Thursday, August 20, 2015


पान नंबर ०५ व ०६
"दिगंबरा दिगंबरा"| "श्रीपाद वल्लभ दिगंबरा"||

मला सांगावेसे वाटते! की “तुम्ही, मी, आणि निसर्ग,
आपल्यातल्या नातेसंबंधांविषयी परमेश्वर काय विचार करतो”

Pg 05
कृपया हिकडे लक्ष्य द्यावे!
पाणी, हि आपल्या, जीवनाची सर्वांत मोठी गरज आहे. पाण्याला, जास्त आहे किवा जास्त मिळते, म्हणून वाया घालवू नका. पाणी हे परमेश्वराचे आपल्याला वरदान आहे. आपण, त्या वरदानाची कदर करत नाही, व ईश्वराच्या, निसर्गाच्या, प्रकोपाचे मात्र धनी होतो.
जरूर ध्यानांत ठेवा, व इतरांनाही अवश्य सांगा:
पाणी पितांना, दांत घासतांना, हात धुवतांना, भांडी घासतांना, आपण, किंवा अन्य कोणी जर पाण्याचा नळ, पूर्ण उघडून पाणी गरजेपेक्षा जास्त सोडले, तर आवश्यकतेपेक्षा तिप्पट, ते चौपट पाणी निव्वळ वाया जाते. तेच पाणी एका भांड्यात घेऊन वापरले असतां, असे लक्ष्यांत येते, कि पाणी फक्त २५% च लागले. आता आपण सर्वांनी, हेच पाणी असेच वाचवले, तर आज महाराष्ट्रांत, सर्व शहरांत व गावांत, एवढे पाणी वाचेल, कि संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्ध्या शेतीच्या पिकांना, ते पाणी पुरवून, महागाई कमी होण्यास मदतच होईल. शेतकऱ्यांना मदत होऊन, त्यांना आत्महत्या करावी लागणार नाही.
तरी जो कोणी किंवा आपण स्वतः, चुकत असाल, तर आपल्या स्वतः वर व सर्व महाराष्ट्रावर कृपा करा, व चुकणाऱ्याची चूक कृपया त्यांच्या लक्षांत आणून द्या.
आ. अशोक यादव.

    ह्याचेहि उत्तर मी खरेतर अगोदरच दिलेले आहे. परंतु आपणाला हे पहायचे आहे कि असे का होते? आपल्याला आठवते का? कि कधी आपण काही दिवसांपूर्वी किंवा काही क्षणांपूर्वी मंदिर, चर्च, किंवा मस्जिद मध्ये जरी कधी गेलो, तर आपण तिथे गेलो असतां, त्या पवित्र अशा वास्तूमध्ये पोहोचल्यावर, आपल्या मनांत काय काय चांगले विचार स्फुरले, आपण कशा काय आपल्या चुका होऊन द्यायच्या नाहीत, असे, परमेश्वराला साक्षी ठेऊन, स्वतःच आपल्या मनाशी ठरवले, हे सर्व थोड्याच वेळांत त्या वास्तू मधून (मंदिरा मधून) बाहेर पडल्या बरोबर थोड्यांच वेळात विसरतो, तसेंच आपल्याला परमेश्वराचाही विसर पडतो, व त्याने आपल्याला जे काही नियम (निर्बंध) लावले आहेत, त्याचाही विसर पडतो. आपण भोगविलासवादी, अहंभावी, मतलबी, हेकेखोर, आपलेपरके मानणारे, वस्तुनिष्ठ, असे सर्वकाही होतो. आपल्याला हे सर्व माहित आहे, कि हे सर्वकाही चुकीचे आहे. आपण दु:खी होण्याचे हीच कारण आहेत हि जाणीव होऊनही परत परत आपण विसरतो. हे असे आपल्याबरोबर का होते? ह्याचा आपण आतापर्यंत का बरे शोध व मागोवा घेतला नाही? व ईच्छा झाली तरी, थोड्याच वेळांत, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो? असे आपल्या बरोबर का होते? हे होण्याचे नेमके काय कारण आहे. ते आपण आता पाहूया व नीट समजून घेऊया.
    ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे खरे तर हिंदू पुराणांत फार फार पूर्वीच म्हणजे ईसा पूर्व २२०० वर्ष, अगोदरच विस्तृत करून, परमेश्वराने दिलेली आहेत. जी काही पुराण, आजही पुस्तकरूपाने आपल्याला मिळतात, त्यामध्ये प्रामुख्याने परमेश्वराने सृष्टीची केलेली रचना, सृष्टीचे संगोपन, व चार युगांची स्थापना ह्या सर्व गोष्टींचे वर्णन सापडते. तर चला आपण आता हि चार युग काय आहेत, व आपण आता कलियुगात आहोत, तर, प्रामुख्याने त्याची माहिती पुराणांप्रमाणे काय आहे, ती लक्षांत घेऊ.

क्रमवार जी चार युग पृथ्वीवर अवतरली.
१. "सत्य युग"
२. "त्रेता युग"
३. "द्वापार युग"
४. "कली युग"

आणखी माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.

    ता आपण सर्वप्रथम कलीयुगाचीच माहिती घेऊ, कारण आपण आज कलीयुगांतच रहात आहोत, व अग्रक्रमाने म्हणजेच प्राधान्याने आपल्याला तीच माहिती प्रथम हवी आहे. वाटल्यास नंतर आपण पहिल्या तीन युगांची माहिती घेऊ शकतो.
    ज्यावेळेस "द्वापारयुगाचा" शेवट जवळ आला आणि द्वापारयुगामध्ये ज्या ज्या काही घटना, त्या वेळच्या मानवांमुळे घडल्या कि जिथे स्वयं परमेश्वराने अवतार घेतला होता, व त्या घटना सावरायचा प्रयत्न पण केला, अशी काही कारण घडली कि कलियुगाचा प्रारंभ करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळेस परमेश्वराला अगोदरच ठरलेल्या प्रमाणे माहित होते, कि कलीयुगाची स्थापना करण्याची वेळ जवळ आली आहे. आणि त्याकरता कली (एक शक्ती) ला पृथ्वीवर पाठवावे लागणार आहे. परमेश्वराने हे नियोजन पृथ्वीवरील माणस कलीच्या अंमलाखाली, प्रभावाखाली असतांना परमेश्वराप्रती, माणूसकीप्रती, लहान मुलांप्रती, आपल्या आई वडिलांप्रती, आजारी व अपंग लोकांप्रती, समाजाप्रती कशी वागतात, हे पहाण्यासाठी विशेषत्वाने केलेले होते.
    येथे मी हिंदू पुराणांपैकी एक पुराण, ज्याचे शीर्षक (नाव) गुरुचरित्र असे आहे, हे गुरुचरित्र स्वतः सद्गुरु नृसिंहसरस्वतीजींनी उपदेशून लिहून घेतले आहे, व ह्या चरित्रांत "कली" विषयी संपूर्ण माहिती उद्धृत (उपलब्ध) केलेली आहे, ह्याच पुराणाचा संदर्भ येथे घेतलेला आहे.


Pg 06
          कृपया हिकडे लक्ष्य द्यावे!
इलेक्ट्रिक, हि आपल्या रोजच्या वापरातली "वस्तू" नव्हे "उर्जा" आहे. आपण असे समजतो, आपली कमाई आहे, तर आपण कितीहि विजेचा वापर करू शकतो, व तो हक्क आपल्याला आहे. पण खरेच तसे आहे का?
कदाचित असे तर नाही? कि, आपण त्या गोष्टीतल्या राजासारखे, तो राजा, जेथे हात ठेवेल, त्याचे सोने झाले, आणि शेवटी त्यालाच धाय मोकलून रडावे लागते, म्हणजेच आपल्या देशांत, आपण निष्कारण वीज, आणि विजेसारख्या अन्य गोष्टी योग्य रीतीने न वापरता बेशुमार वापरून आपल्याच अधोगतीला आपण स्वतःच जबाबदार होतो?
भारतामध्ये अजूनही अपारंपारिक पद्धतीपेक्षा, (काही राजनीतिक कारणाने) पारंपारिक पद्धतच (उर्जा स्त्रोत) वापरावा लागतो. हे नैसर्गिक स्त्रोत, पूर्वी म्हणजे १९९८ साली, जेव्हढे होते, तेव्हढेच आजही आहेत, कदाचित काही कारणांने त्यांत बिघाड झाला, तर मात्र वीजनिर्मिती कमी होते, परंतु वीजनिर्मिती वाढवण्याचा एकही प्रशस्त मार्ग अजूनपर्यंत आपल्याला सापडलेला नाही.
असे असतांना, विचार करा, १९९८ सालापासून आज २०१५ सालापर्यंत, आपण किती वीज उपयोगी वस्तू आपल्या वापरामध्ये वाढवल्या? व त्याच्यावर आज अवलंबून आहोत. तसेच किती घर वाढली? किती लोकसंख्या वाढली? किती कार्यालय व किती कारखाने वाढले?
आपल्याला असे वाटते का? कि उद्योगधंदे वाढू नयेत, रोजगार निर्मिती होऊ नयेत? आपली मुले शिक्षित असून देखील बेरोजगार रहावीत. आपले जीवन चांगले गेले, बास झाले, येणाऱ्या पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या पिढीचा नाश झाला तरी चालेल, मी मात्र आहे, तसंच वागणार व रहाणार? व त्यांच्या नाशाला कारणीभूत होणार?
आज वस्तुस्थिती अशी आहे, कि मागणीपेक्षा पुरवठा फक्त निम्माच आहे. अशा अवस्थेत आपण असतांना, आपण बेफिकीर रहातो, हे कितपत योग्य आहे? उद्या अशी अवस्था निर्माण झाली, कि पैसा आहे पण वापरायला वीज नाही, रात्री मुलांच्या आभ्यासाला लाईट नाही, तर आश्चर्य वाटण्याचे कारणच नाही. कारण जे झाले, जे होत आहे, त्याला आपणच जबाबदार नाही का?

    ज्यावेळेस द्वापारयुगाचा अवधी संपूर्ण संपायला काही थोडेच दिवस बाकी होते, ऐक दिवस "परमेश्वराने" कलीला त्वरित आपल्यासमोर उपस्थित होण्याकरता निरोप पाठवला. ज्या क्षणी कलीला परमेश्वरासमक्ष उपस्थित होण्याचा निरोप मिळाला, त्याच क्षणी कलीचा थरकाप उडाला, अत्यंत घाबरला, त्याची अशी दयनीय परिस्थिती होण्याचे कारणही तसेच होते, कलीला अगोदरच देवलोकी काहीशी माहिती झालेली होती, कि कदाचित लवकरच त्याला परमेश्वराची आज्ञा होणार आहे, व पृथ्वीवर जावे लागणार आहे, तो प्रार्थना करत होता, कि परमेश्वराने आपला निर्णय बदलावा. परंतु आतामात्र तशी काही आशा धुसर (दिसेनाशी) झाली. कलीला माहित होते, पृथ्वीवर अशी माणस आहेत, जी परमेश्वराला ओळखतात व मानतात, परमेश्वराच्या नियमांनुसार आपले जीवन व्यतीत करतात, निसर्गाला आपल्या मुलांप्रमाणे सांभाळतात. त्यांचे खडतर जप, जाप्य, तप, अनुष्ठान, व्रत, त्यांचे अनुशासन, त्यांची मोक्षप्राप्ती, हे सर्व ऎकुनच कलीला छातीत धडकी भरल्यासारखे व्हायचे. त्याला माहिती होते, कि जर तो पृथ्वीवर गेला, तर तो काही थोडे दिवस देखील राहू शकणार नाही. हि पुण्यवंत माणसं, त्याच्या प्रभावाखाली येणे हि अशक्यप्राय गोष्ट आहे, ह्याची त्याला पुरेपूर जाणीव होती. त्याला स्वतःचा स्वभाव कसा आहे, ह्याची देखील पूर्णपणे कल्पना होती. त्याला मनोमन असेही वाटत होते, कि काय उपयोग होणार आहे जाऊन, परत तर यावेच लागेल. मी काहीच करू शकणार नाहीये, माझे शासन ह्या मानवांवर चालणे हि अशक्यकोटीतली गोष्ट आहे, व माझा स्वभाव देखील भक्तिमार्ग व तत्सम इतर कोणतेही मार्ग, ह्यासर्व गोष्टींपेक्षा माझे गुण व माझा स्वभाव वेगळा आहे, मी हे कसे परमेश्वराला समजवावे, त्याचे डोकच चालेनासे झाले.
    ली व ईश्वराचा आजपर्यंत कधीही जास्त समोरासमोर येण्याचा प्रसंग आला नव्हता. कलीला कांही पांहून, काही एकून, परमेश्वराची कल्पना मात्र पूर्ण होती. आजपर्यंत ज्या काही आज्ञा परमेश्वराकडून त्याला मिळाल्या, त्याने त्या पूर्ण पाळल्या. परंतु ज्या आत्ताच्या नवीन आज्ञेची त्याला कल्पना आली होती, त्याची पूर्तता करणे, हेच त्याच्या मनःस्थिती बिघडण्यास कारण झाल होत, कलीला स्वतःचा स्वभाव पूर्णपणाने परमेश्वराच्या समोर उघड करण्याची लज्जा वाटत होती, व म्हणूनच सर्वप्रकारे त्याची कुचंबणा होणे हे साहजिकच होते.
    लीला अनेकप्रकाराने विचार करूनदेखील काही उपाय सापडणे कठीण झाले, त्याला त्याचे स्वतःचे प्रश्न सुटणे दुर्धर व अवघड दिसू लागले व तो विचार करून करून पूर्णपणाने शिणला. सर्वात शेवटी त्यच्या मनांत आले कि आता लज्जा बाळगून काही उपयोग नाही. जेव्हा परमेश्वराचे बोलावणे आलेच आहे तर आपल्याला कसेही त्यांच्या समक्ष उपस्थित व्हावेच लागणार, हे त्याला पूर्णपणे कळून चुकले. तेव्हा आपण त्यांनाच ह्यावरचा मार्ग विचारू, आपला सोडवणुकीचा मार्ग तेव्हाच सापडेल व आपण काही निर्णयाप्रत येऊ शकू. असा विचार ध्यानी मनी करून, त्याने काही मनाशी योजना बनवली, व तो परमेश्वराकडे निघाला.
    रमेश्वरासमोर जातांना कली संपूर्ण विवस्त्र (जे निर्लज्ज व अंतःकरण हीनतेचे उद्बोधक), वृद्ध देह धारण करून, व पिशाच्चासारखे मुख बनवून, धडपडत, उठत, वेड्यावाकड्या उड्या मारत, वाम (डाव्या) हाती आपले लिंग धरलेले व उजव्या हाती आपली जिव्हा (जीभ) धरलेली, त्याच अवस्थेत अपशब्द (शिवी) व परमेश्वराची स्तुती देखिल करत, अशाप्रकारे परमेश्वरासमोर उपस्थित झाला.
    लीची ही दशा, सोंग (रूप, अवस्था) पाहून परमेश्वराला गुढ विचारपुर्वक हसू आले, व अत्यंत प्रेमाने विचारले, हे कली तू आपल्या हाती लिंग व जिव्हा का धरली आहेस? तुझे हे असे वागण्याचे काय प्रयोजन (हेतू, सांगावयाचे) आहे?
    ह्यावर उत्तर देत नम्रतेने कली म्हणाला, हे माझ्या परमेश्वरा, मला जर आपण पृथ्वीलोक पाठवणार असाल तर समस्त (पूर्ण) पृथ्वीलोक मला जिंकायचा आहे, पण ज्या मानवांचा (माणसांचा) आपल्या लिंग व जिव्हा ह्यावर पूर्ण नियंत्रण (ताबा) असेल, त्यांच्यापासून मला प्रचंड भीती वाटते, ह्या कारणानेच मी माझे लिंग व जिव्हा हाती धरून होतो. तसेच, ज्यांचे नियंत्रण, ह्या दोन्ही गोष्टींवर नाही, त्यांचे व्यवहार व गुण पिशाच्च सारखे राहून, जशी काम मर्कट करतो, त्याप्रमाणेच त्यांची कर्म व वचने उलट सुलट असतील, तसेंच ते अकाली वार्धक्यत्वाला पावून, जराजर्जर अवस्थेत, स्वतःचा अकाली नाश करून घेतील, अशा मानवांना मी माझे हितचिंतक मानतो, त्यांना मी क्षणिक का होईना पण मी सुखी करेन, ज्यायोगे ते माझीच भक्ती करून, माझेच गुणगान करतील, त्यांचे पाहून इतरही जन त्याच मार्गावर चालतील. अशा मानवांना मी माझे हितचिंतक मानतो, त्यांना मी प्रारंभिक का होईना पण मी सुखी करेन, ज्यायोगे ते माझीच भक्ती करून, माझेच गुणगान करतील, त्यांचे पाहून इतरही जन त्याच मार्गावर चालतील. मात्र असे जे जन असतील जे तुमची भक्ती, प्रार्थना करतील, त्यांच्यापासून मला घाबरायलाच होत. मी फक्त तुम्हाला सोडून कुणाही शक्ती किंवा अस्त्र, शस्त्राला घाबरत नाही, म्हणून ह्याचकारणाने मी आपले निजस्वरूप असे आपणासमोर प्रस्तुत (उघड) करत आहे.

आपण, पुढच्या येत्या प्रसिद्ध होणाऱ्या पानांवर परमेश्वराचे व कलीचे काय संभाषण झाले? कलीचा काय आग्रह होता? परमेश्वराने काय नियोजन केले? कलीवर काय काय बंधन घातली? मानवाला स्वतःचा उद्धार करून, ईश्वर प्राप्तीचे काय सोपे मार्ग तयार करून ठेवले? हे सर्व, जसे जसे पुढे वाचत जाल , तसतसे, तुमचे तुम्हाला स्वतःला पडलेले प्रश्न आपोआप सुटत गेलेले दिसतील, व हे निश्चित आहे.

आपण हीच वेबसाईट “इंग्लिश भाषेत” देखील वाचण्याकरता खालच्या लिंकवर क्लिक करा. You can read the same website in “English Language,” just click on below link.

दर बुधवारी मी आपणांस पुढील लिखाण प्रस्तुत करेन, म्हणजेच आपणासर्वांना भेटेन. तोपर्यंत, आपण आपल्या प्रतिक्रिया ह्याच ब्लॉगवर द्याल अशी माझी अपेक्षा आहे.
आपण सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला आवडेल, व हेच माझ्या लिखाणाचे श्रेय म्हणून मला मिळेल.

आ. अशोक यादव.

1 comment:

  1. Nice Post for all readers Please visit http://software4freedownlaod.blogspot.in/ best software

    Laptop details http://www.laptop4pune.com/

    Movies Video and Trailers http://worlds-4-free.blogspot.com/

    Free Download Whats Apps for PC and Laptop http://www.laptop4pune.com/2014/02/Free-Download-

    Whatsapp-for-PC-and-Laptop.html

    Free Download Driverpack Solution 15 ISO Full Version

    http://www.laptop4pune.com/2014/12/free-download-driverpack-solution-15-iso-full-version.html

    ReplyDelete