Wednesday, August 26, 2015


पान नंबर ०७ व ०८
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी, आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

Pg 07
कृपया हिकडे लक्ष्य द्यावे!
पाणी, हि आपल्या, जीवनाची सर्वांत मोठी गरज आहे. पाण्याला, जास्त आहे किवा जास्त मिळते, म्हणून वाया घालवू नका. पाणी हे परमेश्वराचे आपल्याला वरदान आहे. आपण, त्या वरदानाची कदर करत नाही, व ईश्वराच्या, निसर्गाच्या, प्रकोपाचे मात्र धनी होतो.
जरूर ध्यानांत ठेवा, व इतरांनाही अवश्य सांगा:
पाणी पितांना, दांत घासतांना, हात धुवतांना, भांडी घासतांना, आपण, किंवा अन्य कोणी जर पाण्याचा नळ, पूर्ण उघडून पाणी गरजेपेक्षा जास्त सोडले, तर आवश्यकतेपेक्षा तिप्पट, ते चौपट पाणी निव्वळ वाया जाते. तेच पाणी एका भांड्यात घेऊन वापरले असतां, असे लक्ष्यांत येते, कि पाणी फक्त २५% च लागले. आता आपण सर्वांनी, हेच पाणी असेच वाचवले, तर आज महाराष्ट्रांत, सर्व शहरांत व गावांत, एवढे पाणी वाचेल, कि संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्ध्या शेतीच्या पिकांना, ते पाणी पुरवून, महागाई कमी होण्यास मदतच होईल. शेतकऱ्यांना मदत होऊन, त्यांना आत्महत्या करावी लागणार नाही.
तरी जो कोणी किंवा आपण स्वतः, चुकत असाल, तर आपल्या स्वतः वर व सर्व महाराष्ट्रावर कृपा करा, व चुकणाऱ्याची चूक कृपया त्यांच्या लक्षांत आणून द्या.
आ. अशोक यादव.

    लीचे म्हणणे ऐकताच परमेश्वर, गूढ स्वरांत, किंचित हसतच म्हणाला, हे कली, तू वृथा (विनाकारण) का चिंता करतोस, तू स्वतःच एवढा प्रबळ (ताकदीचा) आहेस, कि त्या मानवांवर देखिल तू आपला यथावकाश प्रभाव पाडशील, तेव्हा तुला चिंता वाटायचे कारण नाही. तसेच तुझ्या युगांत मला जाणून माझी भक्ती व त्याग करण्याची प्रवृत्ती ही एवढी साधी व सोपी गोष्ट तू तुझ्या प्रभावामध्ये राहूच देणार नाहीस, हे मला माहित आहे. हे कली, तुझे पृथ्विलोकांत जाण्याचा समय आता निकट आला आहे, तरी उचित समय येतांच तेथे जाऊन तू आपल्या स्वतःच्या स्वभावगुण प्रमाणे पृथ्वीलोकी तुझा प्रकाश (प्रभाव) पाडू शकतोस.
    रमेश्वराची आज्ञा ऎकुन भेदरलेला कली धीर धरून स्वतःला स्पष्ट करत याचना करत म्हणाला, हे परमात्मन, मला आपण भूमंडळी (पृथ्विलोकी) पाठवतच असाल तर, हे माझे स्वामी, माझे गुण कृपा करून समजून घ्या. मी पृथ्विलोकी पोहोचतांच, धर्माचा उच्छेद (नाश) करेन. हे परमेश्वर, कृपया तुम्ही माझ्या कार्यात काहीही अडथळा न आणता, आपल्या जागी तटस्थ व आनंदी असावे. माझ्या गुणांमुळे आपोआप तेथे, कलह (भांडण) परनिंदा सुरु होईल. परद्रव्य (दुसऱ्याची संपत्ती) लुटणारे व परस्त्री (दुसऱ्यांच्या बायका) लुटणारे, असेसारे माझ्या बंधूप्रमाणे असतील. व्यक्तिप्रपंच, मत्सर (द्वेष), दम्भक (खोटे बोलणारे) हे माझे कायम जिवलग असतील. बकासुर सारखे संन्यासी हे तर माझे जणू प्राणच असतील जे दुसऱ्यांचा छळ करून आपले पोट भरतील अशी लोक माझे प्राणप्रिय मित्र असतील. मात्र जी लोक पुण्यवंत, श्रद्धा ठेवणारे असतील त्यांना मात्र मी माझे शत्रू मानेन.
    लीची, येणाऱ्या संभाव्य स्थिती बद्दल होणारी आशंका, त्याबद्दलची याचना व प्रतिक्रिया पाहून परमेश्वराने कलीला उपदेश करत म्हणाले, तुझ्या कलियुगांत त्या समयाला मानवाला आयुष्य कमी असणार आहे, पूर्वीच्या तीनही युगांत मानवाला आयुष्य भरपूर असायचे, त्यामुळे त्यांना जप, तप, अनुष्ठान हे सर्व तसेच चारही आश्रम व संपूर्ण आयुष्य भोगूनच त्यांना गती प्राप्त व्हायची. मात्र तुझ्या युगांत त्यांचे वयोमान अल्प असल्यामुळे, त्याच्यातही जे जन तप व अनुष्ठान करतील ते लवकरच परमार्थाला पावतील. तसेच जे जन मला ओळखून म्हणजेच ब्रह्मज्ञानी असतील व मला जाणून आपले आयुष्यांत सतकर्म (पुण्य) करतील, अशांना मात्र तू सहाय्य करावेस, व कलियुगांत तू असेच कायम वागावेस.
    हे परमेश्वराचे वचन ऐकताच आधीच घाबरलेल्या कलीची त्रेधाच उडाली, त्याच्या अंगात परत कापरे भरले, त्याला जणू "दे माय धरणी ठाय," अशीच अवस्था झाली. त्याच अवस्थेत कली अत्यंत संयम राखून, विनयाने व अजिजी करत बोलू लागला, हे माझ्या स्वामी परमेश्वरा, तुम्ही ज्या लोकांचे मी सहाय्य करावे असे मला सांगता, तेच तर खरे माझे वैरी व शत्रू असणार आहेत. अशी लोक ज्या ज्या ठिकाणी असतील, तेथे माझे जाणे, माझ्याकरता तर निव्वळ अशक्यप्राय होईल. त्यांच्या श्वासांचा घ्वनी (आवाज) जरी मी ऐकला तरी मला मरणप्राय भय वाटेल, तर मी त्या अशा ठिकाणी जाऊ शकणारच नाही. पृथ्विलोकांत पांचशत (पाचशे) खंडांत, भरतखंड (त्यावेळेचा भारत) ह्या ठिकाणी तर अशा पुण्यवंत ब्रह्मज्ञानी जनांची संख्या खूपच आहे, ते तर मला सर्वांदेखत मारूनच टाकतील, अशा परिस्थितीत काय माझ्या जाण्याचा उपयोग? व गेलो तरी मी काहीच करू शकणार नाही व जेथे माझी धडगत नाही, तेथे हे परमेश्वरा मी कसा काय जाऊ? आपणच कृपा करून मला सांगावे व माझा मार्ग प्रशस्त करावा.
    ह्यावर हास्य करत परमेश्वर, कलीला समजावण्याच्या सुरांत बोलला, हे कली, हे तर मी सर्व जाणतो, त्या करताच योजना आहे कि, तू पृथ्विलोकांत जातांना तुझ्याबरोबर काळात्म्याला घेऊन जा. काळात्म्याचे स्वतःचे असे अनुपम वैशिष्ट्य व गुण आहेत कि तो जनांत संभ्रम व आकर्षण निर्माण करून, तुझ्या गुणांना सहाय्यभूत होऊन धर्माचे छेदन (नाश) करेल, धर्म भावना असलेल्या जनांना (लोकांना) अधर्माचे तात्कालिक परंतु तत्काळ फायदे व क्षणिक सुखांच्याकडे आकर्षित करेल, व त्यांचे सुख पाहून इतरही जनांचे कर्म, बुद्धी व मन पापांकडेच वळेल.


Pg 08
शोधिशी मानवा, राउळी मंदिरी
नांदतो देव हा, आपुल्या अंतरी ||
मेघ हे दाटती, कोठुनी अंबरी,
सूर येती कसे, वाजते बासरी |
रोमरोमी फुले, तीर्थ हे भूवरी,
दूर इंद्रायणी, दूर ती पंढरी ||
  शोधिशी मानवा, राउळी मंदिरी,
गंध का हासतो, पाकळी सारुनी
वाहते निर्झरी, प्रेमसंजीवनी |
भोवताली तुला, साद घाली कुणी,
खूण घे जाणुनी, रूप हे ईश्वरी ||
  शोधिशी मानवा, राउळी मंदिरी,
भेटतो देव का, पुजनी अर्चनी,
पुण्य का लाभते, दानधर्मातुनी |
शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी,
आंधळा खेळ हा, खेळशी कुठवरी||
शोधिशी मानवा, राउळी मंदिरी,
नांदतो देव हा, आपुल्या अंतरी ||
    गीतकार : वंदना विटणकर,
    संगीतकार : श्रीकांत ठाकरे,
    गायक : महंमद रफी

    रमेश्वराचे बोलणे एकुनदेखील कलीच्या मनांचे समाधान होत नव्हते, त्याच्या मनांत परमेश्वराची आराधना, व भक्ती करणाऱ्या लोकांप्रतीची भिती काहीकेल्या जाता जात नव्हती, त्याने परमेश्वराशी थोडे अधिक स्पष्टच बोलायचे ठरवले, व म्हणाला, जे जन पृथ्विलोकांत राहतात, त्यांतले जे माझे शत्रू व वैरी असतील त्यांच्याबद्दल, हे माझ्या स्वामी, मी तुम्हाला सविस्तर सांगतो, कृपा करून माझे एकुन घ्या. जे जन शिवहरीला भजतात, धर्मपरायण राहतात, व असे करून मला उपद्रव निर्माण करतात, तसेच आणखीही वैरी आहेत ते सांगतो, जे गंगातिरी, वाराणसी काठी राहून धर्माचे पालन करतात, जे जन आपल्या पायी जाऊन तीर्थाटन करत पुराण ऐकतात, ज्या जनांच्या मनांत शांती वसते, ते माझ्या ख्याती प्रमाणे माझे शत्रू ठरतात. जे जन अदांभिकपणे दानधर्म करतात त्यांना बघताच मला तर भितीच वाटते. जे जन आपल्या नाकासमोर लक्ष्य ठेवून जप व अनुष्ठान करतात, त्यांच्यावर माझी चुकुनजरी दृष्टी पडली, तर माझा प्राण जातो कि काय? अशी माझी अवस्था होते. जे जन आपल्या बायको व मुलांवर प्रेम करतांत परंतु आपल्या मातापित्याचा खोटेनाटे बोलून व अव्हेर करून राहतांत किंवा त्याग करतात, त्यांच्यावर माझे खास प्रेम असेल, व अशी लोक माझे परम मित्र असतील. वेद्शास्त्रांना जे जन निन्दतात, हरिहरांत भेदाभेद करतात, किंवा शिव, विष्णू, ह्यांना दूषणं देतात असे जन म्हणजे माझे परम आप्तच होय. जे जन आपल्या ईन्द्रियांवर विजय पावतात (मिळवतात), सदा हरीहराला भजतात व उपासना करतात, जे जन राग व द्वेष पासून नियमित लांब राहतात, ह्यांच्यापासून देखील मला अतिशय भयाक्रांत व्हायला होते.
    लीचे, उद्बोधक संभाषण एकुन कर्ताकरविता परमेश्वर, कलीला जाणीव देत, उपदेशून म्हणाला, हे कली, तुझ्या प्रभाव प्रकाशाला तू कसा विसरतो आहेस, तझा प्रभाव जो आहे तो भरपूर आहे, जो तू स्वतः देखील आज तू ओळखत नाहीस. तुझ्या प्रभावाप्रमाणे, तू पृथ्विलोकी पोहोचतांच, व तुझा अंमल चालू होतांच, काळात्म्याचे सहाय्याने तुझा असा प्रभाव पडेल कि, जनसाधारण वर्ग तुझ्या ईच्छेप्रमाणेच वागू लागतील. असे फारच विरळा असेल कि जो माझ्याप्रती भक्तीप्रमाण व पुण्यवंत असेल, त्याला मात्र तू सहाय्यभूत हो, व अशाचप्रकारे तू पृथ्विलोकी असावेस व आपले कार्य करावेस.
    ही परमेश्वराची आज्ञा ऐकतांच कली सटपटला, त्याची दयनीय अवस्था होऊन अधिकच मान खाली झुकली, त्याच्या सर्वांगावर शहारे आले. त्याला त्याच्या कलीयुगांत, त्याची त्याच्या मनाप्रमाणे स्वतःची अशी पूर्ण पृथ्वीलोकी निरंकुश सत्ता व पूर्ण अधिपत्य स्थापित करणे, हे अशक्यप्राय आहे, ह्याची त्याला पूर्ण जाणीव होऊ लागली. आता मात्र परमेश्वराला कसे व कोणत्या शब्दांत आपल्याजोगे करून घ्यावे, ह्या विवंचनेतच कलीचा चेहरा आणखीनच कासावीस झाला. काही वेळ तर त्याच्या तोंडून शब्दच फुटेनासे झाले. एकंदरच पाहता कली संपूर्णच गलितगात्र झालेला होता. त्याला आता त्याच्या स्वतःच्याच स्वभावाचा राग येऊ लागला, काय करावे सुचेना, सखोल विचार करता करता, अचानकच त्याला काहीतरी सुचले, व अकल्पितपणे काही कळल्यासारखे त्याचा चेहरा, जो आतापर्यंत अपरिमित उद्विग्न, वेडावाकडा व भेसूर दिसत होता, तो आता अचानाकपणे अत्यंत संयमी व धीरगंभीर दिसू लागला.
    ता कली अत्यंत शांत संयमित आवाजांत विनयाने, सर्वशक्तिमान अशा परमेश्वराला आपले दोन्ही हात जोडून नमन करून, आर्जव करीत बोलू लागला, म्हणाला, हे माझ्या स्वामी, माझ्या दुष्ट स्वभाव आपणांस अवगत असतांना, मी धर्माला, व धर्माने चालणाऱ्यांना, कसे काय सहाय्यभूत होऊ शकेन व होईन? हे माझ्या दिनानाथा, मी तर तुमचाच दास आहे, कृपा करून काहीतरी मार्ग व असा उपाय आपण मला सांगावा, कि मी कोणत्या रीतीने पृथ्विलोकी चालू शकेन? तसेच कसे व कोणत्या रीतीने रहाटावे? (चालावे व वागावे?)
    तामात्र परमेश्वराला कलीचे चातुर्य पाहून अत्यंत गहन हास्य फुटले, व हसतच पृथ्विलोकी कशाप्रकारे वागावे, व वर्तावे हे उपदेशून सांगू लागला, हे कली, तू पृथ्विलोकी जातांच, "वेळ" म्हणजेच "वेग" अशी माझी शक्ती, जी पुर्व कालापासून पृथ्विलोकी कार्यान्वित आहे, तुझा अंमल सुरु होतांच, तुला सहाय्यभूत होईल, व "काळ व वेळ" हे दोघे स्वतःचे कार्य व गुण अबाधित राखून, तुझे गुणांचा अंगीकार (स्विकार) करतील. आता "काळ व वेळ" हेच पृथ्विलोकी तुझे स्वतःचे कनिष्ठ घटक राहून, तुला पुढचा मार्गही सुगम करतील व दाखवतील. जे जन निर्मल मनाने वागत असतील त्यांना शत्रू व जे जन आपल्या मनी व अंगी दुर्विचार व मलमूत्रा सारख्या वास येणारे व्यसन बाळगून असतील, अशांना तू तुझे इष्टवर्ग मानु शकतोस.
    ह्याचसारख्या पापपुण्याचा जो विरोधाभास राहतो, तो नाहीसा करून जे जन, अधिक पुण्य प्राप्त करतील, ते मात्र तुला जिंकू शकतील, तुला जिंकणारे, असे पुण्यवंत ह्या पृथ्विलोकी फार विरळाच असतील. तसेच, जे जन निष्काम भावना अंगी बाणवून, आपले कर्म ईश्वराला वाहून, भक्ती करत, पापपुण्यच्या बेडीत न अडकता, स्वतःला उच्चासनावर नेउन ठेवतील, असे पुण्यवंत तर विरळात विरळा होऊ शकेल. ते तर तुला निश्चितच जिंकू शकतील. व बाकीचे सारे तुझ्या आकर्षणाला, व प्रलोभनाला बळी पडून तुला वश होऊन आपल्या स्वतःच्या विनाशाला स्वतःच कारणीभूत होतील. लक्ष्य देऊन ऐक, जे जन तुझा उपद्रव सहन करत आपले व्यवहार तुला न स्विकारता मला ओळखून माझी भक्ती करत राहतील, त्यांची परीक्षा काही काळ झाल्यावर मात्र तू त्यांना सहाय्य करावे, व जे जन तुझे दारूण यातना, अवहेलना सहन करू शकणार नाहीत, व तुझ्या आकर्षणाला, प्रलोभनाला बळी पडतील, तुझे वश्य असतील, असे तुझ्या कलियुगांत जे जे जन्म होतील, अशा जनांना मी कधीच प्राप्त होणार नाही.

पुढे प्रसिद्ध होणाऱ्या लिखाणांत आपण सर्व वाचकहो वाचाल, सत्गुरुंची महिमा, सत्गुरुचे महत्व व त्याची ताकद, परमेश्वराने काय वर्णिली? सत्गुरू कसा असतो? सत्गुरू कसा असावा लागतो? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढील पानांत मिळतील.


आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.

1 comment:

  1. Nice Post for all readers Please visit http://software4freedownlaod.blogspot.in/ best software

    Laptop details http://www.laptop4pune.com/

    Movies Video and Trailers http://worlds-4-free.blogspot.com/

    Free Download Whats Apps for PC and Laptop http://www.laptop4pune.com/2014/02/Free-Download-

    Whatsapp-for-PC-and-Laptop.html

    Free Download Driverpack Solution 15 ISO Full Version

    http://www.laptop4pune.com/2014/12/free-download-driverpack-solution-15-iso-full-version.html

    ReplyDelete