Monday, August 3, 2015


पान नंबर ०१ व ०२
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी, आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

मी तुम्हाला जाहीर सांगू इच्छितो:
माझ्या सर्व प्रिय वाचकहो, मी ह्या ब्लॉग, वेबसाईटमध्ये परमेश्वराच्या अनुभूती व अंत:प्रेरणेने श्रीगुरुचरित्र व भगवतगीता चे सार सहज आणि सोपे करून, सामान्य माणसाला समजेल अशा शब्दांत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा ब्लॉग कोणत्याही वयोगटाची व्यक्ती वाचू शकते. ह्या ब्लॉगमध्ये मला जे जे काही माझ्या गुरु कडून कळले, व सत्संग वारंवार करून, श्रीसत्गुरुंच्या आशीर्वादाने व त्यायोगे आत्मज्ञानाने समजले, ते सर्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व काहिही आपणा सर्वांपासून लपवलेले नाही, मी हे जे काही लिहिले आहे ते सर्व मानवांकरता असून, ते कोणत्याही जाती, धर्म अथवा संप्रदाय ह्यांना उद्देशून नाही, तसेच माझी त्यावर काहीही टीका करायची ईच्छा व तसा दृष्टीकोणही नाही.
हे सर्व लिहिले आहे, ह्याचा हेतू जाती, धर्म, संप्रदाय बदलण्याचा नाही, व जाती, धर्म बदलणे हा काही परमेश्वराच्या जवळ पोचण्याचा मार्गहि नाही, कारण परमेश्वराची स्वतःची कोणतीही जात, संप्रदाय वा धर्म नाही. तो सर्व मानवांची, प्राणीमात्रांची, व सर्व सृष्टीची काळजी घेतो, तो आपल्याला आपल्या शरीर वा नावावरून ओळखत नाही, तर तो आपल्याला ऎक जीव, त्याचा ऎक परमअंश, त्याच्याच परम तत्वाचा एक अंश म्हणून समजतो, व तसेच तो सर्व सृष्टीला देखील पाहतो.
त्याने आपल्याला माणसाचा काया, वाचा असलेला देह दिला व सुंदर असे मन दिले, व तो परमेश्वर आपल्या प्रत्येका कडून अशी अपेक्षा करतो कि आपण सर्व मनुष्य ऎक नियमबद्ध आयुष्य, करुणा, दया, व मनुष्यधर्म एक्मेकान्प्रती, निसर्गाप्रती व प्रत्येक जीवाप्रती दाखवून माणुसकीने राहावे, व परमेश्वराची भक्ती करावी. जो माणूस परमेश्वराला ओळखून त्याची भक्ती करेल, त्याच्यामध्ये ह्या सर्व भावना आपोआप उत्प्पन्न होतील व फक्त त्याचीच भक्ती परमेश्वरापर्यंत पोहोचेल, असे श्रीमदभगवत गीता मध्ये निष्ठुन श्रीकृष्णाने वारंवार सांगितले आहे. परमेश्वराची भक्ती ही कोणत्याही एकाच समाज, धर्म, संप्रदाय, जातीवर्ण, कायावर्ण वा वयोगटाची बांधील नाही, ही भक्ती कोणीही करू शकतो. हा ब्लॉग लिहिण्याचा हेतू हाच कि, आपणा सर्वांचे कल्याण व्हावे, आपणा सर्वांचे लक्ष ह्या गोष्टीकडे म्हणजेच निष्काम भक्तीकडे वळावे व भगवतगीता मध्ये सांगितल्या प्रमाणे साक्षात निर्गुण निराकार परमेश्वराचा आपणा सर्वांना साक्षात्कार घडावा हीच निरंकार परमेश्वराकडे प्रार्थना करतो. वाचकहो जर तुम्ही ह्या ब्लॉगची पाने काळजी पूर्वक वारंवार वाचली, तर आपोआप तुमची अंतःस्फूर्ती जागृत होऊन, तुम्ही निरंकार परमेश्वराच्या निकट जाल, व तो करुणामयी परमेश्वर स्वतः होऊन तुम्हाला सत्गुरू प्रदान करून अधिकच जवळ घेईल, ह्या मध्ये काहीही शंका बाळगू नका.
Pg 01

    पल्याला (सर्वांना) असे वाटते व डोळ्यांना दिसते, कि आपण सर्व जसे काया, वाचा, मनाने वेगवेगळे आहोत तसेच त्यामुळे आपला एकमेकांशी काही संबंध नाही, तसेच आपल्या सभोवताली असणाऱ्या सृष्टी पासून देखील एक व्यक्ती म्हणून आपण वेगळे आहोत, असेच सर्वजण समजतात, वास्तविक आपण सर्व मानव व आपल्या सभोवती असणारी सृष्टी (निसर्ग) हे सर्व कायम एकमेकांशी कसे काय संपूर्णपणे निगडित आहोत, हे समजणे अत्यंत आवश्यक आहे, व ते समजले तरच तरच आपण ह्या मानव जन्म मिळाल्याचे सार्थक करू शकतो. तरी इथे आपले मुळापासून आपले काय चुकते, ते पाहण्याकरता, त्याचे मर्म जाणून घेण्याकरता आपण सुरवात एका लहान नवजात मुलापासून करू.
    जेव्हा ऎक मुल जन्माला येते, आपला श्वासोश्वास सुरु करते, व आपल्या सभोवतालचे जग पहाते, त्यावेळेस त्याला सर्व काही नवीन आश्चर्यदायक वाटू लागते, त्याला हेही कळते, कि आपला तुरुंगवास संपला व आपण कुठल्यातरी नवीन विश्वामध्ये आलेलो आहोत. जसेही थोडे दिवस जातात, बाळ सर्वप्रथम फक्त आपल्या आईला, तिच्या आवाजावरून, तिच्या स्पर्शावरून ओळखू लागते. असे का होते?
    सोपे, आणि स्पष्ट उत्तर आहे, कि हे बाळ आपल्या आईच्या उष्ण गर्भामध्ये नऊ महीने राहिले, तिचा आवाज, तिच्या अंगाची उष्णता, त्याला परिचित होते. आपण हे नैसर्गिक आहे, असे समजून व जास्त विचार न करता सोडून देतो. येथेच आपले आणखी काहीतरी चुकते, ह्या नैसर्गिक गोष्टीमागे आणखी ऎक नैसर्गिक गोष्ट लपलेली आहे, आपण तिकडे आपले लक्ष्य देतच नाही, व आपल्याच भ्रमात राहतो. ती काय गोष्ट आहे?
    जेव्हा बाळ आपल्या सभोवताली बघू लागते, तेव्हा प्रथम ते आपल्या आईला, वडिलांना व आपल्या नातेवाईकांना बघते, नंतर त्याचे लक्ष्य त्याच्या करता आणलेल्या खेळण्यांकडे जाते. त्याला हे सर्व पाहून आश्चर्यचकित व्हायला होत. कारण त्याने हे सर्व काहीही कधी बघितलेले नसते. त्या बाळाला नवनवीन वस्तू बघायची तर वेगवेगळे आवाज ऐकण्याची आस लागते, प्रत्येक नवीन गोष्ट आपण पहावी, हि प्रथम इच्छा येथेच जन्म घेते.
    पण मुलांना त्यांच्या वयाच्या नऊ ते दहा वर्षापर्यंत देवाची लेकरे, देवांप्रमाणेच आहेत, असे म्हणून समजतो व सर्वांकडून ऎकतो. परंतु असे का समजायचे? का मानायचे? फक्त दिसावयास गोंडस व शरीराने कोमल असतांत म्हणून? ह्याकडे आपण कधीही लक्ष्य दिलेले आहे का?
    रेच हि मुले परमेश्वराचीच लेकरे आहेत, हे मी देखील मानतो. त्यांना वयाच्या सात ते आठ वर्षांपर्यंत काय चूक आहे व काय बरोबर आहे ह्याचे ज्ञान नसते. त्यांना फक्त प्रत्येक नवीन गोष्टींमध्ये आकर्षण वाटत असते व ते सर्व गोष्टींना चांगलेच समजतात. त्यांच्यात कुठल्याही गोष्टीला वाईट समजण्याची प्रवृतीच नसते. पण फक्त हीच ऎक गोष्ट नाही तर आणखीही ऎक गोष्ट आहे, ज्यामुळे त्यंच्या वयाच्या तीन ते चार वर्षांपर्यंत परमेश्वरच त्यंच्या ठायी आहे हे मानण्यासाठी आपणांस भाग पाडते. ती काय गोष्ट आहे?
    पण हे सर्वकाही जे ऐकतो, पहातो तसेच वाचतो ते सर्व आपल्याला आपल्या स्वतःच्या स्वभावानुसार समजते, व तसेच आपण समजून घेऊ ईच्छितो, व तसेच आपण ऎकु देखील ईच्छितो, त्यामुळेच आपण फार मोठ्ठी चूक करून बसतो. ती काय चूक आहे? त्यामुळेच आपल्याकडून गर्भपात व लहान मुलांची हिंसा असे जघन्य अपराध देखील घडतात.
    सेच त्याबरोबरच आपण आणखीही काही अशा चुका करत असतो, की ज्या आपल्या कडून कळत नकळत घडत असतात. त्याच्या बद्दल आपण येथे माहिती करून घेणे, हे अत्यंत गरजेचे आहे असे आपल्याला नाही वाटत का?
    हान मुल जेव्हा जेव्हा ह्या परमेश्वराच्या सृष्टीकडे, नवीन नवीन वस्तूंकडे पाहतात, त्या त्या वेळेस, त्या मुलाला वेगवेगळे नवनवीन प्रश्न पडत असतात, व ते मुल आपल्याला त्या त्या प्रश्नांची उत्तरे विचारत असतात. आपण काही प्रश्नांची उत्तर आवडीने देतो, व काहीवेळा जास्त प्रश्न विचारले असताना आपण भंडावून गेल्याप्रमाणे त्यांना काही बाही, उत्तर देवून आपला पिच्छा सोडवून घेतो. काही उत्तरे देतो परंतु आपली सर्व उत्तरे हि नुसती त्याचा वेळ घालवायची अशाप्रकारची असतात. आपण त्याला काहीही मुलभूत अशा ज्या खऱ्या गोष्टींची (प्रकारांची) माहिती त्याला अभिप्रेत (आवश्यकता) असते, ती देत तर नाहीच, उलटपक्षी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. आपण हे सर्व कळत नकळत करत करतो. ही आपली चूक आहे असे नाही वाटत का? आपण काय केले पाहिजे?


Pg 02
प्रिय, वाचकहो लक्ष्य द्या!
ह्या पानावरचा मजकूर वाचतांना लक्षांत ठेवा, कि आज पृथ्वीवर कलियुग चालू आहे, व त्याचा आपल्यावर पगडा (पकड) आहे. त्यामुळेच सभोवार दिसणाऱ्या सर्व मायाजालाचा, अधिक त्रास होऊन, आपण त्यांत जास्तच जास्त गुरफटले जातो. त्यांतून सुटण्याचा मार्ग, मी पुढे येणाऱ्या पानांवर आपणांसाठी प्रस्तुत, लिहिणार आहेच. त्यांत कलियुग पृथ्वीवर आरंभ होण्याअगोदर म्हणजेच त्रेतायुगाच्या शेवटी, परमेश्वर आणि कली ह्यांच्यात काय संभाषण झाले, कलीने त्याचे पाश मानवांवर कसे टाकायचे, त्याच्या बद्दल काय योजना बनवली? परमेश्वराने कलीला काय निर्बंध घातले? कलियुगाच्या अंतिम वेळेच्या अगोदर, कली त्याचे मायापाश, कसे जास्तच आवळेल? परमेश्वराने मानवाला ह्यातून सुटायचे, सुखी व आनंदी राहण्याचे काय मार्ग अगोदरच विस्तार करून ठेवलेले आहेत? जे आपल्याला माहित नाहीत.
हे सर्वच आपण सर्वांकरता प्रत्येक सप्ताहाच्या बुधवारी लिहिणारच आहे. आपण फक्त वाचत रहा व आपला सुखमय मार्ग, सोपा, सहज मोकळा होईल.

    बाळ जेव्हा जन्म घेते, तेव्हाच परमेश्वराने त्याच्या शरीराला जोडलेले दोन डोळे दिलेले असतात. हे मुल ज्या ज्यावेळेस त्याच्या खेळण्यांकडे, ह्या निसर्गाकडे, त्याच्या आजूबाजूला जे जे काही पाहते, त्या सर्व वस्तू व सर्व गोष्टी त्याला खऱ्याच वाटतात, व तसेच तो मोठा होई पर्यंत मानतो.
    पण असे समजतो, मुल लहान आहे, त्याला काय कळते? येथे आपणास कळले पाहिजे की लहान मुलांची स्मरणशक्ती आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. आपण त्यांना अशी थातूर मातुर उत्तर देवून त्यांचे फार मोठे कळतनकळत नुकसानच करत असतो. आपण असे समजतो, मुल मोठे झाले कि त्याला आपोआप सर्व काही कळेल. पण तोपर्यंत खूप खूप उशीर होणार आहे, हे आपल्याला त्यावेळेला तर कळत नाही, तसेच मुले मोठी झाल्यावर देखील, आपण त्यांना वाढवतांना आणखी काय चुका केल्या ह्याची जाणीव सुद्धा आपल्याला नसते. कि मुले त्यांच्या वयाच्या ६ ते ७ वर्षांपर्यंत अर्धेअधिक वस्तुनिष्ठ बनतांत, व वयाच्या ९ ते ११ वर्षांपर्यंत पूर्णपणाने त्यांनी वस्तुनिष्ठता आपल्या अंगी जोपासलेली व बाणवलेली असते. व आता आपल्याला हीच चूक सुधारायची आहे. ती कशी? (येथे वस्तुनिष्ठता याचा अर्थ: आत्यंतिक आकर्षण, त्या वस्तू शिवाय न चालणे)
    पण हे मुलांना, जेव्हा ती लहान असतात, त्याचवेळेस त्यंच्या मनावर बिंबवायला पाहिजे, कि हे सर्व पृथ्वीवर जे काही दृश्यमान आहे, म्हणजेच आपल्या डोळ्यांना जे जे काही दिसते, ते ते सर्वकाही नाशिवंत आहे, तसेच जे काही कायम टिकेल असे वाटते, त्या वस्तू, त्या गोष्टींचा हा निसर्ग नाश करणार आहे व तो ते करेल. अशी कोणतीही वस्तू व अशी कोणतीही गोष्ट ह्या जगात नाही कि जी कायम धायम आहे, व ती कायम टिकेल, व निरंतर सुख प्राप्त करून देईल, तरी अशा क्षणिक गोष्टींना (वस्तूंना) प्राप्त करण्याची धडपड केवळ व निव्वळ वृथाच असेल, व सर्वात शेवटी आपल्याला समाधान मिळणे तर दूरच, दुखः आणि हानी मात्र होण्याची शक्यता मात्र फार जास्तच वाढते.
    ला माहित आहे, कि किती जणांना व किती आईवडिलांना हि खरी वस्तुस्थिती माहित असून वा माहित पडल्यावर, आपल्या मुलांना समजावण्यास योग्य व आवश्यक आहे हे त्यांना स्वतःला कितपत पटेल व रुचेल? हा प्रश्न पडतो, कारण ज्यांनी आपल्या लहान वयापासून हि वस्तुनिष्ठता आपल्या अंगी इतकी बाणवून घेतलेली असते, कि मूळ म्हणजे त्यांच्या स्वतःच्याच पचनी हे पडणे, म्हणजे महादुर्लभच गोष्ट आहे, असे वाटते. परंतु त्यांनी हे आठवावे व कायम लक्षांत ठेवावे कि ह्या वस्तुनिष्ठतेमुळे आजपर्यंत आपण किती दुखः, किती यातना भोगल्या? काय आपल्याला कधी आत्मसमाधान मिळाले का? तसेच त्यांना हेही कळावयास पाहिजे कि ह्याच वस्तुनिष्ठतेमुळे असूया, द्वेष, अहंकार, भोगविलासवादीपणा जागृत होतो व एकदा जागृत झालेला तो कुठलाही दुर्भाव कधी शांत झाला होतो का? कि उलट त्याची वाढच कायम होत जाते?, व त्याचं प्रकारांच्या दुर्भावनांमुळे निस्सिम अपराध घडण्यास, व अशा प्रकारच्या दुर्घटनांना चालना मिळण्यास मदतच होते. त्यांना हि जाणीव व्हावयास पाहिजे, कि काय त्यांची मुले देखील तीच दुखः त्याचं यातना भोगण्यास सामोरे जावेत? मी हे देखील सांगतो, ज्यांनी ज्यांनी, व ज्या आईवडिलांनी हि वस्तुस्थिती नीटपणे जाणून घेतली, व मानली, तसेच आपल्या मुलांना समजावून दिली, ते आईवडील व त्यांची मुले, मलाच काय तर पुढे येणाऱ्या वेळेला आपल्या कर्तुत्वाने फक्त नुसते यशस्वी होतीलच असे नाही तर त्यांच्या कामगिरीने जगाला कायम वंदनीय ठरतील, हि माझी खात्री आहे.
    मी हे देखील सांगतो, ज्यांनी ज्यांनी, व ज्या आईवडिलांनी हि वस्तुस्थिती नीटपणे जाणून घेतली, व मानली, तसेच आपल्या मुलांना समजावून दिली, ते आईवडील व त्यांची मुले, पुढे जाउन आपले एक वेगळेच विश्व निर्माण करून, आपली एक आदरणीय ओळख, संपूर्ण जगाला करून देतील, व असे करतांना ते सर्वांच्यासाठी एक स्फूर्तीस्थान बनून संपूर्ण जगाला एक नवीन मार्ग प्रशस्त करून देतील. तसेच पुढे येणाऱ्या वेळेला व जगाला आपल्या कर्तुत्वाने कायम संस्मरणीय व आदरणीयच ठरतील. हि माझी खात्री आहे, व माझे तुम्हाला वचन आहे.
    र तुम्हाला खात्रीच पटवून घ्यायची असेल, तर स्वामी विवेकानंद, अब्दुल कलाम आझाद ह्यांचे चरित्र वाचावे. मला सांगा कोणत्या आईवडिलांना वाटते, कि आपली मुले चांगली, कर्तुत्ववान, निर्व्यसनी, वंदनीय, अशी निघू नयेत? त्याचबरोबर हेही लक्षांत ठेवा, छत्रपति शिवाजी महाराजांना, त्यांचा बाल्यावस्थेत, त्यांच्या ध्यानीमनी, आत्मिक, अध्यात्मिक, एक स्वतंत्र बाणा, स्वातंत्र्याची स्फूर्ती, त्यांच्या ठाई, जागवणारी व बाणवणारी, व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून, त्यांची आई जीजामाताच आहे, आणि म्हणूनच ते दोघेही आज व कायम जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत सर्व जगाला वंदनीयच रहातील. ह्या गोष्टीला इतिहास साक्षी आहे. ह्या एका उदाहरणा वरून, माझ्या प्रिय वाचकहो, तुम्हा सर्वांचा लक्षांत येतंच असेल, कि आई हि आपल्या मुलांची "प्रथम गुरु" ठरते. आणि जे आईवडील आपल्या मुलांना योग्य संस्कार देत नाहीत, त्यांना परमेश्वर देखील वाचवणे कठीण आहे, हे तर सर्व जग मान्य करते. मला माहित आहे, कि सर्वच मुले तेव्हढीच प्रगल्भ निघत नाहीत, परंतु ज्यांचा व्यवहार, व वागणूक चांगले असते, त्यांना सर्वच जग आपलेसे करते, व जग त्यांचा आदर्श नेहेमी आपल्या समोर ठेवते, हे कायम लक्षात असू द्यावे.
    ता आपण असे बघूया, कि किती लोकांना (वयाने मोठे असलेल्यांना) वस्तुनिष्ठता ही गोष्ट माहिती आहे? व किती लोकांना नाही? साधारणपणे असे लक्षांत आले आहे कि ५०% लोकांना हे पूर्णपणे माहितीच नाही, व ४९% लोकांना हे माहिती आहे परंतु ते ह्या गोष्टीकडे काणाडोळा (जसे काही माहितीच नाही) करतात. ह्यामुळे काय घडते? कि अशी सर्व लोक आपल्या जीवनाचा तर नाश तर करतातच, परंतु त्यांच्या घरांत जन्म घेणाऱ्या, त्यंच्या पुढच्या येण्याऱ्या भावी पिढीचा देखील नाश आपल्याच हाताने करतात, व नंतर आयुष्याच्या शेवटी पश्चात्ताप करत राहण्याची पाळी येते.
    मी मानतो कि आपल्या वाडवडिलांनी (पूर्वजांनी) ह्या गोष्टीकडे गांभीर्याने जसे बघावयास पाहिजे होते, ते पाहिले नाही, किंबहुना असेही आहे कि त्यावेळेस आताच्या सारखे दळणवळण, मोबाईल, इंटरनेट सारख्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे त्यावेळी ज्ञान, माहितीचे आदानप्रदान होणे, अवघड काम होते. ते काहीही असो, जर आपल्या पिढीच्या लक्षांत ही अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षांत आली आहे, तर आपले काम नाही का? आपण आपल्या मुलांना व येणाऱ्या भावी पिढीला वाचवावे? वाचवले पाहिजे, मला वाटते, तुम्ही सर्व माझ्याशी सहमत आहात. काय तर मग तयार आहात ना?


आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.

1 comment:

  1. Nice Post for all readers Please visit http://software4freedownlaod.blogspot.in/ best software

    Laptop details http://www.laptop4pune.com/

    Movies Video and Trailers http://worlds-4-free.blogspot.com/

    Free Download Whats Apps for PC and Laptop http://www.laptop4pune.com/2014/02/Free-Download-

    Whatsapp-for-PC-and-Laptop.html

    Free Download Driverpack Solution 15 ISO Full Version

    http://www.laptop4pune.com/2014/12/free-download-driverpack-solution-15-iso-full-version.html

    ReplyDelete