Wednesday, September 30, 2015


पान नंबर १७ व १८.
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी, आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

Pg 17

    ता तुम्ही विचाराल, आपण कसे आणि कशा रीतीने परमात्मा ईश्वरचे अंश आहोत? आणि असू शकतो? ह्याचे उत्तर मिळण्याकरता आपण एक साध्या उदाहरणाने सुरवात करू. जसे कोणत्याही एका दिवशी, एका संध्याकाळी, आपण साध्या वाटीपेक्षा रुंद (मोठे) असे काही वाडगे घेऊया, आता त्यांमध्ये साधारण प्रत्येक वाडग्याचे पाउण भाग स्वच्छ पाणी भरू, आता हे पाणी भरलेले असे अनेक वाडगे, आपल्या घराबाहेर, मोकळ्या जमिनीवर, मोकळ्या आकाशाखाली एक एक करत आजूबाजूला पसरून ठेऊन दिले असतां, आपल्याला काय दिसेल? आकाशांत जो एकच चंद्र दिसतो, त्याचे प्रतिबिंब आपल्याला प्रत्येक वाडग्यात एक, असे अनेक चंद्र, आपल्याला दिसू लागतांत. असेंच नेमके, ह्या आत्मा आणि परमात्मा संबंधामध्ये आहे. आता आपण विचार असा करुया, कि काय आपण घाणेरडे गढूळ पाणी, त्या वाडग्यांमध्ये भरले असते, तर आपल्याला, चंद्राचे असे स्वच्छ प्रतिबिंब बघायला मिळाले असते का? तर नाही, असेच उत्तर येईल, कारण काय? तर ते गढूळ पाणी आहे म्हणून. आता आपण विचार करा, काय आपले मन स्वच्छ, निर्मल आहे? जर आपले मन, जसे असायला पाहिजे, तेव्हढे स्वच्छ व निर्मळ नाही, म्हणून तुम्हाला परमेश्वर म्हणजेच परमतत्व आणि आपण, ह्यामधला नेमका काय धागा (परस्पर संबंध) जोडला आहे, तो लक्षांत येत नाही व येणार नाही. काही काळजी करायचे कारण नाही. सुरवातीला असे होणे, सहाजिक आहे. आपण पुढे वाचत चला, आपले मन आपोआपच शुद्ध व निर्मळ होत जाइल. ह्याची खात्री बाळगा.
    पल्याला आत्मा आणि परमात्मा ह्यांमधला परस्पर संबंध तसेच त्याचे साधर्म्य येथे समजून घ्यायचे आहे. आपण परमेश्वर हा "निरंकार" असून निराकार अशा "परम तत्व" स्वरूपांत राहून, आपल्या खाली, आपल्या वर, आपल्या आजूबाजूला, संपूर्ण आभाळात, म्हणजेच संपूर्ण ब्रह्माण्डात व्यापलेला राहून आपले कार्य करंत असतो, हे समजून घेतले, इथे परत लक्षांत घ्या कि "ईश्वर आपल्या पासून कधीही लांब नव्हता व नाही आहे, उलट आपणच कायम ईश्वरा सन्निध असतो. आपण जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीला ईश्वर पहात (साक्षी) असतो. तसेच चंद्राचे, अनेक वाडग्यांत प्रतिबिंबचे उदाहरण पाहून, आपण प्रथम, पृथ्विलोकी, अंतराळांत रहाणारे, सर्व सजीव, त्या परमात्म्याचे रूप आहोंत. हे समजून घेऊया. खरेतर, आपल्याला हे अगोदर माहित होते, फक्त एव्हढेच नाही तर आपण परमेश्वराला जवळून ओळखत देखील होतो. मग असे काय झाले? कि आपण त्या परमेश्वराला विसरून गेलो? खरे तर ह्याचे उत्तर अगोदरच दिलेले आहे, तरीही जरा वेगळ्या दृष्टीने आपण परत त्या गोष्टीकडे पाहुया. आपण ह्या पृथ्वीवर, आपल्या जन्माच्या अगोदरपासून, ते आपल्या जन्मानंतरही ओळखत होतो. मग आपण कसे त्याला विसरलो? ते प्रथम आपण जरा जवळून पाहूया, तसेच अनुभव देखील करूया. म्हणजेच आपल्या लक्षांत येऊ शकेल.
    पण ज्या वेळेस जन्म घेतला, त्यावेळेस आपण, आपल्या शरीराला परमेश्वराने जोडलेले दोन मानवी डोळे उघडले, त्या वेळेस, आपले मातापिता, नातेवाइक, खेळणी, ह्या पृथ्वीवर असलेल्या अनेकविध गोष्टी, ह्यांमुळे आपण आपल्या वयाच्या २ ते ४ वर्षापर्यंत दिवसेंदिवस आपली ईश्वर बरोबर असलेली ओळख घालवून, ह्यांच मायेत स्वतःला हरवून, ह्या सर्व नातेसंबंध, ह्या रंगबेरंगी सुंदर जगाचे मायावी आकर्षण, आपल्याला इतके वाटू लागले, कि हे सर्व खरे आहे, ह्यावर आपला पूर्ण विश्वासच बसतो. जसे आपण पाहिलेच असेल कि ह्या लिहिलेल्या मजकुराच्या डाव्याबाजुला व्हीगनेट रंगीत रंगबिरंगी वलय दिलेले आहे (वास्तविक ते फक्त एक वेबपेज लिहिण्याची एक स्टाइल टेक्निक आहे), आपल्यापैकी अनेक जणांना ते माहीतही असेल, कि ते खरे वलय तेथे अस्तित्वात नाही, पण तरीही त्या एकमेकांमध्ये मिसळणाऱ्या आकर्षक रंगांमुळे आपली नजर त्या रंगीत वलयाकडे, प्रथम खेचली जाते. आपल्याला माहित आहे, ते वलय पहाण्यासाठी आपण हे पान वाचत नाही, तर ज्ञान मिळवण्यासाठी वाचतो आहोत, तरीही हि रंगबिरंगी माया कशी आपल्याला मोहित करते? माफ करा, मानवाची नजर व आकर्षण काय असते व मानव आपला वेळ कसा बिघडवतो, त्याचेच हे फक्त साधेच व लहान उदाहरण आहे. आपण आता आणखी मोठे म्हणजे, साधारण ६ ते १२ वर्ष वयापर्यंत, हे सर्व माझे व मी त्याचा, अशीच आपली गती झाली. त्यापेक्षा आणखी थोडे मोठे म्हणजे वयाच्या १६ ते १८ वयापर्यंत आल्यानंतर, आपल्याला हेही कळू लागले, कि कुठल्याही वस्तू कधीच टिकत नाहीत, निसर्गांत नेहेमी बदल होतांत, काल जे नवीन होत, ते आज जुने वाटते. नातेसंबंध देखील दिल्याघेतल्याचेच असते. सर्व काही ह्या नाशिवंत मायाजंजाळ करतांच धडपडत असतांत. हे सर्वकाही आपल्याला कळत असतांना देखील, जे इतर करतांत, व त्यांतच धन्यता मानतांत, ते पाहून आपणही तेच सर्व करतो, व करत करत त्यांत गुरफटतच जातो. हे आपल्याला समजावणारा कोणीही नव्हता. आणखी एक महत्वाचे कि, माणूस वयाने कितीही मोठा (प्रौढ) झाला, तरीही त्याचे मन नेहेमी बालसदृष्य गोष्टींमध्ये पटकन रमते. आता, ह्या सर्व गोष्टींत, महत्वाची गोष्ट, म्हणजे ह्या आपल्या अवतिभवती जे कोणी आपल्याला ओळखतांत, ते आपल्या शरीराला (चेहऱ्याला) ओळखतांत, आपल्या आत्म्याला नाही. आपले शरीर गोरे, चेहेरा सुंदर, असे असले, कि सर्व आपल्याला, त्यांच्या जवळ येऊ देतांत, पण आपले शरीर जर काळे, चेहेरा विद्रूप असेल, तर आपले मन कितीही शुद्ध व सुंदर असले तरीही कोणी आपल्या जवळ येत नाही तसेच त्यांच्या जवळही येऊ देत नाहीत. म्हणजेच ह्याचा अर्थ हाच निघतो, कि सर्वजण आपल्या शरीराला (बाह्यांगाला) ओळखतांत, आपल्या आत्म्याला नाही, कारण त्यांच्याकडे ते ज्ञान नाही व म्हणून त्यांची दृष्टी देखील वेगळीच असते. यामध्ये आपल्याला हेदेखील लक्षांत घेतले पाहिजे कि आपल्या शरीराला जे दोन मानवी डोळे ईश्वराने दिले, ते फक्त मायाच बघू शकतात, व हि माया सर्व कृतघ्न, निर्दयी व फसवी आहे, आपण सर्वांना हि माया आपल्या आकर्षणात ओढून, आपले (सर्वांचे) निर्दालन करते, म्हणूनच आपल्याला त्यापासून वाचण्याकरता, आपला तिसरा डोळा ज्याला आपण ज्ञान चक्षु म्हणतो, तो उघडावा लागतो, व तो उघडून "ज्ञान" देण्याची क्षमता फक्त आणि फक्त सत्गुरूपाशीच असते. इथे आणखी महत्वाचे सांगावे लागते, ते म्हणजे ज्याप्रमाणे लहान बालक, त्याची आई (माता) वर (म्हणजेच प्रथम गुरु) वर संपूर्ण विश्वास ठेवते. प्रत्येक बालकाचा त्याच्या आई वर एव्हडा विश्वास असतो कि आईने तिच्या बालकाला विष जरी पाजले तरी ते बालक काहीही ना नुकूर न करता म्हणजेच हरकत न घेता प्राशन करते, म्हणजेच प्राशन करण्यास तयार असते. त्याप्रमाणेच "शिष्याला देखील त्याच्या सत्गुरुवर विश्वास असला पाहिजे, जेव्हा सत्गुरू हे ओळखतो, कि माझा शिष्य माझ्यावर पूर्ण विश्वास ठेऊन राहातो, माझी आज्ञा निसंकोच पालन करतो, त्यावेळेस सत्गुरू आपल्या शिष्याला ईश्वरीय ज्ञान म्हणजेच शिष्याचा तिसरा डोळा उघडतो व ईश्वराला पाहण्याचे ज्ञान प्रदान करतो. ह्याकरता शिष्याला आपल्या सत्गुरुवर निस्सीम भक्ती असावी लागते. काळजी करू नका, तुम्ही पुढील पाने वाचत चला, पुढे मानस पूजा कशी करावी ते सांगत आहे, ती सुरु करताच ईश्वर त्याकरता म्हणजे सत्गुरू मिळवून देण्यांस तुम्हा सर्वांना साहाय्यभूत होईलच ह्याची खात्री बाळगा.
    पण आत्ताच थोडे आधी, संध्याकाळी अनेक वाडग्यांत पाणी ठेवून त्यांत चंद्राची अनेक प्रतिबिंबचे उदाहरण बघितले, पण येथे तर, आपण ईश्वराचे नुसते प्रतिबिंब नसून, आपण त्याचाच अंश म्हणजे आत्मा आहोत, हे समजून घ्यायला पाहिजे. तेही तुम्हाला पुढे वाचतांना समजेल.
    त्याअगोदर, कदाचित तुम्ही विसरला असाल, म्हणून तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते, कि ईश्वर, कलीशी बोलतांना, म्हणाला होता, ज्या जनांना, सत्गुरू लाभला नाही, असे जन, जर त्यांची वस्तुनिष्ठता, स्वार्थीपणा, अहंकार, व विषयलोलुपता ह्या गोष्टींचा, त्याग करण्याचा निश्चय करून, ईश्वराची प्रार्थना करून, प्रयत्न सुरु करतील, आणि जसजसे ते ह्या मार्गावर दृढ होण्याचा प्रयत्न करतील व यश मिळवतील, त्यापेक्षा कितीतरी जास्त वेगाने, मी ईश्वर, त्यांना प्राप्त होण्याकरता, त्यांचा मार्ग विस्तार करून, त्यांना सत्गुरू पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करेन. परमेश्वराने पुढे असेही म्हटले आहे, कि जो माझ्याकरता, माझ्या दिलेल्या मार्गावरून एक पाउल पुढे चालतो, तेव्हा मी त्याच्या जवळ येण्याकरता १०० पावले उचलतो. हा परमेश्वराने पूर्ण मानवजातीला दिलेला शब्द आहे, व त्यावर विश्वास ठेवणे, हे आपले काम आहे, व तेच आपल्याला यश प्रदान करेल, ह्यांत कोणतीही शंका बाळगू नका.
    ता तुम्ही विचाराल, एका वेळेस वस्तुनिष्ठता, स्वार्थीपणा, अहंकार, व विषयलोलुपता त्याग करणे, कसे शक्य आहे? कारण एकतर त्याची आपल्याला लहानपणापासून सवयच नाही? वास्तविक पहायला गेले, तर नवीन माणसाला हे तसे सोपेही नाही. परंतु आपण ते, सहज व सोपे करू शकतो. कसे आणि काय करायचे, ते थोडे समजावयास सोपे व अधिक विशद करून सांगतो.


Pg 18
जगाच्या पाठीवर सिनेमा मधल!!
          एक गाजलेलं गाण!

नाही खर्चिली कवडी दमडी |
नाही वेचला दाम ||
विकत घेतला श्याम,
बाई मी विकत घेतला श्याम ||धृ.||
कुणी म्हणे हि असेल चोरी |
कुणा वाटते असे उधारी ||
जन्मभरीच्या श्वासाइतुके |
मोजियले हरिनाम ||धृ.|| २ ||
बाळ गुराखी यमुनेवरचा |
गुलाम काळा संतांघरचा ||
हाच तुकयाचा विठ्ठल |
आणि दासाचा श्रीराम ||धृ.|| ३ ||
जितुके मालक, तितुकी नांवे |
हृदयी तितुकी, याची गांवे ||
कुणी न ओळखी, तरीही याला |
दीन अनाथ अनाम ||धृ.|| ४ ||
गीतकार : ग. दि. माडगुळकर,
संगीतकार : सुधीर फडके,
गायक : सुधीर फडके, आणि
             आशा भोसले.



    प्रथम आपण, वस्तुनिष्ठता, स्वार्थीपणा, अहंकार, व विषयलोलुपता, ह्या चार गोष्टींपैकी शेवटच्या दोन गोष्टी सोडून देऊ, कारण वस्तुनिष्ठता आणि स्वार्थीपणा ह्या दोन अभिलाषाच, ज्यांना प्रथम, आपण आपल्या बालपणीच जन्म दिला, आपल्या आई व वडिलांनी त्यास खतपाणी घातले तसेच आपण त्या काळजीपूर्वक जपल्या व कायम जोपासल्या (वाढतच ठेवल्या), त्या दोन अभिलाषाच, अहंकार आणि विषयलोलुपता ह्या दोन महाभयंकर विकारांना जन्म घालतांत. ह्याचाच अर्थ ज्यावेळेस तुम्ही वस्तुनिष्ठता व स्वार्थीपणावर २५% प्रभुत्व मिळवता, त्यावेळेस ईश्वरकृपेने १५% ते २०% प्रभुत्व, अहंकार व विषयलोलुपतेवर आपोआपच मिळते. असे करत, धीर न सोडता, गंभीरपणा राखत, जो मानव पुढे चालतो, त्याला तो दिवस बिलकुल लांब नसतो, जेव्हा सद्गुरु भेटावयाचा असतो, व सद्गुरु, त्याचे उरले सुरले दोषदेखील, संपवून टाकून, त्याला आपले मानव जीवनाचे उद्धार करून, मोक्ष देखील सहजशक्य करून देतो.
(सुचना : कदाचित ह्यावेळी, म्हणजेच सत्गुरू भेटण्याच्या अगोदर, कली अनेक प्रकारे, मानवाला अशा वेगवेगळ्या यातना, प्रलोभन तसेच तत्सम आकर्षण, दाखवतो तसेच गैरसमजही इतके निर्माण करतो, कि साधारण माणूस, जसा नदीला तुफान पूर येतो, व त्यांत सर्वकाही वाहून जाते, तसेच त्याचा निश्चय वाहून जाण्याची शक्यता भरपूरच (पुरेपूर) असते. म्हणूनच या इथे प्रत्येक मानवाला आपला निश्चय फारच दृढ करणे अत्यंत आवश्यक ठरते. लक्षांत ठेवा, हि अशी वेळ एकदा, किंवा फार तर तीन वेळा येते, त्यानंतर जसा पूर ओसरतो व सगळीकडे शांतता पसरते, त्याप्रमाणे सर्व जीवन शांत आणि सुखमय होऊ लागते.)

    त्तापर्यंत दासने जे काही लिहिले व तुम्ही वांचले, त्यातले, कलीयुगाची सुरवात, व त्याअगोदर परमेश्वराचे व कलीचे झालेले संभाषण, हा भाग सोडला, तर बाकी सर्व, काही लोकांना समजावून सांगितले, पण फक्त काही, बोटांवर मोजू इतक्या लोकांनी आपले स्वतःचे प्रयत्न सुरु केले, व सत्संगाला जाऊ लागले, पण आपण प्रिय वाचकहो, कदाचित तुम्हाला सत्संग मिळत नसेल, तसेच काही अजून ज्ञान मिळवायचे असेल, असे दासला वाटते. कारण हे ज्ञान जरूर फुकट मिळते, परंतु त्याची ज्याला किमत कळते व समजते, त्यालाच ते सहाय्यभूत देखील होते. आज, अजूनपर्यंत माणसाला श्वास घ्यायला हवा फुकट मिळते, प्यायला पाणी फुकट मिळते, तोपर्यंत काही लोकांना त्याची किंमत वाटत नाही, परंतु दासला माहित आहे, कि ज्या लोकांना त्याची किंमत माहित आहे, ते त्यांच्या प्रत्येक श्वासाचा, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर उपयोग चांगल्याच कामासाठी करतांत. तसेच ह्या परमेश्वराच्या ज्ञानाचे देखील आहे. पण लक्षांत ठेवा, जे ह्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून घेत नाहीत, त्यांच्याकरता सांगतो, कि उद्या जरूर एक दिवस असा येईल, ज्यादिवशी परमात्मा तुम्हाला विचारेल, कि ज्ञान फुकट वाटले जात होते, तेव्हा तू कुठे होतांस? त्यावेळेस मान खाली घालून स्वतःची भर्त्सना करून करत बसाल, त्या वेळेस काय त्याचा उपयोग होईल? हा विचार करा. तेव्हा किमान तुमच्यावर अशी वेळ येऊ नये, कि बोलावे लागेल, अहंकारांत व मायेमध्ये बुडालो होतो. प्रिय वाचकहो, अशी आशा करतो, कि तुमच्यावर ती पाळी येऊ नये.
    ता आपण सर्वप्रथम मागे राहिलेला, अत्यंत महत्वाचा विषय, आपला आत्मा आणि परमात्मा ह्यांचा परस्पर संबंध कसा काय आहे? तसेच दोन्ही वेगवेगळेहि नाहीत ते कसे? हे समजून घेऊया. ह्यामध्ये आणखी एक महत्वाची बाब आपण समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे, आपण जरादेखील आपल्या मनांत, कुठल्याही प्रकारचे दुमत, अविश्वास, अहंकार नसला पाहिजे, जसे कि, आपण जन्माला आलो त्यावेळेस, आपण ज्यारीतीने आपल्या आईने सांगितले व शिकवले, व आपण ते सर्व मानत होतो म्हणजेच आपल्या आईवर आपण पूर्ण विश्वास ठेवला, त्यावेळेस जर आपण हेच दुमत, आपल्या आईविषयी अविश्वास, अहंकार, आपल्या मनांत ठेवला असता, तर जे आपण त्यावेळेस घडलो, आपले बालपण सुखांत गेले, ते शक्य झाले असते का? तसेच येथेही नेमकी तीच वस्तुस्थिती आहे, हे लक्षांत असू द्या. कारण येथे प्रश्न तुमच्या ह्या शरीराच्या पूर्ण आयुष्याचाच नव्हे तर हे शरीर सोडल्यावर परमेश्वरामध्ये विलीन (मोक्ष) मिळवण्याचा देखील आहे, हे कृपया ध्यानी असुंद्यात व ह्यांतच तुमचे कल्याण आहे.
    दासला असे वाटते, कि तुम्ही, तुमच्या मनाने आता पूर्ण समजून घेण्यांस तयार आहांत. आता तुम्हाला एक वेगळ पण व्यवस्थित समजेल अस छान उदाहरण देतो. जसे कोणत्याही एका संध्याकाळी कुठल्याही एका स्वतंत्र रुममध्ये, एक बरीच मोठी अशी मेणबत्ती घ्या, व तिला पेटवून एका मोठ्या लांब आणि रुंद टेबलाच्या कोणत्याही एका कडेला, किंवा टेबलाच्या अगदी मधोमध, टेबलाच्या पृष्ठभागाला चिकटवा. आता काही लहान मेणबत्त्या साधारण वीस पंचवीस किंवा तीस ते पस्तीस, जशा जमतील तशा घ्या, आता ह्या लहान मेणबत्त्या, एक एक करून, मोठ्या मेणबत्तीच्या ज्योतीच्या सहाय्याने पेटवून, मोठ्या मेणबत्तीच्या थोडे अंतर सोडून सभोवताली, किंवा अगदी थोडे अंतर सोडून, कुठल्याही एका बाजूला चिकटवत चला. सर्व लहान मेणबत्त्या पेटवून चिकटवून झाल्यावर, आता त्या संध्याकाळच्या वेळेला, आपल्याला काय दिसेल? ज्या रुममध्ये, ज्या टेबलावर अंधार होता, तेथे आता एका मोठ्या मेणबत्तीचा व अनेक लहान मेणबत्त्यांचा मिळून झालेला, एक मोठा प्रकाश, जो पूर्ण रूमला प्रकाशमान करत आहे. आता विचार करा, कि काय तुम्ही कुठल्याही मेणबत्तीला, तिथून न काढता, कुठल्याही एक मेणबत्तीचा किंवा अनेक मेणबत्त्यांचा फक्त प्रकाश वेगळा करू शकता का? आता उत्तर असेच येईल, नाही, आपण काहीही उपाय केला तरीही फक्त प्रकाश वेगळा होऊ शकत नाही. असेच नेमके आपले व परामात्माचे आहे. येथे "परमात्मा" म्हणजे मोठी मेणबत्ती, व आपण "आत्मा" म्हणजे लहान मेणबत्ती, व आपला सर्वांचा मिळून पडलेला प्रकाश हेच ते "परम तत्व." आता, जरा सखोल विचार करा, तुम्हाला आपोआप पटेल, कि प्रत्येक माणसाचा स्वतःचा प्रकाश असतो, व ज्यावेळेस परमात्मा तो त्याचा प्रकाश म्हणजेच "परम तत्व" काढून घेतो, त्यावेळेस आपण त्या शरीराला (मेणबत्तीला) मृत शरीर असे घोषित करतो.
    येथे आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत, जे आपल्या लक्षांत येणे खूप जरुरीचे आहे. जसे आपण जाणता, आपल्या शरीरांत रक्त, मांस व हाड असतांत. साधारणत: कुठल्याही प्रौढ माणसाच्या शरीराच्या रक्तांत, लाल व सफेद मिळून ३७.२ खरब जिवंत पेशी असतांत, आणि प्रत्येक मांसाचा मायक्रो मिली ग्राम भाग हा जिवंत असतो, तसेच हाडांमध्ये जो पोकळी असते, त्यांत "बोन मौरो" म्हणून जो भाग असतो, तो देखील मांसाप्रमाणेच जिवंत असतो. त्याचप्रमाणे सर्व शरीराचे आंत काम करणारे अवयव देखील स्वतंत्ररीत्या जिवंत असतांत, याइथे विज्ञानाने मानले आहे कि व्यक्तीच्या शरीरांत १० प्राण अस्तित्व करून असतात, व ज्यावेळेस मेंदू आपले कार्य थांबवतो (ज्याला ब्रेन डेड म्हणतात) त्यावेळेस ती व्यक्ती "मृत शरीर" म्हणून डॉक्टर घोषित करतात, म्हणूनच आपल्या शरीराचे भाग जे दान देण्या योग्य असतील ते सर्वकाही आपण ते दान म्हणून कुणालाही देऊ शकतो. ह्याचाच अर्थ असाही होतो, कि ह्या आपल्या शरीरांत, अनेक खरब पटीने, नैनो मेणबत्ती (प्राण, आत्मा) जिवंत आहेत, व त्या सर्व अति लहान मेणबत्ती करता, आपणहि एक मोठी मेणबत्ती ठरतो. काय कशी वाटली? परमेश्वराची संरचना? आहे कि नाही अदभूत!

ह्यापुढे आपण सर्व वाचकहो तुम्हाला आणखी एक असे उदाहरण वाचावयास मिळेल, कि ते उदाहरण स्वयं श्लोकांमध्ये दिले गेले, तो श्लोक व त्याचा संपूर्ण अर्थ विशद करून, दास आपणांस जरूर सांगेल. आपण मात्र एकभाव व एकचित्त करून ते पुढील पानांत वाचावे, परमेश्वर सगळ्यांवर निश्चित आपली कृपा करेल, हि खात्री बाळगा.)


आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.

No comments:

Post a Comment