दीपक बोलू लागला, जर मला काही एक वर द्यायचाच असेल, तर माझी, माझ्या मनाशी ठाम राहून, गुरुभक्ती आता करतो त्यापेक्षा अधिक कशी होईल, अजून कशी दृढ होईल, ह्याचे ज्ञान मला द्यावे. गुरूंचे मन कसे ओळखावे? त्यांना अधिक सुखी कसे ठेवता येईल? असे ज्ञान मला द्यावे, असे म्हणत श्रीविष्णूच्या चरणी लागला.
    श्रीविष्णूंनी, त्या शिष्योत्तम संदीपकास त्याप्रमाणे वर, आशीर्वाद म्हणून देत, संतुष्ट स्वराने बोलू लागत म्हणाले, अरे दीपका हे शिरोमणी, तू तर माझा प्राणसखाच झालास, तू आपल्या गुरूला ओळखलेस, ह्याच देही परब्रह्माला पाहिलेस, तरीही आणखी गुरुभक्ती व त्यांचे ज्ञान विचारतोस, तर एकचित्त होऊन ऎक, आपल्या लौकिकाला सार्थ करणारी जशी सुबुद्धी ठेऊ, तशी धर्माधर्मसुमने (धर्म, अधर्म ह्यांची वेदांतील वचने) मनाला वाटू लागतांत, तू तर उत्कृष्ठाहून उत्कृष्ठ अशी, तुझ्या गुरूची स्तुती करत रहा. ज्या ज्या वेळी आपल्या गुरूंची स्तुती करशील, ती आमचीच स्तुती असेल, व त्यामुळे आम्ही तुझ्यावर अधिकच संतोषी राहू. जे जन दुसऱ्यांना ज्ञान सांगत, उत्कृष्ठरित्या वेदान्तभाष्य अहर्निश करतांत, तसेंच जे जन उत्कृष्ठ वेदपठण करतांत, ती निर्धारपणे (निश्चितपणे) आम्हालाच पावते. जे जन वेदांना सिद्धांत जाणून, गुरूला परब्रह्म असे म्हणत, आपल्या गुरूलाच भजतांत, त्याना सर्व देवता वश्य होतांत. गुरु हि दोन अक्षर, पण सत्य जाण, हा अमृताचा अथांग समुद्र असून, त्यांमध्ये बुडाल्याक्षणी काय होईल? त्याला तर स्वर्गगतीच प्राप्त होईल, ज्याचे हृदयी नित्य गुरु स्मरण असेल, त्याला सगुण (मानव देहांत) असतांनाच, अमृतपान करावयास मिळून, तिन्ही लोकांत पुज्य राहून, तो शिष्य अमरत्वाला पोहोचतो. कोणताही वर मी दिला काय, कि विश्वनाथाने दिला, किंवा ब्रह्माने दिला, तरी तो वर घेण्याला लायक बनवणारा, फलदाता होणारा, महानाहुन महान बनविणारा, गुरूच असतो, म्हणूनच गुरु हाच त्रयमूर्ती आहे, हे जाणून घे. असे उपदेशून, श्रीविष्णूने परम संतोषाने दीपकला वर दिला.
    रमेश्वराने कलीला पुढे कथा सांगणे चालू ठेवत म्हणाला, शिष्य संदीपक वर मिळाल्यावर, आपल्या गुरुंजवळ गेला असतां, वेदधर्म मुनी, त्याला विचारू लागले, ऎक माझ्या शिष्या कुलदीपका, वैकुंठ नायकांनी काय तुला दिले, ते मला विस्तारपूर्वक सांग, जेणेकरून माझे दोलायमान मन स्थिर होईल.
    संदीपक आपल्या गुरूला सांगू लागला, हृशिकेशींनी मला वर दिला, मी त्यांच्याकडे, माझे अंतःकरण ठाम राहून, तुमच्या चरणी माझी भक्ती अधिक दृढ होऊन, तुमची सेवा अधिक चांगली, अधिक व्यवस्थित, व अधिक तत्पर करता येउन द्यावी, असा वर मागितला.
    पल्या शिष्याचे ऐकून तो गुरु, वेदधर्म मुनी, साक्षात्कार होऊन प्रसन्नचित्त होऊन म्हणाला, हे शिष्या, काशीपुरी राहून तू आपल्या जीवनाचे उद्धार करून घेतले. तुझे प्रत्येक वाक्य ह्यापुढे सिद्ध राहील, तुझ्या घरी नवनिधी (नवसिद्धी) पाणी भरतील, प्रत्यक्ष विश्वनाथच तुझ्या अधीन झाला. तू तुझे जीवन सफल करून घेतलेसच त्याच बरोबर तुझे स्मरण जे कोणी करतील, ते तुझ्या स्मरणमात्रने, त्यांचे सर्व कष्ट निवारण होऊन, ते त्यांच्या स्त्रिया व पुत्रांसमवेत सुखी नांदतील.
    व्हढे बोलून होतांच, तो गुरु वेदधर्म मुनींचा देह, तत्क्षणी दिव्य देहांत रुपांतरीत झाला. तो गुरु, फक्त आपल्या शिष्याचा आपल्याप्रती भाव बघण्यास, त्याने सर्वांगावर कुष्ठ घेऊन, त्या व्याधीचे सर्व क्लेश सहन केले. तो तर महातपस्वी होता, त्याला कसले पाप होते व रहाणार आहे, तो तर लोकानुग्रह (दुसऱ्यांचे कल्याण) करण्यासाठी काशीपुरी गेला होता. काशी नगरीचा महिमाच आहे कि हजार जन्मांचे पाप, तेथे धुवून जाइल.
    शाप्रकारे दीपक आख्यान सांगून, परमेश्वराने त्या गुरुशिष्याची कथा संपवली, व समय येतांच कलीला पृथ्विलोकी जाण्याची आज्ञा दिली, व प्रस्थान करण्यास सांगितले.


आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.

2 comments:

  1. Mast

    Nice Post for all readers Please visit http://software4freedownlaod.blogspot.in/ best software

    Laptop details http://www.laptop4pune.com/

    Movies Video and Trailers http://worlds-4-free.blogspot.com/

    Free Download Whats Apps for PC and Laptop http://www.laptop4pune.com/2014/02/Free-Download-

    Whatsapp-for-PC-and-Laptop.html

    Free Download Driverpack Solution 15 ISO Full Version

    http://www.laptop4pune.com/2014/12/free-download-driverpack-solution-15-iso-full-version.html

    ReplyDelete