Tuesday, August 11, 2015


पान नंबर ०३ व ०४
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

Pg 03
  कृपया हिकडे लक्ष्य द्यावे!
पाणी, हि आपल्या, जीवनाची सर्वांत मोठी गरज आहे. पाण्याला, जास्त आहे किवा जास्त मिळते, म्हणून वाया घालवू नका. पाणी हे परमेश्वराचे आपल्याला वरदान आहे. आपण, त्या वरदानाची कदर करत नाही, व ईश्वराच्या, निसर्गाच्या, प्रकोपाचे मात्र धनी होतो.
जरूर ध्यानांत ठेवा, व इतरांनाही अवश्य सांगा:
पाणी पितांना, दांत घासतांना, हात धुवतांना, भांडी घासतांना, आपण, किंवा अन्य कोणी जर पाण्याचा नळ, पूर्ण उघडून पाणी गरजेपेक्षा जास्त सोडले, तर आवश्यकतेपेक्षा तिप्पट, ते चौपट पाणी निव्वळ वाया जाते. तेच पाणी एका भांड्यात घेऊन वापरले असतां, असे लक्ष्यांत येते, कि पाणी फक्त २५% च लागले. आता आपण सर्वांनी, हेच पाणी असेच वाचवले, तर आज महाराष्ट्रांत, सर्व शहरांत व गावांत, एवढे पाणी वाचेल, कि संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्ध्या शेतीच्या पिकांना, ते पाणी पुरवून, महागाई कमी होण्यास मदतच होईल. शेतकऱ्यांना मदत होऊन, त्यांना आत्महत्या करावी लागणार नाही.
तरी जो कोणी किंवा आपण स्वतः, चुकत असाल, तर आपल्या स्वतः वर व सर्व महाराष्ट्रावर कृपा करा, व चुकणाऱ्याची चूक कृपया त्यांच्या लक्षांत आणून द्या.
आ. अशोक यादव.

    ता आपण असे पाहूया, कि काही जरी आपल्या पूर्वजांनी चूक केली, तरीही भूतकालात असे काय असे ऎकहि उदाहरण घडले नाही का? कि ज्यायोगे मुलाला फक्त माहित पडले कि ह्या जगात काहीच कायम धायम नाही, ह्या पृथ्वीवर, आपल्या डोळ्यांना दिसते ती प्रत्येक गोष्ट वस्तू, एकतर नाशिवंत आहेच, व नाहीतर, काही ज्या गोष्टी जर लांब काळ टिकत असतील असे वाटते, तर त्या गोष्टींना हा निसर्ग जीर्ण शीर्ण (जुन्या, नाकामी) करून संपवून टाकतो, बदलत रहाणे, हा निसर्गाचा नियम आहे, आणि हि खरी वस्तुस्थिती, आपल्या मुलांच्या लक्ष्यांत वेळीच आली, किंवा आणून दिली, तर मुल, त्या डोळ्यांना दिसणाऱ्या व आकर्षित करणाऱ्या सर्व मोहमयी वस्तूंचा आकर्षणाचा त्याग करून, आपल्या शिक्षणावर तसेच आपले आयुष्या मध्ये जे लक्ष्य निर्धारित केले असेल तिकडे आपले लक्ष्य केंद्रित करतील, व आपला जीवनमार्ग चांगल्या दिशेने नेण्यास तत्पर होतील. हो, अशी उदाहरण तर बरीच घडली, त्यातलेच एक उदाहरण, जे जास्तीत जास्त लोकांच्या परिचयाचे देखील आहे, परंतु त्याकडे पूर्णपणाने लक्ष्य द्यावे असे आपण लक्ष मात्र दिलेले नाही, असेच उदाहरण आपण आता पाहूया.

आयुष्यातली सर्वात महत्वाचे वळण घेणारी घटना.
    जेव्हा राजकुमार सिद्धार्थ तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेला एक युवक होता. एक दिवस त्याला काही कामानिमित्ताने राजवाड्याबाहेर जायचे होते. त्यानिमित्ताने तो आपल्या सारथीला घेऊन रथावरून निघाला. त्यावेळेस त्या राजवाड्याच्या जवळच्या नगराच्या काहीशा शांत असलेल्या रस्त्यावरून जात असताना, त्याने अशा काही गोष्टी पाहिल्या कि त्याला असे काही गंभीर विचार करण्यास भाग पडले कि त्याचे सर्व आमुलाग्र जिवनचक्रच बदलून गेले. त्याने असा एक वृद्ध पाहिला, जो अत्यंत जर्जर व थकलेल्या अवस्थेमध्ये रस्त्यावरून आपले पाय फरफटत चालत जात होता. अजून थोडे पुढे गेले असता त्याला रस्त्याच्या कडेला एक आजारी, प्रकृतीने क्षीण, अत्यंत वेदनाग्रस्त असा माणूस दिसला, सिद्धार्थने आपल्या सारथ्याला रथ सावकाश चालवण्यास सांगण्याचा इशारा केला, परंतु काहीच बोलला नाही. आता अजून थोडे पुढे गेले असता, त्याला एक संन्यासी, जो भगवे कपडे, हातांत कमंडलू, गळ्यांत रुद्राक्षमाला, व केसांच्या वाढलेल्या जटा अशा अवस्थेत रस्त्याच्या कडेने जात असताना दिसला. रथ सावकाश पुढे जातच होता, अजून थोडे पुढे गेल्यावर सिद्धार्थला एक अंत्ययात्रा (मेलेल्या माणसाला चार माणस खांद्यावर घेऊन) जातांना दिसली.
    आता मात्र सिद्धार्थ उद्विग्न (गंभीर, परेशान) झाला, त्याने त्याच्या आयुष्यांत हे सर्वकाही असे पाहिलेच नव्हते, रथ पुढे सावकाश जातच होता, तो सिद्धार्थने सारथ्याला रथ थांबवण्यास सांगून, सिद्धार्थ सारथ्याला ह्या सर्व माणसाच्या अवस्था, वेदना, व मृत्यू ह्यांचा परस्पर संबंध व ह्याचा एकमेकांशी काय संदर्भ, बाबत प्रश्न विचारू लागला. सारथी थोडा गांगरून गेला, परंतु त्याने त्याच्यापरीने पुन्हपुन्हा सिद्धार्थला समजावले देखील, परंतु सिद्धार्थचे काहीही समाधान होऊ शकले नाही.
    विचारांचे काहूर भरलेल्या अशा स्थितीत, सिद्धार्थने, थांबवलेला रथ गंतव्य स्थानी जायचे सोडून, परत राजवाड्याकडे नेण्यास सांगितले. हे सर्व दुख्दायक, कष्टप्रद, यातनांने भरलेले आयुष्य, व जीवनाचा असा शेवट, पाहिले असतांना सिद्धार्थला ते असहनीय झाले. तो शांतीपूर्ण, खऱ्या सुखाचा शोध, मानवी जीवनाचा खरा आनन्द, व कल्याण हेच त्याच्या आयुष्याचे खरे ध्येय असे मानून आपल्या राजसी जीवनाचा सर्वसंग परित्याग करून आपल्या ध्येयाप्रती जाण्यास सिद्धार्थ तत्पर झाला.
(हाच राजकुमार सिद्धार्थ, पुढे जाउन "महात्मा गौतम बुद्ध" ह्या नांवाने प्रसिद्ध झाला)
आणखी माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.

    जच्या काळात, आजच्या घडीला, प्रत्येक मानव, प्रत्येक समाज, प्रत्येक प्रांत, प्रत्येक देश, सर्व मानव जात, ह्या सुखाच्या, शांतिपूर्ण जीवनाच्या शोधांत आहेत. परंतु असे काही आहे कि जसे "हे, माणसा, सर्व तवसंगी, अन ध्यानीमनी| काय तव चक्षुंनी शोधत आहेस त्रिभुवनी"|| ह्यालाच असेही म्हणता येईल कि "काखेला कळसा| आणि गावाला वळसा”|| काय तुम्हाला पटते? काय तुम्ही माझ्याशी सहमत आहात का? तुम्ही कदाचित सहमत असाल किंवा नसालहि, परंतु ह्याचे नेमके मर्म काय आहे? हे समजणे आपल्या जीवनांत अत्यंत आवश्यक आहे.
(घाबरू नका, हा विषय, इथे तुम्हाला "परमेश्वराचे ज्ञान" समजून घ्यायचा आहे, कुठलीही जात, धर्म, संप्रदाय, बदलण्याचा, किंवा बनवण्याचा नाही. आपला सर्वांचा एकच धर्म आहे, तो म्हणजे मानवधर्म)



Pg 04
ह्या पानावरचा मजकूर वाचतांना लक्षांत ठेवा, कि आज पृथ्वीवर कलियुग चालू आहे, व त्याचा आपल्यावर विलक्षण पगडा (पकड) आहे. त्यामुळेच सभोवार दिसणाऱ्या सर्व मायाजालाचा, अधिक त्रास होऊन, आपण त्यांत जास्तीत जास्तच गुरफटले जातो. त्यांतून सुटण्याचा मार्ग, मी पुढे येणाऱ्या पानांवर आपणांसाठी प्रस्तुत, लिहिणार आहेच. त्यांत कलियुग पृथ्वीवर आरंभ होण्याअगोदर म्हणजेच त्रेतायुगाच्या शेवटी, परमेश्वर आणि कली ह्यांच्यात काय संभाषण झाले, कलीने त्याचे पाश मानवांवर कसे टाकायचे, त्याच्या बद्दल काय योजना बनवली? परमेश्वराने कलीला काय निर्बंध घातले? कलियुगाच्या अंतिम वेळेच्या अगोदर, कली त्याचे मायापाश, कसे जास्तच आवळेल? परमेश्वराने मानवाला ह्यातून सुटायचे, सुखी व आनंदी राहण्याचे काय मार्ग अगोदरच विस्तार करून ठेवलेले आहेत? जे आपल्याला माहित नाहीत, ते मार्ग आपल्याला संपूर्ण माहीत करून घ्यायचे आहेत, व तेच आपले लक्ष्य आहे.
हे सर्वच आपण सर्वांकरता प्रत्येक सप्ताहाच्या बुधवारी लिहिणारच आहे. आपण फक्त वाचत रहा व आपला सुखमय मार्ग, सोपा, सहज मोकळा होईल.

    काय हे शक्य आहे का? जरूर आहे, असे माझे म्हणणे आहे. होय, आणि हे जरूर शक्य आहे. हे सर्व तुम्ही वाचल्यावर तुमचेही दुमत रहाणार नाही. कारण कि गौतम बुद्ध, त्यांना साक्षात्कार झाल्यावर, ज्या ज्या ठिकाणी गेले, त्या त्या ठिकाणी, म्हणजेच, नेपाल, तिबेट, चीन, आणि भारत, मध्ये त्यांनी परमेश्वराचा संदेश, व त्यांचे विचार मांडले, तसे तसे लोक त्यांच्या बरोबर त्यांचे शिष्य होत गेले. हो, आज काहीअंशी जरी प्रभाव कमी झाला असला, तरी हे जरूर लक्षांत यावे कि आजही ८०% प्रभाव टिकून आहे. तसेच हेही लक्षांत घेतले पाहिजे, कि जर आपण ते ज्ञान व विचारांची एकूण व्याप्ती समजून घेतली, तर त्या लोकांना व सर्व इतरांना, आजच्या कम्प्युटर व इंटरनेटच्या सहाय्याने हे ज्ञान सर्वदूर पसरायला काहीच वेळ लागणार नाही.
    काय, तुम्ही विचार करता, कि लोकांचे विचार बदलणे, लोकांच्या मनांत विश्वास जागवणे, त्यांना प्रेरित करणे, आजच्या घडीला, आजच्या काळांत हे होणे शक्य आहे का? होय आहे, निश्चितच आहे. जर तुम्हाला विश्वास नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही त्याकडे लक्ष्य देऊ नका, तुम्ही फक्त तुमचा स्वतःचा उद्धार करून घ्या, कारण, हे ज्ञान प्रत्येकाने, प्रथम आपल्या स्वतःचे स्वतः जीवन व आत्म्याचा उद्धार करण्यासाठी आहे. तुमचे जीवन बघून, तुमचे शेजारी, तुमचे नातेवाइक, असे सर्वजण आपोआपच सुधारतील. तसेच एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे आठ, असे करत आपोआपच सर्व जग तुमच्या पावलांवर पाउल, ठेऊन आपले उदिष्ट्य गाठेल. यांत काहीच संशय नाही.
    रीपण, कसे आणि काय हे मी तुम्हाला पटवून देण्याचा पूर्णपणाने प्रयत्न करतो. परंतु हे सर्व करायला, काय करावे लागेल? मला माहित आहे, आपण गौतम बुद्ध नाही, आपण त्याच्या बुद्धीएवढे क्षमतेचे देखील नाही, परंतु हेही लक्षांत घ्या कि आपण सर्वांनी मिळून जर प्रयत्न केले, तर हे अशक्य हि नाही, आणि म्हणून तर आपल्याला काही मुलभूत गोष्टी समजून घ्याव्या लागतील. व आपल्याला आपल्यापासून, आपल्या घरापासून सुरवात करावी लागेल, व त्याकरिता आणखी पुढे कुठेही जाण्याची आवश्यकता देखील भासणार नाही. कारण आपण व आपली मुले सुधारली, तर आपले घर सुधारेल, आपली वागणूक बघून व थोडे समजावून आपला शेजारी सुधारेल, व प्रत्येक घरांतून प्रयत्न झाला तर आपला विभाग सुधारेल, असे करता करता, आपला देश सुधारायला जास्त वेळ लागणार नाही. मला वाटते मी फार घाई करतो आहे, तसे खरे तर नाहीये. तुम्ही तुमच्यावर जास्त ताण घेऊ नका. जसजसे तुम्ही पुढे वाचत जाल तसतसे ते आपोआपच तुम्हाला समजून येईल.
    पण हे करतांना हे हि लक्ष्यांत घ्या कि आपण फक्त आपला स्वतःचा जीवन मार्गच सुधारत नाही, तर आपण आपल्या आत्म्याचा जो कि परमेश्वराचा अंश आहे, त्याचाही उद्धार करतो आहोत. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला देखील सन्मार्गाचा रस्ता दाखवत (बनवत) आहोत. व हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा कि आपण स्वतः जो प्रयत्न करू, तो प्रामाणिकपणे करू. होय येथे फक्त प्रामाणिकपणा आणि तोही फक्त आपल्या स्वतःकरिता फार आवश्यक आहे.
    ला तर आपण ह्याच्या एक एक करून, सर्व मुलभूत गोष्टींकडे पाहूया. जसे कि सुरवातीलाच आपण पाहिले, नवजात मुल आणि त्याच्या हालचाली जसे कि ते सर्वप्रथम आपल्या आईलाच ओळखते, व त्याचे उत्तरही पाहिले कि ते आईच्या उदरांत नऊ महिने होते, व तिच्या आवाजाला व स्पर्शाला ओळखते. आता आपण पाहूया कि आईच्या उदरांत व वडिलांच्या शुक्राणू मध्ये येण्याअगोदर हा आत्मा कोठे होता? आता सर्वजण उत्तर देतील, सोपे आहे, हा आत्मा परमेश्वराकडे होता, आता इथे सहज एक प्रश्न उठतो, कि हा आत्मा परमेश्वराकडे किती काळ (वेळ) होता? तर साधारण असेच उत्तर येईल कि निश्चितच ९ महिन्यांपेक्षा जास्तच काळ असला पाहिजे. मग आता तुम्हीच मला सांगा, ज्यावेळेस नऊ महिने आईच्या उदरांत मुल (आत्मा) राहते, व जन्म झाल्यावर आईला ओळखते, तर नऊ महिन्यांपेक्षा जास्त वेळ परमेश्वराच्याकडे राहिलेले बाळ, म्हणजेच बाळाचा आत्मा परमेश्वराला ओळखत नाही काय?
    ता आपण सर्वांचे व माझेदेखील उत्तर असेच असणार आहे, कि होय बाळ परमेश्वराला ओळखत होते. म्हणजेच आपण सर्व लहान म्हणजेच बाळ असतांना, आपणही ह्या जगनियंता परमेश्वराला ओळखत होतो.
    मग असे असतांना बाळ मोठे झाल्यावर परमेश्वराला कसे काय बरे विसरले? आपणही मोठे झाल्यावर परमेश्वराला कसे विसरलो? कुठे बर आपला घात झाला, हे आपल्याला कळायला नको काय? आपण ह्याचा शोध का बरे नाही करत? हे आपले चुकत नाही काय?


आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.

1 comment:

  1. Nice Post for all readers Please visit http://software4freedownlaod.blogspot.in/ best software

    Laptop details http://www.laptop4pune.com/

    Movies Video and Trailers http://worlds-4-free.blogspot.com/

    Free Download Whats Apps for PC and Laptop http://www.laptop4pune.com/2014/02/Free-Download-

    Whatsapp-for-PC-and-Laptop.html

    Free Download Driverpack Solution 15 ISO Full Version

    http://www.laptop4pune.com/2014/12/free-download-driverpack-solution-15-iso-full-version.html

    ReplyDelete